भारतीय पोस्ट विभागाच्या इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेने देशातील सर्वसामान्यांसाठी नवीन विमा योजना सुरू केली आहे. यासाठी इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेने टाटा एआयजीच्या अपघात संरक्षण विमा योजनेशी करार केला असून त्याद्वारे प्रति वर्ष 299 आणि 399 रुपयांमध्ये ही नवीन विमा योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे(Post office Accident Insurance Scheme in marathi).
या योजनेंतर्गत विमाधारकाला 10 लाख रुपयांचे विमाकवच प्राप्त होणार आहे. आज आपण या योजनेची सविस्तर माहिती घेणार आहोत.
खरंतर काही मराठी माध्यमांनी याआधी विमा योजनेची माहिती देण्याचा प्रयत्न केलाय पण तो अपूर्ण आहे. कारण जवळपास सर्वांनीच या योजनेचं खरं नाव दिलेले नाही. त्याऐवजी त्यांनी या योजनेला “पोस्ट ऑफिस अपघात विमा” असं संबोधलं आहे. ज्यामुळे या योजनेची माहिती मिळवताना अनेकांना कठीण जातं. आम्ही मात्र या योजनेचं नाव आणि तिची सविस्तर माहिती तुम्हाला या पोस्टमध्ये देत आहोत.
तर या योजनेचं नाव आहे “इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक ग्रुप एक्सिडेन्ट गार्ड पॉलिसी” (IPPB group accident guard policy in marathi) ज्यास सर्वसाधारणपणे “ग्रुप एक्सिडेन्ट गार्ड पॉलिसी” (Tata AIG group accident guard policy ippb) असंही म्हटलं जातं.
या विमा योजना अंतर्गत पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला विम्याची रक्कम ही वार्षिक भरायची आहे. म्हणजेच, तुम्हाला वर्षाला एकदाच 299 किंवा 399 रुपये भरायचे आहेत.आणि त्या बदल्यात तुम्हाला वर्षभरासाठी सुमारे 10 लाख रुपयांचे सुरक्षा कवच मिळेल. एक वर्षानंतर पुढील वर्षासाठीचं नूतनीकरण जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन करता येतं. म्हणजे पुन्हा एक वर्षासाठी हे अपघात विमा संरक्षण प्राप्त होईल.
कोण घेऊ शकतो लाभ ? ( Who can be benifited with IPPB Policy ?)
18 ते 65 वर्षे दरम्यान वय असणारे सर्व नागरिक या योजनेसाठी पात्र असतील. या विमा योजनेत सर्व प्रकारचे अपघात ज्यात रस्त्यावरील वाहन अपघात, विजेचा शॉक, सर्पदंश, फरशीवरून घसरून पडून मृत्यू, पाण्यात पडून मृत्यू या सारख्या घटना समाविष्ट आहेत. अपघातात दुर्दैवाने मृत्यू ओढवल्यास मिळणाऱ्या विम्याच्या रकमेव्यतिरिक्त अंत्यसंस्कारासाठी रु. 5000 आणि मृत विमाधारकाच्या कमाल दोन मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यंतच्या मदतीची तरतूदही या विम्यात आहे.
कोणत्या जोखमीच्या बाबी या विम्यात समाविष्ट नाहीत ( What are not covered in IPPB GOURD Policy)
हि विमा योजना कोणत्या जोखमी कव्हर करत नाही ?
1. आत्महत्या
2. लष्करी सेवा किंवा ऑपरेशन्स
3. युद्ध
4. बेकायदेशीर कृत्य
5. जिवाणू संक्रमण
6. रोग
7. एड्स
8. धोकादायक खेळ इ.
विमा धारकास मिळणारे लाभ.(IPPB group accident guard policy in marathi)
> विमाधारक व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास अथवा त्या व्यक्तीस कायमचे अपंगत्व आल्यास तिला 10 लाख रुपये प्रदान करण्यात येतात.
> अपघात झाल्यानंतरच्या दवाखान्याचा (IPD) खर्च करण्यासाठी कमाल 60 हजार रुपये प्रदान करण्याची तरतूद.
> या (399 ) विमा योजनेअंतर्गत विमाधारकाच्या कमाल दोन या मुलांच्या शिक्षणासाठी विम्याच्या रकमेच्या १०% म्हणजे 1 लाख रुपये प्रदान करण्यात येतात.
> अपघातग्रस्त विमाधारकास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्यास, दररोज 1 हजार रुपये प्रति दिवस असे 10 दिवसांपर्यंत देण्याची तरतूद.
> विमाधारकास 30,000 रुपयांपर्यंतची बाह्यरुग्ण म्हणजेच OPD खर्चाची तरतूद आहे. तसेच इन-पेशंट डिपार्टमेंट (IPD) मध्ये 24 तासांपेक्षा जास्त कालावधीसाठी राहिल्यास 60 हजारापर्यंतच्या रुग्णालयीन खर्चाची तरतूद आहे.
> विमाधारकास अर्धांगवायू अर्थात पॅरालिसीस झाल्यास त्यास 10 लाख रुपये मिळण्याची तरतूद आहे.
> विमाधारक व्यक्तीच्या कुटुंबास कमाल 25,000 रुपयांपर्यंत दवाखान्यासाठी प्रवास खर्च म्हणून मिळण्याची तरतूद आहे.
सदर विम्याचे दोन्ही पर्याय खाली दिलेले आहेत. (Post office Accident Insurance Scheme in marathi )
पर्याय क्रमांक एक.
पर्याय 1 : GAG (बेसिक) | |
अपघाती मृत्यू | रु.10,00,000 |
कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व | रु.10,00,000 |
कायमचे आंशिक अपंगत्व | रु.10,00,000 |
अपघाती शारीरिक हानी व अर्धांगवायू | रु.10,00,000 |
अपघाती वैद्यकीय खर्च IPD | रु. 60,000 पर्यंत निश्चित केलेले किंवा वास्तविक दावे यापैकी जे कमी असेल |
अपघाती वैद्यकीय खर्च ओपीडी | रु.30,000 रुपये किंवा वास्तविक दावे यापैकी जे कमी असेल ते निश्चित |
वार्षिक प्रीमियम | रु.299 |
पर्याय क्रमांक दोन
पर्याय 2: GAG (प्रीमियम) | |
अपघाती मृत्यू | रु. 10,00,000 |
कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व | रु.10,00,000 |
कायमचे आंशिक अपंगत्व | रु.10,00,000 |
अपघाती शारीरिक हानी व अर्धांगवायू | रु.10,00,000 |
अपघाती वैद्यकीय खर्च IPD | निश्चित लाभ रु. 60,000 पर्यंत किंवा वास्तविक दावे यापैकी जे कमी असेल |
अपघाती वैद्यकीय खर्च ओपीडी | निश्चित लाभ 30,000 रुपये किंवा वास्तविक दावे यापैकी जे कमी असेल |
शैक्षणिक लाभ | जास्तीत जास्त 2 पात्र मुलांसाठी सम इन्श्योर्डच्या 10% किंवा रु.100000 किंवा वास्तविक यापैकी जे कमी असेल |
रूग्णालयात दैनिक रोख | रु. 1000 प्रतिदिन 10 दिवसांपर्यंत. |
कुटुंबासाठी वाहतूक खर्च | रु 25000 किंवा वास्तविक यापैकी जे कमी असेल |
अंतिम संस्कार लाभ | दुर्दैवाने मृत्यू ओढवल्यास रु.5000 किंवा वास्तविक यापैकी जे कमी असेल |
वार्षिक प्रीमियम | रु.399 |
299 आणि 399 रुपयांच्या या दोन विमा पॉलिसीत काय फरक ?
पोस्ट ऑफिस विमा योजनाअंतर्गत रु.299 व रु.399 असे दोन पर्याय आहेत. पण या दोन्हीमध्ये काय फरक आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तसं तर या दोन्ही योजनांची बहुतांश वैशिष्ट्ये व विमा कवच तरतुदी सारख्याच आहेत. पण काही महत्वाच्या तरतुदींचा फरक मात्र आहे.
रु.३९९ च्या योजनेत विमाधारकाच्या अपघाती मृत्यूनंतर विमाधारकाच्या दोन मुलांना १ लाखांपर्यंतची शिक्षणासाठीच्या मदतीची तरतूद आहे. तर रु.299 च्या अपघात विमा योजनेत मात्र ती तरतूद नाही. त्याच प्रमाणे रु. 399 च्या योजनेत अंत्यसंस्कार खर्च, वाहतूक खर्च, शिक्षण खर्च देण्यात येतो जो रु. 299 च्या योजनेत मिळत नाही.
विमा पॉलीसीसाठी कसा व कुठे कराल अर्ज..?
या दोन्ही विमा योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमचं इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत खाते असणे आवश्यक आहे. जे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन उघडू शकता. पण विमा योजना घेण्यासाठी मात्र ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. म्हणजे तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आवश्यक तो फॉर्म भरून सदर विमा योजनेसाठी नोंदणी करावी लागते.
प्रत्येक पोस्ट ऑफिस शाखेत इंडियन पोस्ट पेमेंट बँक (IPPB) विभाग असतो,तिथे 15 मिनिटांत IPPB बचत खाते व सदर विमा काढता येतो.
आधार कार्ड,पॅन कार्ड, ईमेल खाते व विमा प्रीमियमसाठी रोख रक्कम.
विम्यासाठी IPPB बचत खाते गरजेचे असले तरी एकाच खात्यावर कुटुंबातील इतरांचा विमा काढता येतो.
विमा काढल्यावर दोन आठवड्यांत ई-मेलवर विम्याची सॉफ्टकॉपी प्राप्त होते.
मित्रांनो सदर माहिती देताना ती जास्तीत जास्त अचूक असेल याची आम्ही सर्वोतोपरी काळजी घेतलेली आहेच. परंतु तरीही आपण आपल्याकडूनही योग्य ती खातरजमा करावी. त्यासाठी पोस्ट पेमेंट बँकेच्या वेबसाईटवरील या संदर्भातील माहितीसाठी तुम्ही इथे क्लिक करू शकता. तसेच जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊ शकता.