राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala ) यांच्या प्रत्येक गुंतवणूक कृतीची चर्चा होतच असते. त्यांनी एखाद्या कंपनी केलेली गुंतवणूक असो व निर्गुंतवणूक, त्याचा प्रभाव त्या कंपनीवर तसेच सर्वसामान्य गुंतवणूकदारांवर दिसून येतो. नुकतच झुनझुनवाला यांनी एका धातू व मायनिंग क्षेत्रातील एक स्मॉलकॅप कंपनी राघव प्रॉडक्टीव्हीटी एनहान्सर ( Raghav Productivity Enhancers ) मध्ये तब्बल 31 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

कंपनीने याबाबत माहिती दिली. आणि ही बातमी बाहेर पडताच सोमवारी Raghav Productivity Enhancers कंपनीला थेट अपर सर्किटच (Upper Circuit) लागलं. आणि आज मंगळवारी सुद्धा कंपनीला अपर सर्किट (Upper Circuit) लागलंय.

कंपनीने असं सांगितलं की, प्रीफरेंशियल अलॉटमेंटद्वारे राकेश झुनझुनवाला कंपनीचे 30.9 करोड रुपयाचे 6 लाख कम्प्लसरी कंवर्टिबल डिबेंचर्स (CCD) खरेदी करणार आहेत.

कंपनीबद्दल जाणून घेऊया : Raghav Productivity Enhancers

राघव प्रॉडक्टीव्हीटी एनहान्सर (Raghav Productivity Enhancers) ही जयपुरस्थित कंपनी आहे. ही रॅमिंग मास निर्मिती मधील देशातील सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे. Ramming Mass चा वापर स्टील प्लांडमधील इंडक्शन फर्नेसमध्ये केला जातो. जो ग्लास, सेरेमिक, आर्टिफिशिअल मार्बलस, सेमी कंडक्टर, इलेक्ट्रोड, सोलर, पेंट आणि दुसऱ्या इंडस्ट्रीत काम करणाऱ्या हाय ग्रेड क्वार्ट्स पाउडर बनवण्यास वापरला जातो. कंपनीची या क्षेत्रातील निर्यात 28 देशांना आहे.

मागील काही दिवसांपासून बिग बुल राकेश झुनझुनवाला हे मेटल्स शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहेत. पहिल्या तिमाहीमध्ये राकेश झुनझुनवाला यांनी SAIL मध्ये 1.39 टक्के हिस्सेदारी घेतली आहे. याशिवाय राकेश झुनझुनवाला ऍण्ड असोसिएट्सजवळ पोर्टफोलिओ मध्ये 38 स्टॉक्स असून जी एकूण 20,294 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *