majhi kanya bhagyashree yojana information in marathimajhi kanya bhagyashree yojana information in marathi

majhi kanya bhagyashree yojana information in marathi : मुलींच्या जन्मदरात वाढ, मुलींचे शिक्षण आणि आरोग्य आदींमध्ये सुधारणा अशा स्त्री सक्षमीकरणास वाव देणाऱ्या विविध योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून राबवल्या जात असतात.

आपल्याकडे जन्मलेल्या पहिल्या मुलीचं स्वागत “पहिली बेटी, धनाची पेटी” असं म्हणून करतो. आणि जणू हाच संदर्भ घेऊन महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ सुधारित पद्धतीने पुन्हा सुरू केली आहे. 

या योजनेंतर्गत मुलीच्या जन्माच्या वेळी पालकांना 50,000 रुपये मिळतात. यासोबतच अपघात विमा कवच आणि ओव्हरड्राफ्ट सुविधासुद्धा या योजनेत उपलब्ध आहे.

माझी कन्या भाग्यश्री या योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून मुलींच्या जन्मावर 50,000 रुपये मुदत ठेवीच्या स्वरुपात दिले जातात. माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2016 रोजी सुरू केली. मुलींच्या जन्मदर आकडेवारीचा प्रसार आणि सुधारणा करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. दोन मुली असलेल्या कुटुंबालाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. 1 ऑगस्ट २०१७ पासून या योजनेत काही बदल करून पुन्हा राबविण्यात आली.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? (who can benefit from majhi kanya bhagyashree yojana )

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत आई आणि मुलीच्या नावाने बँकेत (बँक ऑफ महाराष्ट्र) संयुक्त खाते उघडले जाते. या खात्यासोबत 1 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट सुविधासुद्धा उपलब्ध आहे. पाहूया या योजनेची वैशिष्ट्ये आणि नियम.

योजनेची वैशिष्ट्ये आणि नियम. (majhi kanya bhagyashree yojana features )

  • केवळ कन्या अपत्य असणारे कुटुंब पात्र.
  • 1 ऑगस्ट 2017 नंतर जन्मलेल्या मुली पात्र.
  • लाभार्थी मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असणे गरजेचे.
  • एक मुलगी असल्यास 50 हजार, दोन मुली असल्यास प्रत्येक मुलीच्या नावे 25 हजार आणि तीन मुली असल्यास अपात्र.
  • दुसऱ्या प्रसुतीच्या वेळेस जुळ्या मुली झाल्यास, त्या दोन्ही मुली योजनेस पात्र असतील.
  • मुलगी आणि तिच्या आईच्या नावाने स्वतंत्ररीत्या उघडण्यात आलेल्या खात्यात सदर रकम मुदतठेवीच्या स्वरुपात ठेवली जाईल.
  • सदर खाते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये उघडण्यात येईल आणि त्यासोबत रु.एक लाखांचा अपघात विमा आणि रु.पाच हजारपर्यंत ओव्हर ड्राफ्ट सुविधेचा लाभ मिळेल.
  • मूळ मुद्दल त्यावरील व्याजासहित परत मिळण्यासाठी मुलगी वयाचे अठरा वर्षे पूर्ण, इयत्ता दहावी उत्तीर्ण आणि अविवाहित असणे गरजेचे.
  • वार्षिक उत्पन्न 7.5 लाख उत्पन्न असणारे कुटुंब पात्र.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या जन्मानंतर माता आणि पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक.
  • प्रत्येक सहा वर्षांनंतर कुटुंब मुदत ठेवीवरील जमा व्याज काढून घेऊ शकते.

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी ही कागदपत्रे गरजेची ? (Documents required for majhi kanya bhagyashree yojana)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. यासोबतच आई किंवा मुलीचे बँक खाते पासबुक, मोबाईल फोन नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो, रहिवासी पत्ता पुरावा असावा. यासोबतच उत्पन्नाचा दाखलाही आवश्यक आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा फॉर्म आणि अर्ज कुठे ? (how to apply for majhi kanya bhagyashree yojana)

या योजनेसाठी अर्ज करणे खूप सोपे आहे. तत्पूर्वी मुलीच्या जन्माची नोंदणी संबंधित क्षेत्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयात करावी लागेल. त्यानंतर माझी कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन फॉर्म डाउनलोड करावा लागेल. यानंतर त्या क्षेत्रातील अंगणसेविकेकडे अर्ज फॉर्म संबंधित दस्तावेजासह सादर करावा. त्यानंतर अंगणसेविका हा फॉर्म पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविकांकडे सादर करतील.

आम्ही तुम्हाला त्या फॉर्मची डाऊनलोड लिंक खाली येथे देत आहोत. ज्यावर क्लिक करून तुम्ही माहितीपत्रक आणि फॉर्म डाऊनलोड करू शकता. हा फॉर्म काळजीपूर्वक वाचा आणि भरा.


महिला व बाल विकास विभागाकडून चालवल्या जाणाऱ्या इतर योजनांच्या माहितीसाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *