कंपन्यांमधून 500%  ते  100% परताव्यानंतर FII नी घेतली एक्झिट.

FII Investment in Indian Stock Market
Image : Pexels


आर्थिक वर्ष 2021 मध्ये कोरोनामुळे अनेक उद्योगव्यवसायांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला असला तरी काही कंपन्यांची मात्र याच काळात चांगली भरभराट झाली होती. 
आणि याचं प्रतिबिंब शेअरमार्केटमध्ये सुद्धा उमटलं होतं. कारण गेल्यावर्षी मार्च महिन्यातील महाघसरणीनंतर शेअरमार्केटने घेतलेल्या झेपेत अनेकांनी चांगली कमाई करून घेतली. नेमक्या याच वेळी येऊ घातलेल्या परिस्थितीचा योग्य अंदाज घेऊन परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजे FII नी वेळ साधून ‘त्या’  कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती.
हे सगळं आता सांगण्याचं कारण म्हणजे आता चांगला परतावा दिल्यानंतर मात्र FII नी या कंपन्यांना निरोप दिला आहे. अर्थात यामधील आपली गुंतवणूक त्यांनी घटवली आहे किंवा काढून घेतली आहे.

कोणत्या आहेत या कंपन्या ?

खरं त्या काळात FII नी जवळपास 2 लाख सत्तर हजार कोटींची गुंतवणूक भारतीय भांडवली बाजारात केली होती आणि यामध्ये जवळपास 80 पेक्षा जास्त कंपन्या होत्या आणि यापैकी जवळपास 33 कंपन्या अशा होत्या ज्यांनी मार्च 2020 पासून वर्षभरात 100% ते 500% परतावा दिला आहे आणि ज्यामधून कंपन्यांमधून अलीकडेच FII नि गुंतवणूक कमी केलेय अथवा काढून घेतली आहे.
FII Investment in Indian stock Market
Data Source: Ace Equity

यामधील बहुतेक कंपन्या या स्मॉल आणि मिडकॅप वर्गातील आहेत. लक्षात घ्या कि FII ची गुंतवणूक कधीही आंधळेपणाने अनुसरु नये कारण त्यांच्या प्रत्येक व्यवहाराची वेळोवेळी नोंद ठेवणे सर्वसामन्यांना कठीण आहे आणि FII ची बरेच व्यवहार हे  झटक्यात होत असतात म्हणजे एकाच दिवशी ठराविक कंपनीतील आपला हिस्सा ते झटकन विक्री करून कमी करू शकतात ज्यामुळे त्या समभागांत मोठी घसरण येऊ शकते आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारास त्याचा फटका पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जर आपली अशा प्रकारे गुंतवणूक असेल तर FII च्या पुढील कृतीची वाट न बघता वेळीच नफा निश्चिती केलेली योग्य असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *