rbi action against rbl bankrbi action against rbl bank

महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली मध्ये सुरवात झालेल्या आणि आता मुंबईत मुख्यालय असलेली सुमारे अठ्यात्तर वर्ष जुनी आरबिएल अर्थात रत्नाकर बँक सध्या चर्चेत आहे. काय प्रकरण आहे ते थोडक्यात पाहूया. (rbi action against rbl bank)

दोन दिवसांपूर्वी रिझर्व्ह बॅंकेने दूरसंचार विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाळ यांची या बॅंकेच्या संचालक मंडळावर अतिरिक्त संचालक म्हणून नेमणूक केली (Reserve Bank appoints Yogesh Dayal additional director on RBL bank board) आणि त्यानंतर त्याच दिवशी बँकेकडून एक्स्चेंजला कळविण्यात आले कि दीर्घकाळापासून बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले विश्ववीर अहुजा (Vishwavir Ahuja ) हे वैद्यकीय कारणांनी तत्काळ रजेवर गेले आहेत आणि तसेच सध्याचे कार्यकारी व्यवस्थापक राजीव अहुजा यांना अंतरिम व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहेत. अर्थात सदर नेमणूक संचालक मंडळाची त्यास मंजुरीच्या अधीन होती. जी अर्थातच मिळाली.

आर बि एल आणि आरबिआय काय सांगतात ?

त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत कार्यकारी व्यवस्थापक राजीव अहुजा यांनी बँकेची आर्थिक स्थिती चांगली तसेच सध्याच्या व्यवस्थापनाला रिझर्व्ह बँकेकडून पूर्ण सहकार्य लाभत असल्याचे सांगितलेय.त्याच बरोबर अधिक भांडवली निधीसाठी बँक सध्या अमरिकेतील फंडा सोबत बोलणी करत असल्याची चर्चा आहेच.

यानंतर या संदर्भात अनेक चर्चा आणि अटकळीना ऊत आलाय. बँकेच्या आर्थिक स्थितीबद्दलही चर्चा होऊ लागल्यात.

सर्वात आधी जेव्हा रिझर्व्ह बँकेकडून एखाद्या बॅंकेबाबत असं काही पाऊल हवापालट म्हणून निश्चितच उचललं जात नाही. अर्थात बऱ्याचदा हे करण्याची वेळ टळून गेल्यावर होत असतं पण तरीही हे होतं हे निश्चित. आर बि आय या बँकेतील अनियमितता तसेच बँकेत येणाऱ्या ठेवी आणि व्यवहारांतील सहजता तपासून पाहणार असल्याचे सुद्धा म्हटले जात आहे. याआधी सप्टेंबर महिन्यात रिझर्व्ह बँकेकडून आर बि एलला व्यवहारातील अनियामतता संदर्भात दोन कोटींचा दंडही आकारण्यात आला होता.(RBI imposes monetary penalty of ₹2 cr on RBL Bank)

पण नुकतंच आज 27 डिसेंबर रोजी रिझर्व्ह बॅंकेकडून मात्र बँकेची भांडवली स्थिती चांगली असून गुंतवणूकदार ठेवीदारांनी घाबरून जायचे कारण नसल्याचा निर्वाळा दिलाय.

अर्थात या  सगळ्याचा बँकेच्या शेअरवर जो परिणाम होणार तो झालाच आहे आणि आज बँकेला दोन वेळा लोअर सर्किट लागलं. (rbl bank shares hit lower circuit today)

सर्वात आधी मुद्दा येतो तो बँकेच्या आर्थिकस्थितीबाबत. कागदोपत्री काय दिसतं ? 

बँकेचा दुसऱ्या तिमाहीचा ( सप्टेंबर ) निकाल काय सांगतो.

सप्टेंबर तिमाहीत बँकेचा एकूण नफा 31 कोटी रुपये इतका होता. ज्यात वार्षिक आधारावर (YOY) 78 टक्क्यांची घट दिसून आलेय. या तिमाहीत बँकेचा एकूण NPA ( अनुत्पादित मालमत्ता ) 5.4 % होता. तेच प्रमाण पहिल्या म्हणजेच जून तिमाहीत 4.99 इतके टक्के होते. तसेच सप्टेंबर तिमाहीत बँकेची पुनर्रचना तरतूद म्हंणजेच टोटल री-स्ट्रक्चरिंग हे टोटल एडवांसच्या 3.39 टक्के होती, जी जून तिमाहीत 1.8 % होती. बँकेचे भांडवल पर्याप्ततेचे (Capital Adequacy Ratio) प्रमाण सप्टेंबर तिमाहीत 16.3 टक्के होते, जे एका वर्षापूर्वी 16.5 टक्क्यांनी वाढले होते. सुरक्षा तरतूद गुणोत्तर (Provision Coverage Ratio) हे 61.7% इतकं होतं.

दरम्यान ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आणि डीमार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमाणी या दोघांनी या आरबिएल बँकेत 10 हिस्सा खरेदी करण्याची विनंती रिझर्व्ह बँकेला केली असल्याची बातमी सुद्धा आहेच अर्थात यात खरच त्यांना स्वारस्य आहे कि सर्वसामान्य गुंतवणूकदारांना या खेळत पुन्हा आणण्यासाठी एक नेपथ्य हे येणारा काळच सांगेल. याचं कारण हे सगळं घडून येण्यासाठी असलेला मुहूर्त.

गुंतवणूकदारांनी मात्र अशा काळात शेअर मध्ये नव्याने मोठी गुंतवणूक करताना दहावेळा विचार करावा असं मात्र नक्कीच सांगता येईल. 

एक मुद्दा इथे महत्वाचा कि गुंतवणूक करताना आपण मुलभूत विश्लेषण करतो ज्याद्वारे कंपनीची ( किंवा या स्थितीत बँकेची ) आर्थिक स्थिती , नफ्याची क्षमता, ठेवींचे संरक्षण, अनुत्पादित मालमत्ता प्रमाण या सर्व गोष्ठी आपण पडताळून पाहतो पण आपण तेच पाहतो जे आपल्याला दाखवलं जातं. अर्थातच कागदोपत्री.

बऱ्याच गोष्ठी समोर येत नाहीत किंवा आणल्या जात नाहीत. कारण सत्यम कॉम्प्युटर  पीएनबी, जेट एअरवेज, आयएल एन्ड एफ एस, डीएचएफएल अशी अनेक उदाहरणं आहेत ज्या डबघाईला जाण्याआधी कागदावर सुदृढच दिसत होत्या किंवा दाखवल्या जात होत्या. आजही आरबिएल बँकेत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा मोठाच आहे. म्हणजे परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार ( FII ) आणि देशी संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) यांना नेहमीच हुशार म्हणावं अशीही परिस्थिती नसते. पण यापुढे ते रिझर्व्ह बँकेने निर्वाळा दिल्यानंतरही या बँकेत आपली गुंतवणूक कायम ठेवतात कि बाहेर पडतात हे महत्वाचं असेल.

असो काळ जसा पुढे जात राहील तसं तसं वास्तव समोर येईलच तूर्तास “वेट एन्ड वॉच” हेच धोरण ठेवणे योग्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *