विविध आर्थिक घडामोडी, राष्ट्राची अर्थविषयक धोरणे यांचा परिणाम प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरीत्या समाजजीवनावर होत असतो. आणि आधीच चंचल असणाऱ्या भांडवली बाजारावर तर तो अधिक ठळक आणि तीव्रतेने दिसून येतो.( Economic Calendar Marathi )

म्हणूनच जर या क्षेत्रावर आपण नियमित नजर ठेवणारे असू, तर येणाऱ्या काळात आणि अगदी आज- उद्या आपल्या देशात त्याच बरोबरीने जगभरातील महत्वाच्या देशांत कोणत्या आर्थिक घडामोडी आणि अर्थविषयक धोरणे , आकडेवारी जाहीर होणे आहे ते आपल्याला माहित असायला हवं. आणि नुसत माहित असून चालणार नाही तर या माहितीची योग्य वेळी म्हणजे प्रत्यक्ष जाहीर होण्याआधी आपल्याला कल्पना असायला हवी.

म्हणूनच खालील आर्थिक दिनदर्शिकेत जगातील महत्वाचे देश म्हणजे अमेरिका, चीन, जर्मनी तसेच भारत; यामध्ये वेळोवेळी होणाऱ्या पूर्वनियोजित आर्थिक घडामोडी – धोरणे यांचे हे वेळापत्रक दिलेले आहे. जे तुम्हाला या क्षेत्रात नेहमी “सज्ज ” राहायला मदत करेल.

काही महत्वाच्या संज्ञा : (Important Economical Terms in marathi)

CPI : Consumer Price Index म्हणजेच किरकोळ महागाई निर्देशांक

WPI :Wholesale Price Index म्हणजेच घाऊक महागाई निर्देशांक

IPI : Industrial Production Index म्हणजेच औद्योगिक उत्पादन निर्देशांक

FX Reserves , USD : म्हणजे परकीय चलनसाठा, इथे भारताकडे असलेला अमेरिकन डॉलर्सचे प्रमाण अपेक्षित.

Job Data : रोजगार आकडेवारी

Monetary Policy Committee (MPC) : देशातील मध्यवर्ती बँकेच्या पतधोरण समितीचीची बैठक आणि त्या बैठकीची फलनिष्पत्ती अर्थात व्याजदर वाढ अथवा घट.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *