पी ई रेश्यो म्हणजे काय ? कुठे आणि कशासाठी होतो त्याचा वापर ?
(What is PE ratio in marathi) : जेव्हा एकाच किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील दोन किंवा अनेक कंपन्यांपकी कोणत्या कंपनीचे समभाग तुलनेत स्वस्तात उपलब्ध आहेत हे जाणून घेण्यासाठी पी ई रेश्यो चा वापर होतो. म्हणजे अगदी सोप्या भाषेत म्हणायचं तर गुंतवणूकदार एखाद्या कंपनीचे समभाग घेण्यासाठी त्या कंपनीच्या प्रती समभाग नफ्याच्या किती पटीत पैसे द्यायला तयार आहेत.मग हे प्रमाण जितकं कमी तितका चांगलं, म्हणजेच पीई रेश्यो कमी असेल तर उत्तम. थोडक्यात सांगायचं तर एखाद्या कंपनीच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्याची एक पद्धत आहे, हे कसं काढलं जात ते उदाहरणाने पाहू,
उदाहरणार्थ तुम्ही भाजीमंडई मध्ये जाता आणि समजा तुम्हाला टोमॅटो घ्यायचे आहेत.मार्केटमध्ये अनेक टोमॅटो विकणारे स्टॉलधारक आहेत त्यापैकी तुम्ही एका ठिकाणी चांगल्या प्रतीचे टोमॅटो पाहता, तिथे टोमॅटोचा दर आहे तीस रुपये किलो आता हा दर तुम्हाला काहीसा महाग वाटतो म्हणून तुम्ही पुढच्या स्टॉलधारकाडे जाता त्याच्याकडे टोमॅटोचे दर 15 रुपये किलो आहे मात्र तेथील टोमॅटो मात्र खराब आहेत. तुम्ही आणखीन पुढे जाता तिथे तुम्हाला चांगल्या प्रतीचे टोमॅटो दिसतात आणि तिथला दर आहे वीस रुपये किलो जो रास्त आहे. तुम्ही तिथे टोमॅटो खरेदी करतात.मित्रांनो आता इथे तुम्ही काय केलं ? तुम्ही तिन्ही स्टॉलधारकांच्या टोमॅटोच्या प्रतवारीची, किमतीची तुलना केलीत आणि त्यानुसार निर्णय घेतला. तसंच काहीसं कंपनीच्या समभागांचा पीई रेशिओ म्हणजे प्राईज अर्निंग रेष्यो काढताना करतो.
हे कसं केलं जातं हे आपण पाहूया,
एखाद्या कंपनीच पीई रेश्यों ( Price Earning Ratio in marathi) काढण्याआधी आपल्याला त्या कंपनीचा ईपीएस (Earning Per Share in marathi ) म्हणजे प्रति समभाग कमाई किती आहे हे माहिती करून घ्यावे लागतं.
हे कसं काढलं जातं तर कंपनीचा निव्वळ नफा भागिले कंपनीच्या एकूण समभागांची संख्या बरोबर ईपीएस.
म्हणजे कंपनीला झालेला निव्वळ नफा कंपनीच्या सर्व समभागात समान वाटला तर प्रत्येक समभागाच्या वाटेला किती रक्कम येईल. असं साधं सोप्प गणित.
तर त्यानंतर त्या समभागाची किंमत भागिले ईपीएस बरोबर पी रेशयो.
तर आता आपण एक उदाहरण घेऊन पाहू, समजा एकाच क्षेत्रातील दोन कंपन्यांची तुलना करू, कंपनी ‘अ’ आणि कंपनी ‘ब’
कंपनीच्या ‘अ’ च्या एका समाभागाच किंमत आहे ₹ 100 आणि कंपनी ब च्या एका समाभागच किंमत आहे ₹ 150,
आता किंमतीची तुलना केल्यास तुम्हाला कंपनी आ चे समभाग स्वस्त वाटतील पण तसं असेल का? पाहूया PE सूत्रांनी,
कंपनी ‘अ’ च्य समभागांची संख्या आहे 25,000 आणि कंपनीचा निव्वळ नफा आहे 1,00,000
मग 1,00,000 / 25,000 = 4 , तर 4 हा झाला कंपनीचा अर्नींग पर शेअर ( EPS )
मग आता कंपनीची समभाग किंमत / ईपीएस = पीई रेश्यों या सूत्राने, 100 / 4 = 25, म्हणजे या कंपनीचा पीई रेश्यों आहे 25
आता पाहूया कंपनी ‘ब’ बद्दल, आधी सांगितल्या प्रमाणे कंपनी ‘ब’ च्या एका समाभागची किंमत आहे ₹ 150
आणि एकूण समभागांची संख्या आहे दहा हजार आणि कंपनीचा निव्वळ नफा एक लाख तर मग आधीच्या सूत्राने,
1,00,000 / 10,000 = 10 , कंपनी ब चा EPS आहे 10 ,
आता पीई रेश्यु काढण्यासाठीच्या सूत्रानुसार कंपनीचे समभागाची किंमत / ईपीएस म्हणून,
150 / 10 =15 , म्हणून कंपनी ‘ब ‘चा पीई रेश्यू आहे आहे 15 .
मग इथे गुंतवणुकीसाठी आपली पसंती असेल कंपनी ब,
कारण हा समभाग आपल्याला स्वस्तात मिळतोय.
सामान्यतः 16 ते 21 च्या दरम्यान असलेला पी ई रेश्यू गुंतवणुकीसाठी पसंतीचा समजला जातो.
बर हे झालं सर्व सामान्य गुंतवणूकदार पी ई रेष्यू कसं काढतो त्याबद्दल पण काही हुशार गुंतवणूकदार असतात जे भविष्यातील अंदाज बांधतात, कंपनीची सध्याची औद्योगिक कामगिरी, भविष्यातील योजना, मिळालेली कंत्राटे ,चालू असलेली कामे यानुसार कंपनीला भविष्यात किती नफा होऊ शकेल याचा आकडेवारीनुसार ते अंदाज बांधतात आणि त्या भविष्यातील होऊ शकणाऱ्या नफ्याच्या आधारे फॉरवर्ड म्हणजे प्रोजेक्टेड PE काढतात आणि त्यानुसार गुंतवणूक निर्णय घेतात, कारण आपण बरेचदा सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार पीई रेश्यु काढतो पण भविष्यात या कंपनीची कामगिरी चांगली होत नाही अन् त्याचा परिणाम आपल्या गुंतवणुकीवर होत असतो म्हणूनच फॉरवर्ड पीई रेश्यु काढला जातो. ‘Forward PE ‘ कंपन्यांच्या औद्योगिक घडामोडी, मूलभूत विश्लेषण आदी अभ्यास करावा लागतो.
तर मित्रांनो हे होतं पीई रेश्यु बद्दल.
याच विषयावरील आमचा युट्युब व्हिडीओ :
धन्यवाद