air india vrs scheme in marathiair india vrs scheme in marathi

एअर इंडियाचे खाजगीकरण करण्याचं नक्की झाल्यापासूनच या कंपनीला सामावून घेणारा नवीन उद्योग समूह कंपनीच्या सध्याच्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती योजनेचा पर्याय देणार हि अटकळ होतीच. यथावकाश एअर इंडियाचे अजस्त्र धूड आपल्या आर्थिक दुखण्यासह टाटा समूहाकडे आलं. आणि पुढे टाटा समूहाने या कंपनीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या काही बदलांपैकी एक म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना आणली.(air india vrs scheme in marathi )

एअर इंडिया स्वेच्छानिवृत्ती योजनेचं स्वरूप. (air india vrs scheme in marathi )

आता टाटा समूहाची मालकी असलेल्या या विमानसेवा कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेसाठी पात्रता वय 55 वर्षांवरून 40 वर्षे केलं आहे. त्याच बरोबर कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर प्रोत्साहनपर रोख रक्कम देण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. याबाबत तसे कंपनीने बुधवारी परिपत्रक जारी केले आहे.

एअर इंडियाने आपल्या कर्मचार्‍यांना पाठवलेल्या या परिपत्रकात म्हटले आहे की, एअर इंडियाच्या विद्यमान नियमांनुसार, जर कंपनीचे कायमस्वरूपी कर्मचाऱ्याचे वय 55 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि त्याची कंपनीत 20 वर्षांपर्यंत सेवा झाली असेल, तर ते या स्वेच्छानिवृत्ती (VRS) योजनेचा लाभ घेऊ शकतात.

पण आता कंपनीने कर्मचाऱ्यांना अतिरिक्त लाभ देण्यासाठी एअर इंडियाने VRS साठीची वयोमर्यादा ५५ वरून ४० वर्षे केली आहे. यामध्ये S-3, S-5, S-7, E-0, E-1, E-2, E-3, E-4 आणि E-5 ग्रेडचे केबिन क्रू, S-2, S-5, S-6 तसेच S-7 ग्रेड लिपिक कर्मचारी आणि S-1, S-2, S-3, S-4 आणि S-5 ग्रेड अकुशल कर्मचारी यांचा समावेश असेल.

स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत आणि लाभ.( deadline & benifits of vrs scheme for air india employees in marathi)

एअर इंडियाने सदर केलेल्या परिपत्रकानुसार जे कर्मचारी 1 जून 2022 ते 31 जुलै 2022 पर्यंत VRS साठी अर्ज करतील त्यांना एकवेळ लाभाच्या रूपात एक्स-ग्रेशिया रक्कम देखील प्रदान केली जाईल. पण, जे कर्मचारी 1 जून ते 30 जून दरम्यान या VRS साठी अर्ज करतात, त्यांना मिळणाऱ्या अनुग्रह रकमेव्यतिरिक्त अतिरिक्त प्रोत्साहनपर रक्कम देखील दिली जाईल.

गेल्या वर्षी 8 ऑक्टोबर 2021 रोजी एअर इंडियाची बोली जिंकल्यावर, 27 जानेवारीला कंपनी टाटा समूहाकडे अधिग्रहित झाली. सदर स्वेच्छानिवृत्ती योजनेनंतर कंपनी नव्याने कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याची योजना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *