हि गाडी चुकवू नका ! ( Best investment opportunities in marathi )
वेळेत न पोहोचल्याने थोडक्यात चुकणारी ट्रेन शेवटची नाहीये हे माहित असूनही जीव धोक्यात घालून धावत-पळत ती पकडण्याचा प्रयत्न करणे निश्चितच मूर्खपणाचं.. पण त्याचनुसार स्थानकात आपण बसून असताना आलेली रिकामी ट्रेन जाऊ देणं सुद्धा शहाणपणाचं नक्कीच नाही.
तुम्ही विचार कराल, नक्की काय आहे विषय ? कशाचा संदर्भ आहे वरच्या प्रसंगांना ?
अगदी थेट थोडक्यात सांगायचं तर हे संधींबद्दल आहे. आयुष्यात आपल्यासमोर अनेक संधी येतात. काही स्पष्ट दिसतात, लक्षात येतात तर काही संधी समोर असूनही जाणवत नाहीत. किंबहुना अशी एक संधी आपल्यासमोर आहे हे आपल्याला उमगतच नाही.
शेअरमार्केट (Investment in Stock Market ) संदर्भात सांगायचं तर तिथेही कोणतीही संधी अखेरची अशी नसते. एखाद्याने काही वर्षांपूर्वी केलेल्या गुंतवणुकीची फळे तो आता चाखत असेल तर ते पाहून दुसऱ्याने “हे मला का नाही जमलं” असा विचार करण्यापेक्षा अशीच एखादी संधी आपल्याला आता किंवा नजीकच्या काळात साधता येतेय का हे पाहायचं असतं. कारण गुंतवणुकीसाठी योग्य संधी नेहमीच असते, तुम्हाला फक्त त्यासाठी नियोजन करायचं असतं.
शेअरमार्केट असो किंवा इतर कोणतेही गुंतवणूक करण्याजोगे क्षेत्र, त्यात तेव्हा गुंतवणूक करणे जमलं नाही म्हणून चरफडत राहण्यापेक्षा आपण आज किंबहुना आताही जर आपण गुंतवणूक करण्यास सक्षम असाल तर योग्य ती संधी शोधू शकता.
सुरक्षित पण उत्तम परतावा देणारे गुंतवणूक पर्याय (Safe investments with high returns in India) शोधण्यात आपण फार मोठा काळ अक्षरशः वाया घालवतो. पण गुंतवणूक विभागणी करून सुरक्षितता आणि जोखीम याचं संतुलन साधून आपण बरंच काही साध्य करू शकतो. हे आपल्या मनातही येत नाही.
बरं हि झाली नेहमीची गोष्ट.. आणि त्यात 100% फॅक्ट आहे. पण आजच्या लेखाचा विषय ती ‘दुसरी गोष्ट’ आहे जीचा विचार मराठी माणूस गांभीर्याने करत नाही आणि मग वेळ निघून गेल्यावर स्वतःचं समाधान करायला आपल्याकडे असते वर सांगितलेली पहिली गोष्ट.
सुरवात एका उदाहरणाने करूया, सध्याचा मौसम आंब्याचा आहे (खरंतर सिझन संपतच आलाय म्हणा ) बरेचदा ऐकलं असेल, वाचलं असेल कि ‘तुम्हीं आंब्याचं झाड लावाल तर तुमची मुलं, नातवंडे त्या झाडाला लागणाऱ्या आंब्याची मजा घेऊ शकतील.’
पण..
मी लावलेल्या झाडाचे आंबे मला स्वताला खाता येतील का ?
आपल्याला असा प्रश्न पडत नाही कारण गुंतवणूक म्हणजे दीर्घ काहीतरी.. किंवा बऱ्याच वर्षांचा कालावधी.. तसंच म्हातारपणात आधार वगैरे हे आपल्या मनात पक्क बसलंय. अर्थात गुंतवणूक दीर्घकालीन असावी वगैरे ते सगळं खरंच आहे यात शंकाच नाही पण यात बरेचदा ती योग्यवेळीही व्हावी हे समजून घ्यायला आपण कुठेतरी कमी पडतो.
म्हणजे पहा, आयटी म्हणजेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्समध्ये गुंतवणूक करणे उत्तमच, आजही चाळीशी पार केलेले बरेचजण अगदी या कंपन्यांचे शेअर्स घेऊन गुंतवणुकीचा श्रीगणेशा करत असतात. पण याच वर्गातील लोकांनी त्यांच्या वयाच्या विशीत म्हणजे ऐंशी – नव्वदच्या दशकात जेव्हा हीच आयटी इंडस्ट्री उभारली जात होती अशाकाळात अगदी किमान रकमेची म्हणजे “माझे हे पैसे बुडाले तरी चालेल” अशा प्रकारे त्यांना झेपणारी गुंतवणूक संधी त्यावेळी साधली असती तर ?
म्हणजे ती गाडी चुकलीच ना ? नाही ती गाडी चुकवलीच.. म्हणजे गाडी स्थानकात येऊन उभी राहिली असताना आपण निवांत बसून राहिलो आणि तिला जाऊ दिलं.
काय झालं असतं जर त्यावेळी खुल्या आर्थिक धोरणानंतर उदयास आलेल्या नव-तंत्रज्ञान, ग्राहक केंद्रित उत्पादने बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये अशी अगदी स्व-क्षमतेनुसार जोखीम पेलू शकणारी गुंतवणूक या वर्गाने केली असती तर ?
तर..
“थेट सांगायचं तर त्यांनीच लावलेल्या आंब्याच्या झाडाला लागलेले आंबे त्यांना स्वतः आज चाखता आले असते.”
आणि समजा या कंपन्या बुडाल्या असत्या तर आधीच सांगितल्याप्रमाणे जोखीम तेवढीच घ्यायची जितकी सोसता येईल. म्हणजे फार फार तर आमचे ते पैसे बुडाले ज्याबद्दल तितकं वाईट वाटणे नाही.
Be updated : काळासोबत राहा
तर मित्रांनो हे सांगण्याचा हेतू हाच कि जगाच्या पाठीवर नव-नवीन बरंच काही उदयास येत असतं. त्यातील काही येतं, नवीन चमक निर्माण करतं आणि नष्ट सुद्धा होऊ जातं. तर काही मात्र अवघं जग कवेत घेऊ पाहतं. म्हणजे बघा, पेजर आणि मोबाईल यांचा उदय होण्याच्या काळात जास्त अंतर नव्हतं आणि आपापल्या आगमनाच्या वेळी दोन्ही शोध क्रांतिकारकच होते. पण मोबाईलच्या आगमनाने पेजरच्या अस्तित्वालाच नख लागलं.
कोणती क्रांती फक्त क्षणिक उजेड निर्माण करणारी आहे आणि कोणती खऱ्या अर्थाने जगाची कूस बदलवणारी आहे याचा कदाचित त्या-त्यावेळी अंदाज लावणे कठीण असतं पण एक गुंतवणूकदार म्हणून मला यामधून किमान जोखीम घेऊन नफ्याची शक्यता आहे का असा विचार करणारी मानसिकता आपल्यात यायला हवी. ती तशी नाहीये कारण आपण वय हा फॅक्टर विचारात घेत नाही. सगळं निवृत्तीसाठी हाच आपल्या गुंतवणुकीचा पाया असतो.
याचा अर्थ आहे ते सगळं डावावर लावणे असा मुळीच नाही. माझ्याजवळ असलेल्या हजार रुपयातील १0 रुपये हरवले तरी माझ्या आर्थिक आरोग्यावर त्याचा तितका काही परिणाम होणार नाही आणि ना माझ्या मनाला लावून घेण्याइतका त्याचा त्रास असेल.
आताही अगदी गुंतवणूक संधी म्हणून पाहता येईल असा एक पर्याय दिसतोय क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) म्हणजेच बिटकॉईन आणि सध्या धुमाकूळ घालत असेलेले डॉजकॉईन, एथेरियम सारखी आभासी चलने. क्रिप्टोकरन्सी किंवा बिटकॉईन आज दर दिवसाआड बातम्यांमध्ये दिसतं (Cryptocurrency News) पण हे नक्की आहे काय, हे आम्ही आमच्या आधीच्या लेखामध्ये सांगितलं आहेच. ज्यांनी तो लेख वाचला नसेल ते सदर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करू शकतात.
Image by WorldSpectrum from Pixabay |
गुंतवणूक संधी का तर अगदी फुटकळ वाटणाऱ्या रकमेतूनही यातून अवाढव्य परतावा मिळालाय. उदाहरणार्थ सांगायचं झालं बिटकॉईनपेक्षा चांगलं दुसरं उदाहरण नाही. दहा वर्षापूर्वी भारतीय चलनात अवघे तीन रुपये मूल्य असलेलं बिटकॉईन आज या क्षणी 45 लाख रुपये किंमतीचं झालंय. आताही पडद्याआड इंटरनेटवर लाखो व्यवहार होणाऱ्या या आभासी चलनाला आता खऱ्या जगातील भौतिक व्यवहारांसाठीसुद्धा मान्यता मिळू लागलेय हे टेस्ला सारख्या कंपनीने घेतलेल्या निर्णयातून दिसून आलंय.
सांगण्याचं तात्पर्य म्हणजे रोज शेकडो नवीन क्रिप्टचलने जगात येत असतात आणि नष्टही होत असतात म्हणजे शेअर मार्केटमध्ये एखादी कंपनीचा शेअर शून्य होणे हि तशी दुर्मिळ बाब पण इथे तसं नाही. शेअरमार्केट प्रमाणे इथे एखाद्या क्रिप्टोचलनाचा फंडामेंटल्स आपल्या समोर नसतो त्यामुळे आपण गुंतवणूक करत असलेलं एखादं क्रिप्टोचलन उद्या राहीलच असे नाही किंवा कदाचित उद्या तो लाखोंच्या किंमतीतही असू शकतं.
पण मग क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करावी कि नाही ?
( Investment In cryptocurrency is good ?)
याचं अगदी गुळमुळीत किंवा नरो वा कुंजरोवा थाटाचं उत्तर आम्ही देणार नाही.
आमच्या मते होय अगदी किमान अशी गुंतवणूक जोखीम इथे घ्यावी. किमान म्हणजे तीच जी या लेखात सुरवातीला सांगितली आहे. अशी रक्कम जी हरवली, बुडाली तरी त्याचा आपल्या रात्रीच्या झोपेवर परिणाम होणार नाही.म्हणजे गुंतवणूक अगदी हजार-पाचशे रुपये का असेत ना.
कारण शक्यता दोन आहेत.
पहिली, उद्या आपण गुंतवणूक केलेल्या क्रिप्टोमधील काही नष्ट होतील आणि आपली त्यामधील गुंतवणूक शून्य होऊ शकते ( आणि ती किरकोळ असेल तर त्याचं तितकं काही वाटणार नाही )
आणि दुसरी शक्यता.. कोण जाणे पण आपल्या या किरकोळ गुंतवणूक केलेल्या क्रिप्टोचलनातून उद्या एखादा बिटकॉईन, डॉजकॉईन, एथेरियम निर्माण झाला तर ?
तर फायनली,
मॉरल ऑफ द स्टोरी इज..
हि गाडी चुकवायची नाही. फार फार अंदाज चुकला तर काय होईल तर पुढे जाऊन गाडी सिग्नलला थांबेल, बंद होईल तेव्हा दुसरी गाडी पकडण्याचा पर्याय असेलच पण जर तसं न होता या गाडीने आपल्या वेळेनुसार वेग राखला तर मात्र आपण इतरांपेक्षा फार लवकर आपल्या मुक्कामी ( तेही आवडत्या ) पोहोचलो असू .
क्रिप्टोचलनात गुंतवणूक करण्यासाठी अनेक एक्स्चेंजेसचे पर्याय आज उपलब्ध आहेत. त्यापैकी WazirX या भारतातील आघाडीच्या आणि सर्वाधिक विश्वासार्ह असा दावा करणाऱ्या एक्स्चेंजेमध्ये तुम्ही खालील लिंकवरून खाते उघडू शकता. खाते उघडण्यासाठी कोणतेही चार्जेस आकारले जात नाहीत.
मित्रांनो ,
सदर लेखाचा उद्देश हा क्रिप्टोचलनात होऊ शकणारी गुंतवणूक हा असून तो ट्रेडिंग संदर्भात प्रोत्साहन देण्याबाबत नाही. गुंतवणुकीच्या बाबतीत इतरांना मिळालेले परतावे पाहून आपल्याला बरेच वेळेला “त्यावेळी गुंतवणूक केली असती तर ..” अशी एक खंत आपल्या मनाला सतावत असते आणि मग अजूनही उशीर नाही असं मनाला समजावून आपण त्यावेळी गुंतवणूक करायला घेतो.
हि आपली आपल्या सर्वसामान्यांची नेहमीची सरधोपट पहिली गोष्ट. आपल्याला जमत नाही किंवा खरंतर आपण जमवून आणत नाही ती दुसरी गोष्ट जी आज तुमच्या समोर या लेखातून मांडण्याचा प्रयत्न केलाय. कारण संधी मग त्या व्यावसायिक असो व गुंतवणूक (Best investment opportunities in india ) पण त्या साधण्यापेक्षा ओळखणे जास्त आव्हानात्मक असतं.
क्रिप्टोचलनात गुंतवणुकीसाठी खाते उघडण्याकरिता अनेक वेगवेगळ्या एक्स्चेंजेसचे पर्याय तुमच्या समोर आहेत त्यापैकी एक पर्याय वर दिलेल्या आमच्या रेफरल लिंकद्वारे आम्ही सुचवला आहे.
( वरील लेखात व्यक्त केलेली मते आमची स्वताची वैयक्तिक मते असून गुंतवणूक संदर्भात निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे इष्ट ठरेल )
लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा.
धन्यवाद.
(लिखाणासाठी लागलेला वेळ : 2 तास २३ मिनिटे )