Top fii in india in marathiTop fii in india in marathi

तुम्ही शेअर बाजारात रस घेऊ लागला असाल, त्या संदर्भातील बातम्या, घडामोडींवर लक्ष तुमचं असेल तर परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच एफआयआय (FII ) बद्दल अनेकदा वाचायला, ऐकायला मिळत असेल. एफआयआय म्हणजे परदेशांतील गुंतवणूक संस्था ज्या आपल्या देशातील शेअर बाजारात गुंतवणूक करतात अशी साधी सरळ व्याख्या करता येईल. आणि हे तसं बऱ्याच जणांना माहीतही असेल. पण या संस्था म्हणजे नक्की कोण ? त्यांची नावे, त्या कोणत्या देशातील असतात हे आपण बरेचदा माहिती करून घेत नाही.म्हणून आज आपण पाहूया कि भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणारे हे एफआयआय (FII ) नक्की आहेत कोण.(Top fii in india in marathi )

सध्याच्या स्थितीनुसार भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणारे आघाडीचे दहा परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार. (List of foreign institutional investors in India)

सिंगापूर सरकार ( Government of Singapore ) : सिंगापूर सरकारच्या गुंतवणूक संस्थाकडून सध्या भारतीय शेअर बाजारातील बेचाळीस कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. आणि या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास ₹ 1,11,६८३ कोटी इतके आहे.

युरोपॅसिफिक ग्रोथ फंड (Europacific Growth Fund) : युरोपॅसिफिक समूहाच्या युरोपॅसिफिक ग्रोथ फंडाची सध्या भारतीय शेअर बाजारातील नऊ कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. आणि या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास ₹ 51,८३७ कोटी इतके आहे.

गव्हर्न्मेंट पेन्शन फंड ग्लोबल (Government Pension Fund Global) : नॉर्वे सरकारच्या या संस्थेची सध्या भारतीय शेअर बाजारातील सहासष्ट कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. आणि या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास ₹ ४९,६३२ कोटी इतके आहे.

व्हँगार्ड फंड (Vanguard Fund ) : जगातील आघाडीच्या संस्थात्मक गुंतवणूकदारांपैकी एक असलेली अमेरिकेतील व्हँगार्ड समूहाच्या या फंडाची सध्या भारतीय शेअर बाजारातील तेवीस कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. आणि या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास ₹ ३७,२९३ कोटी इतके आहे.

ऑपेनहेमर डेव्हलपींग मार्केट्स फंड (Oppenheimer Developing Market Fund) : अमेरिकेतील आणखी एका गुंतवणूकदार संस्थेच्या फंडाची सध्या भारतीय शेअर बाजारातील पाच कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. आणि या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास ₹ ३४,११७ कोटी इतके आहे.

नालंदा इंडिया फंड (Nalanda India Fund) : फक्त भारतातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचं लक्ष्य ठेवून स्थापित करण्यात आलेल्या गुंतवणूकदार संस्थेच्या या फंडाची सध्या भारतीय शेअर बाजारातील अठठावीस कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. आणि या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास ₹ २७,२११ कोटी इतके आहे.

स्मॉलकॅप वर्ल्ड फंड (Small-cap World Fund) : कॅपिटल समूहाच्या फक्त स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचं लक्ष्य ठेवून स्थापित करण्यात आलेल्या या फंडाची सध्या भारतीय शेअर बाजारातील चौतीस कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. आणि या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास ₹ २५,१७३ कोटी इतके आहे.

एलारा इंडिया ऑपॉर्च्युनिटीज फंड (Elara India Opportunities Fund) : एलारा कॅपिटलच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वाच्या ठरू शकणाऱ्या नवनवीन उद्योग-व्यवसायात गुंतवणूक करण्याचं लक्ष्य ठेवून स्थापित करण्यात आलेल्या या फंडाची सध्या भारतीय शेअर बाजारातील पंचवीस कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. आणि या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास ₹ २१,३०२ कोटी इतके आहे.

एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड (APMS Investment Fund) : मॉरीशसस्थित गुंतवणूकदार संस्थेच्या या फंडाची सध्या भारतीय शेअर बाजारातील नऊ कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. आणि या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास ₹ १६,००१ कोटी इतके आहे.

अमान्सा होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड (Amansa Holdings Private Ltd) : अमान्सा कॅपिटलच्या या फंडाची सध्या भारतीय शेअर बाजारातील बावीस कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. आणि या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास ₹ १४,१२५ कोटी इतके आहे.

तर मग हे आहेत भारतीय शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणारे आघाडीचे दहा परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार (Top fii in india in marathi) म्हणजेच एफआयआय. अर्थातच हे सद्याच्या परिस्थितीनुसार आहेत कारण या क्षेत्रात परिस्थिती नेहमी बदलत असते.

माहिती आवडली असल्यास नक्की शेअर करा. तुमचं मत , प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंटद्वारे सांगा. आमचे इतर माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

One thought on “भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणारे एफआयआय (FII ) नक्की कोण ?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *