23 मे रोजी NEFT सेवा काही तासांसाठी बंद.
NEFT Downtime

NEFT Downtime RBI
Image by mohamed Hassan from Pixabay 


23 मे रोजी NEFT सेवा काही तासांसाठी उपलब्ध नसेल अशी माहिती RBI कडून देण्यात आली आहे.

NEFT सेवेत तांत्रिक सुधारणा तसेच सेवा आणखी अद्ययावत करण्याच्या दृष्टीने कामकाज चालणार असल्याने 22 मे ला रात्री 12 वाजल्यापासून 23 मे रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत NEFT सेवा बंद असणार आहे त्यामुळे ज्या कुणाला NEFT द्वारे पैसे पाठविण्याची योजना असेल तर त्यांनी सदर वेळापत्रकानुसार त्या योजाव्यात.रिझर्व्ह बँकेकडून परिपत्रकाद्वारे सदर माहिती आपल्या ट्विटर खात्यावरून जाहीर केली आहे.


NEFT System Upgrade – Downtime from 00.01 Hrs to 14.00 Hrs. on Sunday, May 23, 2021https://t.co/i3ioh6r7AY

— ReserveBankOfIndia (@RBI) May 17, 2021


दरम्यान या कालावधीत RTGS सेवेत कोणताही खंड पडणार नसून ती मात्र नेहमीप्रमाणे कार्यान्वयित असेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *