ई-वाहने आणि त्यातही ई-बाईक हि बाब आता नवीन राहिली नाहीये. अनेक कंपन्यांच्या ई-दुचाकी एव्हाना रस्त्यांवर दिसू लागल्या आहेत. पण जर याच वेळी सायकल स्वरूपातील ई-दुचाकीचा पर्याय तुमच्या समोर आला तर ? आणि त्यातही हि ई-सायकल टाटा (TATA) या नावाच्या विश्वासासार्ह तुमच्यापर्यंत येणार असेल तर ? (tata stryder Zeta Plus e-bike in marathi)
आश्चर्य वाटून घेण्याची गरज नाहीये कारण हे खरं आहे.
टाटा समूहाचा हिस्सा असणाऱ्या एका कंपनीने नुकतेच एका नवीन ई-बाईकचे अनावरण केले आहे ज्यामध्ये सायकल आणि बाईक या दोन्हीची वैशिष्ट्ये सामावली आहेत. या नव्या ई-बाईकचा वेग ताशी २५ किलोमीटर आहे. टाटा समूहाच्या मालकीची उपकंपनी असलेल्या स्ट्रायडरने (stryder) हे उत्पादन विकसित केले आहे.
तांत्रिक क्षमता / वैशिष्ट्ये (stryder Zeta Plus battery )
‘झेटा प्लस’ असे या नव्या बाईकचे नाव आहे. या नवीन ई-बाईकच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण आणि किफायतशीर वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी टाटाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या Zeta Plus मध्ये 36 V/6 Ah बॅटरी आहे. म्हणजेच ई-बाईकमध्ये म्हणजे 36 व्होल्टची बॅटरी आहे, जी इलेक्ट्रिक सायकल श्रेणीत उच्च दर्जाची असून ज्याद्वारे 216 Wh पॉवर जनरेट केली जात असल्याचा कंपनीचा दावा आहे.
वैशिष्ट्ये काय आहेत ? (stryder Zeta Plus features )
स्ट्रायडरचा दावा आहे की त्यांची हि ईव्ही दुचाकी भारतातील सर्व रस्त्यांवर चालण्यास सक्षम आहे. या ईव्हीचा वेग ताशी २५ किलोमीटर आहे. चार्जिंग करून रायडींग आणि पेडलच्या मदतीने म्हणजे सायकलिंग अशा दोन्ही प्रकारे ती ऑपरेट केली जाऊ शकते. एकदा चार्ज केल्यानंतर, हि इलेक्ट्रिक बाइक 30 किमी पर्यंत धावू शकते. स्ट्रायडर झेटा प्लस ( Zeta Plus e-bike) ची राइड आरामदायी आहे कारण तीची बांधणी स्टीलच्या हार्डटेल फ्रेमची आहे असं कंपनी सांगते.
याच बरोबर तिला शक्तिशाली ऑटो-कट डिस्क ब्रेक मिळतात. बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 तास लागतात. बॅटरी चार्ज करण्यासाठी होणाऱ्या विजेचा वापर लक्षात घेता या इलेक्ट्रिक सायकलची रनिंग कॉस्ट फक्त 10 पैसे प्रति किमी इतकी असल्याचा कंपनीचा दावा आहे. म्हणजेच या सायकलद्वारे प्रवासासाठी या प्रति किलोमीटर केवळ 10 पैसे मोजावे लागतील.
किंमत किती ? आणि कुठे खरेदी करता येईल ? (price of Zeta Plus e-bike)
स्ट्रायडरचे बिझनेस हेड राहुल गुप्ता यांनी या ई-बाईकची किंमतही वाजवी ठेवली असल्याचा दावा केला आहे. यांच्या मते, स्ट्रायडर झेटा प्लसचीसुरवातीची किंमत किंमत 26,995 रुपये इतकी आहे. पण लवकरच त्यात वाढ केली जाऊ शकते. या ई-बाईकचे बुकिंग स्ट्रायडरच्या वेबसाइटवर करता येऊ शकेल. स्ट्रायडरने सुरुवातीला ही ई-बाईक भारतात 4000 हून अधिक स्टोअरमध्ये उपलब्ध करून दिली आहे.
फिटनेस आणि सोय अशा दोन्हीची गरज पूर्ण करणारी हि नवीन ई-बाईक स्टायलिश, परवडणारी आणि इको-फ्रेंडली आहे अशी माहिती स्ट्रायडरचे बिझनेस हेड राहुल गुप्ता यांनी ई-बाईकच्या अनावरण प्रसंगी दिली.
इमेजेस कंपनीच्या संकेतस्थळावरून घेण्यात आलेली आहेत.