क्रिप्टोचलना व्यवहारांवर बंदी आणण्यास NPCI चा नकार. NPCI denies to ban crypto in india
नेशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने भारतात क्रिप्टोचलनावर बंदी आणण्यास नकार दिला आहे (NPCI denies to ban crypto in india) आणि या बाबतचा निर्णय बँकांनी स्वतःच्या पातळीवर घ्यायचा आहे असं म्हटलं आहे. त्यामुळे आता क्रिप्टोचलनामध्ये देण्या-घेण्याचे अर्थात पेमेंट संदर्भातील व्यवहार करण्याबाबतचे निर्णय बँकांनी आपापल्या पातळीवर घ्यायचे आहेत. अर्थात या साठी बँकांना आपल्या अंतर्गत नियमांचा आधार घ्यावा लागणार आहे.
NPCI चे हे धोरण अनेक अर्थांनी महत्वाचं आहे, कारण आधीच अनेक बँकांनी क्रिप्टोचलनाधारित व्यवहारांवर निर्बंध आणले आहेत म्हणजे क्रिप्टोचलनामध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्या बँकांचे नेटबँकिंग, युपीआय आदी सेवांचा पर्याय गुंतवणूकदारास नाही आहे.ज्या बँकांनी असे निर्बंध घातले नाहीत त्यांच्याच सेवांचा पर्याय सध्या गुंतवणूकदारास उपलब्ध आहे.
परंतु आता NPCI च्या याबाबतच्या स्पष्टोक्ती नंतर बँका कशाप्रकारे धोरण आखतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.