common Trading Mistakes in Marathicommon Trading Mistakes in Marathi

नियमित ट्रेडिंग करणाऱ्या ट्रेडर्सपैकी फारच कमी जण नियमित पणे यश मिळवतात. अयशस्वी होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. यामागे ट्रेडरकडुन होणाऱ्या चुका कारणीभूत आहेत.या चुका कोणत्या ते आज जाणून घेऊया. (common Trading Mistakes in Marathi)

ट्रेडिंग प्लॅन नसणे : ट्रेडिंग का? कोणत्या सेगमेंटमध्ये ? की ज्यादिवशी जे गुलाबी भासतं तिकडे जायचं..? अशी स्थिती असेल तर थांबा. कारण याचा अर्थ तुमच्याकडे योग्य ट्रेडिंग प्लॅन नाहीये. तुमच्या कौशल्ये, आकलन क्षमतेनुसार ट्रेडिंग सेगमेंट ठरवा. स्ट्रॅटेजी विकसित करा, निश्चित करा. रिस्क मॅनजमेंट अर्थात जोखीम व्यवस्थापन आखा व त्याचे नियम स्ट्रीक्टली पाळा. (Stock Trading Errors)

इमोशनल ट्रेडिंग : तुम्हाला काय वाटतं यावर मार्केट आपली दिशा ठरवत नाही. उत्साहाच्या भरात, हावरटपणाने, झालेला तोटा आजच भरून काढण्यासाठी ट्रेडिंग करू नये हे लक्षात असू द्या.(Emotional Trading Risks)

ओव्हरलेव्हरेजिंग टाळा : कर्ज घेऊन ट्रेडिंग च काय तर गुंतवणूक सुद्धा टाळावी हा भांडवली बाजाराचा अलिखित नियम आहे. आणि लेव्हरेजिंग अर्थात ब्रोकरकडून मिळणारी क्रेडिट वापरून मूळ भांडवलाच्या काही पटीत ट्रेडिंग करणे हे कर्ज घेण्यासारखेच. ते टाळलेलं योग्य. (Over-leveraging Dangers.)

कॉपी टाळा : अमुक अशी ट्रेडिंग करतो, तमक्या
सेगमेंटमध्ये करतो, बेसिक रिसर्च अभ्यास न भूतकाळातील कामगिरीच्या आधारे अमुक स्टॉक / सेगमेंट फायदेशीर आहे, असं स्वतःचं मत ठरवून मार्केटवर थोपावल तर मार्केट तुम्हाला ठोकल्याशिवाय राहणार नाही.(Trading Plan Essentials)

अतिआत्मविश्वास : मोटार चालवता येते म्हणून थेट विमान हाती घ्याल ? नाही ना ? मग स्टॉकमध्येच धडपडत असताना फ्युचर आणि ऑप्शन्स चे आकर्षण कशाला ? शेअर मार्केटशी संबंधित असलं तरी एफ एंड ओ आणि त्यातही ऑप्शन्स ट्रेडिंग हे एक स्वतंत्र जग आहे. त्यातील संकल्पना, प्रभाव पाडणारे घटक, गुणोत्तरे क्लिष्ट असून त्याचा सखोल अभ्यास आणि त्यासाठी द्यावा लागणारा वेळ यासाठी आपण किती तयार आहोत यावर त्याचा विचार व्हावा.(Over Confidence)

भाकरी न उलथवणे : देशातील, जगभरातील बदलत्या राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थितीतील बदलांनुसार मार्केटसुद्धा अनेकदा कुस बदलत असतं. त्यातील वातावरण बदलत असतं. मग तुमची तीच ट्रेडिंग शैली, स्ट्रॅटेजी सदासर्वकाळ कशी चालेल. बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेऊन, त्याचा अभ्यास करून तुमच्या ट्रेडिंग शैली अन् पद्धतीत बदल हवाच.(Trading Education Importance)

ओव्हरट्रेडिंग: बाजाराचा कोणताही शेवटचा दिवस ठरलेला नाही. मग तुम्हालाइतकी घाई का ? शेअर मार्केट, बाजार यापलीकडे ही जग आहे. प्रत्येक बाबीकडे मार्केट लेन्समधून पाहू नका. ब्रेक घ्या फ्रेश व्हा अन् पुन्हा उतरा.

मिरवू नका : “मी ट्रेडर आहे.. मग अमुक ट्रेड करतो आणि तमुक कमावतो” असे बोंब ठोकणारे अनेकदा अयशस्वी ट्रेडर असू शकतात. कारण मुळात उत्तम ट्रेडर होण्यासाठी विश्लेषक आणि चिकित्सक वृत्ती असणाऱ्या व्यक्तीला हे मिरवण्यात काडीमात्र रस नसतो. याच बरोबर तुम्ही ट्रेडिंग स्ट्रॅटेजी ही तुमच्या जवळच राहुद्या “अतीपरिचयात अवज्ञा” (बाजाराकडून) हे ट्रेडिंग स्ट्रॅटेजीसाठी सुद्धा लागू होतं. विश्वास नसेल तर आजमावून पहा.

असो, सध्या तरी इतकचं, अजुन काही नवीन समजलं तर पुन्हा सांगूच.
माहिती आवडली असेल तर शेअर कराच.
धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *