tata acquires big-basket

बिगबास्केटवर टाटांचा ताबा.
Tata acquires majority stake in BigBasket


टाटा डिजिटलकडून ऑनलाईन ग्रोसरी क्षेत्रातील आघाडीची बिगबास्केटमध्ये बहुतांश हिस्सा खरेदी केला आहे. सदर आर्थिक व्यवहारातील आकडेवारी जाहीर झाली नसली तरी नियामाकांना दिलेल्या महितीनुसार टाटासमूहाकडून बिग बास्केटमध्ये 66 % हिस्सेदारी मिळवली असल्याचे समजते.

या व्यवहारामुळे आता टाटा समूह या क्षेत्रातील दिग्गज समजले जाणारे रिलायन्स रिटेल , अमेझॉन, फ्लीपकार्टसारख्या कंपन्यांचा बरोबरीने सामना करू शकेल.बिगबास्केटच्या संचालक मंडळाने या व्यवहारास मागील आठवड्यातच मंजुरी दिली होती आणि तसंही टाटाकडून या स्टार्ट अपमध्ये सुरवातीच्या काळात 20 कोटी डॉलर्सची सुरवातीची गुंतवणूक केली आहेच आणि बिगबास्केटमधील सर्वाधिक हिस्सेदारी असलेले चिनस्थित अलिबाबा समूह (Alibaba Group) तसेच एक्टीस एलएलपी आधीच बाहेर पडले आहेत.
बिगबास्केट आणि ऑनलाईन फार्मसी वन एमजी (1 Mg ) नंतर टाटा समूहाचीनजर आता फिटनेस स्टार्टअप क्योरफिट (Curefit) वर असेल.म्हणजे आपल्या येऊ घातलेल्या बहुचर्चित सुपर एपसाठी शक्य ती मोर्चेबांधणी टाटा समूहाकडून सरू आहे.
एकंदरीत सांगायचं काय, तर येऊ घातलेल्या नवऔद्योगिक क्षेत्रात पूर्ण शक्तीनिशी उतरण्याचे टाटा समूहाने आता ठरवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *