शेअर मार्केट नामक क्षेत्रात नव्याने दाखल होणाऱ्या वर्गामध्ये आयपीओ हा एक हॉट टॉपिक असतो. खरं तर खुद्द शेअर बाजार आणि आयपीओ हे दोन वेगवेगळ्या वर्गात येतात. म्हणजे भांडवली बाजाराचा विचार केला तर आयपीओ हा प्रायमरी तर शेअर बाजार सेकंडरी मार्केट म्हणून ओळखला जातो. (what is DRHP in IPO in marathi )
तर जेव्हा कंपनीचा IPO येणार असतो तेव्हा आपल्याला त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी ऐकायला – वाचायला मिळतात. त्यात काही अशा असतात ज्याची सर्वसामान्यांमध्ये चर्चा होत नाही. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस म्हणजेच DRHP देखील त्यापैकीच एक. जो खरंतर अत्यंत महत्वाचा मुद्दा असतो.
तर हा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस म्हणजेच DRHP नक्की काय प्रकार आहे हे आज आपण समजून घेऊया.
नक्की काय असतं DRHP ?
ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) हा एक प्रकारचा ऑफर दस्तऐवज असतो जो IPO आणू पाहणाऱ्या कंपनीसाठी तिच्या मर्चंट बँकर्सद्वारे तयार केला जातो. या दस्तऐवजात IPO आणू पाहणारी कंपनी आणि तिच्या व्यवसायाबद्दल, आर्थिक स्थितीसंदर्भात तपशीलवार माहिती दिलेली असते. (what is DRHP in IPO in marathi)
याशिवाय, DRHP कंपनीचे ऑपरेशन्स, प्रवर्तक, आर्थिक आरोग्य, गुंतवणूक, उद्योगक्षेत्रातील सहभाग आणि भूमिका, तसेच सूचीबद्ध आणि असूचीबद्ध प्रतिस्पर्ध्यांशी त्याची तुलना याबद्दल देखील संपूर्ण माहिती दिली जात असते. हि माहिती तयार करते वेळी सर्व कायदेशीर नियमांचे पालन करणे ही मर्चंट बँकरची जबाबदारी असते.
सोप्या भाषेत सांगायचं तर, कंपनीला भांडवली बाजारातून पैसे का उभे करायचे आहेत, तर नेमके किती पैसे उभे करायचे आहेत आणि हे पैसे कंपनी नक्की कोणत्या उद्देशासाठी वापरणार आहे. हे कंपनी तपशीलवार या मध्ये सांगते. तसेच कंपनीने आपली व्यावसायिक अनुकुलता आणि जोखमींचा दाखला देत गुंतवणूकदारांना या गुंतवणुकीच्या संभाव्य धोक्यांचीही माहिती द्यावी लागते.
आयपीओमध्ये गुंतवणूक करताना DRHP मध्ये कोणते मुद्दे तपासाल ?
DRHP मध्ये कोणत्या बाबी तपासाल ? |
---|
कंपनीचं उद्योग क्षेत्र आणि तिचं व्यवसाय प्रारूप या बद्दलची माहिती (The business model of the company) |
ऑफर आणण्यामागील उद्देश (Objects of the Offer) |
या ऑफर संदर्भातील गुंतवणुकीबाबत जोखमीच्या बाबी. (Disclosures about Risks) |
उद्योग संरचना आणि बाजार संधी (Industry structure and market opportunities) |
कंपनीचं व्यवस्थापन (Management) |
कंपनीचे लाभांश धोरण (Dividend policy of the company) |
कंपनीची मालमत्ता आणि दायित्व (Assets and Liabilities) |
नफा आणि तोटा (Profit and Loss) |
अमूर्त मालमत्ता (Intangible assets) |
कर्ज / उधारी (Borrowings) |
हिस्सेदारी (Shareholding ) |
यामध्ये कंपनी कोणत्या किमतीला IPO ऑफर करत आहे किंवा किती संख्येने शेअर्स विकणार आहे हे सांगत नाही. तर त्याऐवजी कंपनीला प्राइस बँड म्हणजे कोणत्या दरम्यान शेअर इश्यूची किंमत राहील ते सांगावे लागते. म्हणजेच कमाल आणि किमान किंमत या संदर्भातील माहिती. इश्यूचा आकार आणि शेअर्सची संख्या नंतर नमूद केली जाते.
बोली प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शेअर्सची किंमत उघडपणे जाहीर केली जात नाही. कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार, सदर माहिती आधीच सांगता येत नाही. कंपनीसाठी DRHP बनवतानाच संभाव्य गुंतवणूकदारांना त्याद्वारे सर्व माहिती पुरवणे आणि त्यांच्या हिताचे रक्षण करणे हे देखील मर्चंट बँकर्सचे काम असतं.
DRHP मसुदा दस्तावेज पूर्ण झाल्यानंतर तो सेबीकडे सदर केला जातो. सेबीकडून या याचिका मसुद्याची छाननी आणि पुनरावलोकन केले जाते. यादरम्यान सदर दस्तावेजात जर काही नियमानुसार नसेल किंवा कमतरता असेल तर सदर मसुदा सेबीकडून कंपनीला परत पाठवला जातो आणि योग्य ते बदल आणि कार्यवाही करून पुन्हा सदर करण्यास सांगितले जाते. त्यानंतर मग मर्चंट बँकरकडून या दस्तावेजाचे पुन्हा एकदा अवलोकन केले जाऊन त्यात संबंधित बदल करून मसुदा पुन्हा सेबीकडे सादर केला जातो.
हा मसुदा SEBI कडे पाठवतानाच तो कंपनी आणि स्टॉक एक्स्चेंजच्या रजिस्ट्रारलाही पाठवला जातो. सेबीकडून पुन्हा दस्तऐवजाचे पुनरावलोकन केले जाते आणि त्यात काही बदल करणे आवश्यक आहे का हे पहिले जाते. जर सगळं काही योग्य आणि नियमानुसार असेल तर सेबीकडून आयपीओ आणण्यास संबंधित कंपनीला परवानगी दिली जाते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा.