ट्विटरद्वारे कसे कराल पेमेंट ? (how to make payment with twitter in marathi) तुमच्या ट्विटर खात्यावरून पैसे पाठवणे आणि स्वीकारणे आता शक्य आहे. कसं ते आज पाहूया.
एक काळ होता जेव्हा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस पैसे पाठवणे म्हणजे एक दिव्यच असायचं. पोस्टातून मनी ऑर्डरद्वारे पाठवलेले पैसे त्या व्यक्तीला गरज असताना मिळतीलच याचा काही नेम नव्हता. पुढे बँकिंग थोडं सुलभ झालं. बँकेच्या कोणत्याही शाखेतील खात्यात कुठूनही थेट पैसे भरता येणे शक्य झालं.
माहिती तंत्रज्ञान युग अवतरल्यावर इंटरनेट बँकिंग मधील एनइएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस सारख्या प्रकारांनी आर्थिक व्यवहारांत फारच सुलभता आणली. त्यानंतर अलीकडेच आलेल्या युपीआय (UPI) ने मात्र पैसे देवाण-घेवाण व्यवहारांत क्रांती केली. आता तर समाज माध्यमांच्या आपल्या खात्यावरुनही पैसे देवाण-घेवाण व्यवहार होऊ लागलेत. व्हाट्सएपने हि सेवा यापूर्वीच सुरूही केलेय. आणि आता ट्विटरनेसुद्धा आपल्या खात्यावरून पैसे पाठवणे आणि स्वीकारण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
ट्विटरवरून पेमेंट पाठवणे व स्वीकारण्यासाठी खाते कसे सेटअप कराल. (How to set up twitter for payment and tips )
सर्वप्रथम, आपल्या ट्विटर खात्याच्या प्रोफाइल इमेजवर क्लिक करून उजव्या कोपऱ्यातील ‘एडीट प्रोफाइल’ वर क्लिक करावे.
त्यानंतर खाली स्क्रोल करून ‘टिप्स’ वर क्लिक करावे.
नियम अटीं मान्य करून ( अर्थात तुम्ही त्या वाचू शकता ) टिप्स ‘एक्टिव्ह’ करून ‘Allow tips’ सक्षम करावे.
पैसे पाठविण्याचे स्वीकारण्याचे पर्याय ( twitter payment methods in marathi )
यानंतर पेमेंट पर्याय माहिती दिलेल्या सूचीमध्ये भरावी. उदा. पेटीएमच्या जागी तुमचा पेटीएमसोबत नोंदणीकृत असलेला मोबाईल क्रमांक द्यावा. तसेच क्रिप्टोचलनात स्वारस्य असेल तर तुमचे बिटकॉईन (Twitter payment bitcoin), एथेरीअम (Ethereum) , आदी एड्रेस तुम्ही नोंदवू शकता. याच सह रेझर पेचा (Razorpay) पर्याय सुद्धा उपलब्ध आहे.
पेमेंट कसे कराल ? (How to make payment with twitter in marathi )
आता तुमचं ट्विटर खातं तुम्ही पेमेंट पाठवणे आणि स्वीकारण्यासाठी सक्षम केलेलं आहेच पण ज्या ट्विटर खात्यास तुम्हाला पेमेंट पाठवायचं असेल त्या खात्यानेही ते केलेलं असलं पाहिजे.
मग कसे पाठवालं पैसे ? ( how to send money from twitter in marathi )
ज्या ट्विटर खात्यास पैसे पाठवायचे असतील त्या खात्याच्या प्रोफाइल इमेजच्या बाजूस ‘चलन’ सूचित करणारं एक चिन्ह असेल त्यावर टॅप / क्लिक करून उपलब्ध असलेल्या पेमेंट पर्यायांचा वापर करून तुम्ही त्या खात्यास पैसे पाठवू शकता.
या लेखाद्वारे तुम्हाला काहीतरी नवीन माहिती झालं असेल तर ते इतरांनाही शेअर करा, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही आमचे इतर लेख इथे क्लिक करून वाचू शकता.