free insurance with sipfree insurance with sip

एसआयपीवर विमा ऑफर Free term Insurance with SIP हा प्रकार आता लोकप्रिय होऊ लागलाय. काय आहे नक्की हा प्रकार ते आज आपण समजून घेऊया.


कोरोना काळात विम्याची मागणी वाढली आहे. त्याच बरोबर या काळात, अनेकांनी थेट इक्विटीमध्ये गुंतवणूक करायला सुरवात केली तर काहींनी एसआयपीद्वारे गुंतवणूक करणे पसंत केलंय.एकूण परिस्थिती पाहता समाजात आरोग्याबाबत जागरूकता वाढू लागलेय तसेच गुंतवणूक आणि विम्याबाबातही. विमा म्हटलं कि या पूर्वी इन्शुरन्स कव्हर आणि अनेक वर्षानंतर मॅच्युरिटीच्या वेळी मिळणारा परतावा असा काहीसा प्रकार लोक विचारात घ्यायचे. पण आता परिस्थिती बदलेलेय.

नवा पर्याय Free term Insurance with SIP

पण आता लोकांना गुंतवणूक आणि विमा या दोन भिन्न गोष्टी आहेत हे समजू लागलंय आणि म्हणूनच अनेकजण मुदत विमा अर्थात टर्म प्लान ला पसंती देऊ लागले आहेत.आता जरी मुदत विमा असला तरी त्याचेही प्रीमिअम भरावे लागतेच. मग अशावेळी कोरोना काळात काही म्युच्युअल फंड कंपन्यांनी एसआयपीसह विमा संरक्षण द्यायला सुरवात केली आहे. म्हणजे एसआयपीद्वारे केलेल्या गुंतवणुकी सोबत विमा मोफत स काहीसा प्रकार. यामध्ये एसआयपी रक्कम आणि मुदतीच्या आधारावर विमा संरक्षण ठरवले जातं.


काय आहे एसआयपीसह विमा ( What is Free term Insurance with SIP in Marathi )


विनामूल्य विमा म्हणजे जे एसआयपी सुरू करताना तुम्हाला निवडावा लागतो. अनेक फंड हाऊसेसच्या आपल्या इक्विटी आणि हायब्रिड योजनांवर मोफत विमा देऊ करत आहेत. 18-51 वयोगटातील लोकांना या योजनेचा लाभ घेता येतो. यामध्ये, वैद्यकीय तपासणीची गरज नसते. कारण ही एक समूह विमा पॉलिसी ( ग्रुप इन्श्युरन्स ) आहे. मात्र मिळणारे विमा संरक्षण 55 वर्षांच्या वयापर्यंत वैध असेल. म्हणजे समजा, गुंतवणूकदाराने वयाच्या 51 वर्षी 10 वर्षांची एसआयपी सुरू केली तरी त्यास विमा संरक्षण मात्र योजनेच्या कमाल मुदती पर्यंत म्हणजे वयाच्या 55 वर्षांपर्यंतच उपलब्ध असेल. अर्थात काही कंपन्या 60 वर्षांच्या वयापर्यंत सुद्धा हि योजना देऊ करत आहेत.


विमा कव्हर किती? (What will be the insurance cover)


यामध्ये एसएसआयपीची रक्कम मुख्य निकष मानला आहे ज्यानुसार काही म्युच्युअल फंड हाऊसेस पहिल्या वर्षी एसएसआयपीच्या 20 पट रकमेचे विमा संरक्षण देत आहेत.आणि दुसऱ्या वर्षी गुंतवणुकीच्या रकमेच्या 75 पट तर तिसऱ्या वर्षी 120 पट अशी मर्यादा आहे. पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडनुसार, विमा संरक्षण मासिक एसआयपीच्या 20 ते 120 पट असेल.ज्याची कमाल मर्यादा 50 लाखांपर्यंत असू शकेल.


आपण हे उदाहरणाद्वारे समजून घेऊया, समजा एखाद्या व्यक्तीने 10 हजार मासिक एसआयपी सुरू केली.तर तीस पहिल्या वर्षी विमा कव्हर एसएसआयपीच्या 20 पट म्हणजेच 2 लाख रुपये असेल. आणि दुसऱ्या वर्षी, एसएसआयपीच्या 75 पट म्हणजेच 7.5 लाख रुपयांचे तर, तिसऱ्या वर्षी, 120 पट म्हणजेच 12 लाख रुपयांपर्यंतचे कव्हर मिळेल. यानुसार, जर एसआयपी करणारी व्यक्ती तिसऱ्या वर्षी कोणत्याही कारणामुळे मरण पावली तर त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीला म्युच्युअल फंड युनिटसह विम्याची रक्कम मिळेल.


योजनेच्या अटीं (Terms & Conditions for Free term Insurance with SIP )


बरं यात काही अटीं आहेत. या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी , गुंतवणूकदारांस किमान 3 वर्षे नियमितपणे गुंतवणूक करावी लागेल. जर एसआयपी तीन वर्षापूर्वी बंद झाला तर विम्याचे लाभ संपुष्टात येतील. त्याच वेळी, तीन वर्षे चालल्यानंतर एसआयपी बंद केल्यानंतरही त्याला विम्याचा लाभ मिळत राहील. तथापि, गुंतवणूक मोडल्यास म्हणजेच विड्रावलनंतर, विमा संरक्षण रद्द किंवा विम्याचे कव्हरेज रक्कम मर्यादा कमी होऊ शकते.अर्थात प्रत्येक फंड हाऊसचे नियम वेगवेगळे असू शकतात.


कोणती म्युच्युअल फंड हाऊसेस देत आहेत एसआयपीसह मोफत विमा संरक्षण ? ( Funds that offer Free term Insurance with SIP )


काही निवडक म्युच्युअल फंड्स एसआयपीसह मोफत विमा संरक्षण योजना देत आहेत ज्यामध्ये निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड, पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय प्रूडेंशियल,एसआयपी इन्शुरन्स, एसबीआय सीप इन्श्योर आणि आदित्य बिर्ला सनलाइफ सेंचुरी एसआयपी हे मुख्य फंड्स आहेत.


कुणासाठी योग्य

जर तुम्ही म्युच्युअल फंड गुंतवणूकीचा दीर्घकाळासाठी म्हणजे अगदी निवृत्तीवयापर्यंत विचार करत असाल तर सदर योजनातुमच्या साठी योग्य राहील कारण यामध्ये गुंतवणूक मोडल्यास म्हणजेच विड्रावलनंतर, विमा संरक्षण रद्द किंवा विम्याचे कव्हरेजरक्कम मर्यादा कमी होऊ शकण्याचे प्रयोजन आहे. म्हणजेच कमाल विमा संरक्षण हे वयोमर्यादा 55 पर्यंत असल्यास तुम्ही त्यानंतर गुंतवणूक काढून घेत असाल तर ते योग्य असेल आणि तसंही तोपर्यंत तुम्हाला विमा संरक्षण मिळालेले असेलच.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा. धन्यवाद !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *