आद्याक्षरांनी ओळखल्या जाणाऱ्या कंपन्यांच्या नावामागचं मूळ
(Name of the fmcg companies in india)
(Name of the fmcg companies in india) क्षेत्र स्टॉक मार्केट असो वा मग एफएमसीजी किंवा रिटेल वगैरे सारखं इतर कोणतंही. बऱ्याचदा कंपन्यांचा उल्लेख करताना आपण त्याचं जे नाव वापरत असतो ते त्या कंपनीच्या मूळ नावाच्या आद्याक्षरांनी संक्षिप्त स्वरुपात म्हणजेच इनीशिअल्सने बनलेले असतं आणि बरेचदा याची आपल्याला कल्पनाही नसते किंवा कधी त्या नावामागे काही संकल्पना , तर्कसंगती असते जी बऱ्याच वेळेला आपल्याला काहीच माहित नसते. कंपनीचं खरं नाव आपल्याला माहीतही नसतं.
म्हणजे बघाना, भारतीय कंपन्यांमध्ये सर्वात जास्त “मिम्स’ बनवलं जाण्याचा मान ज्या आय टी सी ( ITC ) कंपनीला मिळालाय त्या मुळच्या सिगारेट कंपनीचं मूळ नाव इंडिया टोबॅको कंपनी ( पूर्वीची इम्पेरीयल टोबॅको कंपनी ) असं आहे हे बऱ्याच जणांना माहीतही नसेल.
भारतीय कंपन्यांची मूळ नावे ( full form of popular indian companies )
आज आपण अशाच आपापल्या क्षेत्रातील काही नामवंत कंपन्यांची नवे जी आपल्याला माहित आहेत आणि त्यानावामागे नक्की काय मूळ आहे हे आज आपण महिती करून घेणार आहोत.
अमूल ( AMUL )आणंद मिल्क युनियन लिमिटेड ( ANAND MILK UNION LIMITED )
NDTV ( एनडीटीव्ही )न्यू दिल्ली टेलीव्हीजन ( New Delhi Television )
भेल (BHEL )भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड ( Bharat Heavy Electric Limited )
डाबर ( Dabur )डाक्टर बर्मन ( Daktar Burman )
डिएलएफ ( DLF )दिल्ली लँड एन्ड फायनान्स (Delhi Land And Finance)
देना बँक ( Dena Bank )देवाकरण नानजी ( Devakaran Nanjee )
सिप्ला (CIPLA )केमिकल , इंडस्ट्रीअल एन्ड फार्मास्युटिकल लॅबोरेटरीज( Chemical and Pharmaceutical Laboratories )
एक्झिम इंडिया ( Exim India )इम्पोर्ट एक्स्पोर्ट बँक ऑफ इंडिया ( Import Export Bank of India )
एक्साइड ( Exide Battery )एक्सेलन्ट ऑक्साईड ( Excellent Oxide )
गेल ( GAIL )गॅस ऑथोरिटी ऑफ इंडीया ( Gas Authority Of India )
आयसीआयसीआय बँक ( ICICI Bank )इंडस्ट्रीअल क्रेडीट एन्ड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(Industrial Credit And Investment Corporation of Indian)
ग्रासिम ( Grasim )ग्वालीअर रेयॉन एन्ड सिल्क मिल्स ( Gwalior Rayon and Silk Mills )
इन्फोसिस ( Infosys )इन्फोर्मेशन सिस्टम ( Information System )
जेएसडब्लू ( JSW )जिंदाल साउथवेस्ट ग्रुप ( Jindal South West Group )
एमआरएफ ( MRF )मद्रास रबर फॅक्टरी ( Madras Rubber Factory )
एमडीएच ( MDH )महाशिअन दि हट्टी ( Mahashian Di Hatti )
पेटीएम ( PayTM )पे थ्रू मोबाईल ( Pay Thru Mobile )
OYO ( ओयो )ऑन योर ओन रूम्स (On Your Own Rooms )
पी व्ही आर ( PVR )प्रिया व्हिलेज रोडशो लिमिटेड ( Priya Village Roadshow Limited )
रॅनबॅक्सी ( Ranbaxy )रणधीरसिंह गुरुबक्ष ( Randhirsinh Gurubax )
आरपीजी ( RPG )रामप्रसाद गोएंका ( Ramprasad Goenka )
विप्रो ( WIPRO )वेस्टर्न इंडिया प्रॉडक्ट्स लिमिटेड ( Western India Products Limited )
यादी याहूनही मोठी आहे, आम्ही यापुढेही अशी माहिती आपल्याला पुरवत राहूच.. सध्या हि माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा.
धन्यवाद !
(लिखाणासाठी लागलेला वेळ : 1 तास 50 मिनिटे )