पीएम किसान सन्मान निधी (pm kisan yojana in marathi) : या योजनेचा 14 वा हप्ता मे महिन्यात मिळू शकतो. अर्थात केंद्र सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी ₹2000 म्हणजेच वर्षाला ६ हजार रुपये मिळतात.
जाणून घेऊया कशी आणि कुठे करायची ऑनलाइन नोंदणी? (pm kisan.gov.in registration in marathi )
सर्वप्रथम, तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल.
आता Farmers Corner वर जावे.
येथे ‘New Farmer Registration’या पर्यायावर क्लिक करावे.
यानंतर आधार क्रमांक टाकावा.
आता कॅप्चा कोड टाकून आपले राज्य निवडावे व पुढील प्रक्रियेसाठी जावे.
या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी.
आता आपल्या बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहितीही टाकावी.
त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे व माहिती असणे आवश्यक आहे. (Documents required for pm kisan yojana )
आधार कार्ड.
बँक खाते असणे आवश्यक आहे.
अर्जदार शेतकऱ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
उत्पन्नाचा दाखला.
जमिनीची कागदपत्रे.
रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील लिंकवरून ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. (pm kisan kyc status )
exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx
पीएम किसान सन्मान निधी योजनेंसंदर्भात काही अडचणी येत असतील तर खालील हेल्पलाइन क्रमांका किंवा मेलद्वारे संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता.(pm kisan helpline numbers)
हेल्पलाइन क्रमांक – 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092.
तक्रार pmkisan-ict@gov.in या ई-मेल आयडीवर पाठवू शकता.