how to start a start up in indiahow to start a start up in india

 स्टार्ट-अप कसं सुरु कराल ?
(How to register a startup in india)

आपल्या देशांत लाखो नवीन उद्योग व्यवसाय दरवर्षी सुरु होत असतात आणि त्यात काही हजारो स्टार्टअप्स असतात. आता तुम्हाला वाटेल हे नवीन उद्योग व्यवसाय आणि स्टार्टअप वेगळे कसे ? बऱ्याच जणांना नवीन उद्योग व्यवसाय सुरु करणे म्हणजे स्टार्टअप वाटू शकेल. (how to start a start up in marathi)

पण तसं नाहीये , स्टार्टअपची व्याख्या थोडी वेगळी आहे. What is Called a startup ?

जेव्हा तुम्ही नवीन उद्योग सुरु करता तेव्हा तो कोणताही असू शकतो. अगदी रस्त्यावर वडापावची गाडी सुरु करणे असो किंवा मग स्वतःचा बांधकाम व्यवसाय म्हणजे गृहनिर्माण वगैरे सुद्धा असु शकतो. पण मग या सगळ्यास सरसकट स्टार्टअप म्हणता येईल का ?

तर नाही.

मग स्टार्टअप म्हणजे काय ? What is Called a startup ?

उत्पादन – सेवा यासंदर्भात एखादी नवीन संकल्पना घेऊन येणारे नवउद्यमी किंवा प्रचलित सेवा उत्पादने वेगळ्या पद्धतीने ग्राहकांसमोर मांडणे म्हणजे  स्टार्टअप असे म्हणता येईल.

उदाहरणार्थ, 

जेवणाचे डबे बनवून पोहोचवण्याचा व्यवसाय हा तसा नेहमीचा, तुमच्या ओळखीतल्या कुणीतरी ते सुरु केलं म्हणू ते स्टार्टअप म्हणता येईल का ? तर नाही.

पण समजा तोच व्यवसाय कुणी एखाद्याने अनेक गृहिणी किंवा पाककौशल्य असणाऱ्या व्यक्तींशी संधान बांधून ऑनलाईन, एपद्वारे तसेच “डायल ए मील” ( Dial a Meal ) अशा संकल्पनेवर आधारित वेगवेगळ्या विभागातील व्यक्तींना त्या-त्या विभागातील पाकनिपुण व्यक्तींकडून बनवल्या जाणाऱ्या पाककृतींचं मार्केटिंग करून त्यानुसार ऑर्डर आणि डिलिव्हरी यांचे जाळे उभारून सेवा देऊ केली तर त्यास नक्कीच स्टार्टअप म्हणता येईल. 

अशा नवनवीन संकल्पना प्रत्येकजण आपापल्या क्षेत्राशी संबंधित सेवा आणि उत्पादने पुरविण्यासाठी राबवू शकतो. 

संकल्पना तर स्पष्ट झाली, पण मग तुमच्या व्यवसायाची एक स्टार्टअप म्हणून ओळख कशी  बनवाल ? त्यासाठी कोणते सोपस्कार पार पडावे लागतात ? कुठे नोंदणी करावी लागते. 

तुमच्याकडे सुद्धा आहे अशी एखादी संकल्पना  ? चला पाहूया  स्टार्टअप म्हणून लोकांसमोर येण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल.

स्टार्टअप कसं सुरु कराल ? How to register a startup in india

  • सर्वप्रथम तुमच्या कंपनीची ओळख बनवा, म्हणजे तुमची कंपनी प्रोप्रायटरशिप फर्म आहे कि पार्टनरशिप ? किंवा लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप  (LLP) कि वन पर्सन कंपनी , कि थेट प्रायव्हेट लिमिटेडसाठी जाणार ?यामधील जे नक्की असेल त्यानुसार मग आधी नियमानुसार नोंदणी करून घ्या आणि तसे प्रमाणपत्र , कंपनीचे पॅन ( PAN )  आणि इतर दस्तावेज आणि कागदपत्रांची तयारी करून घ्या.
 
  • यानंतर तुम्हाला 👉 स्टार्टअप इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या कंपनीची एक नवीन स्टार्टअप म्हणून नोंदणी करायची आहे हि पूर्णतः ऑनलाईन पद्धत आहे. जिथे तुमची ईमेल आणि ओटीपी पासून सुरवात होऊन सर्व आवश्यक माहिती भरून तुमच्या कंपनीचे प्रोफाईल बनवले जाते.आणि त्यानंतर सरकारच्या स्टार्टअप साठी असलेल्या विविध योजना, धोरण यांच्या बद्दल तुम्हला माहिती मिळू शकते.
 
  • यापुढील पायरी आहे DPIIT मान्यता मिळवणे. उद्योग आणि देशांतर्गत व्यापार विकास विभागाची म्हणजेच DPIIT ( Department for Promotion of Industry and Internal Trade) कडून रेकग्निशन म्हणजेच मान्यता मिळवणे यासाठी महत्वाचं कि याद्वारे त्या-त्या क्षेत्राशी संबंधित बौद्धिक मालमत्ता, विविध कायदे , धोरण, नियम तसेच कंपनीमध्ये करता येणारे बदल इत्यादी संदर्भातील माहिती सहज उपलब्ध होते. रेकग्निशन मिळविण्यासाठी त्याच वेबसाईटवर 👉  Get Recognized   या पर्यायावर क्लिक केल्यावर समोरील अर्जात (Startup Recognition Form) योग्य ती आवश्यक माहिती भरून सबमिट करावा. 
 
  • यानंतर पुढील कागदपत्रांची पूर्तता करावी लागते अर्थात वेबसाईटवर अपलोड करावे लागतात.
  1. कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र ( Incorporation/Registration Certificate of your startup)
  2. संचालकांची माहिती (Details of the Directors)
  3. कंपनीचं काम / व्यवहार आधीच सुरु झाला असेल तर त्या पुष्ठ्यर्थ काही माहिती, कागदपत्रे.उदा.वेबसाईट, सुरवातीपासून वापरात असलेली स्त्रोत वगैरे.
  4. आपल्या संकल्पनेचे पेटंट, ट्रेडमार्क घेतले असेल तर त्याबाबत माहिती.
  5. पॅन क्रमांक ( PAN Number )
  • ओळख क्रमांक (Recognition Number) बस्स..! वरील बाबींची पूर्तता केल्यावर तुम्हाला ओळख क्रमांक अर्थात Recognition Number प्राप्त होतो आणि तुम्ही दिलेली माहिती आणि कागदपत्रांची पडताळणी केली गेल्यानंतर म्हणजे साधारणता दोन दिवसांच्या कालावधीनंतर तुम्हाला प्रमाणपत्र प्राप्त होतं.
महत्वाचं, 
यादरम्यान तुम्ही देत असलेली माहिती आणि त्याअनुषंगाने पुरवलेली कागदपत्रे चुकीची किंवा बनावट असू नये याची काळजी घ्या कारण तसे आढळल्यास तुम्हाला तुमच्या स्टार्टअप मधील पेडअप कॅपिटलच्या 50 टक्के ( किमान रु. 25000) इतका दंड आकाराला जाऊ शकतो.

मित्रांनो वरील माहिती होती स्टार्टअपच्या नोंदणी साठी काय करावे आणि कुठून सुरवात करावी यासंदर्भात.यापूर्वी याकरिता लागणाऱ्या कागदपत्रांची यादी काहीशी मोठी होती ज्यातून सरकारने आता कपात केली आहे. म्हणजेच स्टार्टअपसाठी आता खाली दिलेल्या  कागदपत्रांची गरज नाही.

  1. आपल्या उत्पादन आणि सेवे संबंधातील शिफारसपत्रे ( Letter of Recommendations )
  2. निधी जमाविण्याबाबत पत्र (Letter of funding)
  3. उद्योग आधार
  4. सूक्ष्म, लघु , मध्यम उद्योग प्रमाणपत्र ( MSME Certificate )
  5. जीएसटी प्रमाणपत्र ( GST Certificate )

आणि सर्वात शेवटी पण तेवढंच महत्वाचं, 

स्टार्टअप्सना नोंदणी केल्यापासून सुरवातीच्या तीन वर्षासाठी प्राप्तिकरातून सूट देण्यात आली आहे. पण सदर लाभ घेण्यासाठी त्यांना  IMB (Inter-Ministerial Board) कडून प्रमाणित व्हावं लागतं. एक एप्रिल 2016 नंतर नोंदणी झालेले स्टार्टअप्स यासाठी पात्र असतील.
मित्रांनो जर कोणतीही नवीन उद्योग संकल्पना तुमच्याकडे असेल तर वाट पाहू नका , कामाला लागा. एकट्याने जमणार नसेल तर मित्र-मित्र एकत्र या. उद्यमी बना.
माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *