how trade in unlisted stocks in marathihow trade in unlisted stocks in marathi

नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE ने आज संचालक मंडळाच्या बैठकीत इक्विटी शेअर्सच्या बोनस इश्यू आणि ₹90 प्रती शेअर लाभांश देण्याचा निर्णय जाहीर केला.(how trade in unlisted stocks in marathi)

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि NSE तर सूचीबद्ध नाही, मग या अशा अनलिस्टेड कंपनीचे शेअर्स खरेदी करता येतील का?

तर उत्तर आहे, सूचीबद्ध नसलेल्या NSE च्या शेअर्सची खरेदी आणि विक्री शक्य आहे. लिस्टेड शेअर्सच्या खरेदी-विक्रीसाठी खुद्द स्टॉक एक्स्चेंजसारखे सहज सोपे व्यासपीठ उपलब्ध असतं, पण याचा अर्थ असा नाही कि अनलिस्टेड शेअर्सची खरेदी विक्री शक्य नाही. तर अशा स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध नसलेल्या कंपन्यांच्या समभागांचे खरेदी विक्रीसाठीसुद्धा काही माध्यमे म्हणजे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहेत जी हि सोय उपलब्ध करून देतात. उदाहरण द्यायचे झाले तर ‘अनलिस्टेड एरिना’, ‘आर्म्स सेक्योरीटीज’, ‘अनलिस्टेड झोन’ आणि ‘स्टॉकफाई’ यासारखे प्लॅटफॉर्म असूचीबद्ध शेअर्सच्या खरेदी आणि विक्रीसाठी सोय उपलब्ध करून देतात.

अशाच एका ट्रेडिंग प्लॅटफॉर्मनुसार, एनएसईचा सद्याचा प्रती शेअर दर 4,800 रुपये इतका आहे. जो इतर एखाद्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मकडे किंचित वेगळा सुद्धा असू शकतो. इथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे हे अनलिस्टेड शेअर्स एक किंवा दोन संख्येत न होता अनेक पटीत केले जातात त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना त्यात गुंतवणूक करणे तितके सोपे नसते.

वर दिलेल्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त नामांकित गुंतवणूक बँका, संपत्ती व्यवस्थापक संस्था किंवा ब्रोकर्स यांच्यामार्फतही असूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्सची खरेदी आणि विक्री केली जाऊ शकते. आणि सूचीबद्ध समभागांप्रमाणेच हे असूचीबद्ध समभाग देखील खरेदीनंतर आपल्या डीमॅट खात्यात जमा केले जातात आणि विक्री केल्यानंतर डीमॅट खात्यातून वळते होतात. फरक फक्त इथे सूचीबद्ध शेअर्ससाठी असणारा स्टॉक एक्स्चेंजसारखं पारदर्शक माध्यम इथे नसतं. (Buying and selling of unlisted shares)

असूचीबद्ध समभागांमध्येसुद्धा व्यवहार करता येतात हे आजही फारच कमीजणांना माहित आहे. अशा एखाद्या कंपनीमध्ये तिचा आयपीओ येण्यापूर्वी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते किंवा अगदी त्याच्या उलटही होऊ शकतं. तथापि, जर तुम्ही असूचीबद्ध कंपनीचे खरेदी केलेले शेअर्स तुम्हाला विकायचे असतील आणि त्या कंपनीची IPO आणण्याची योजना असेल तर एक गोष्ट लक्षात असुद्या कि तुम्ही एकतर तुमचे ते शेअर्स IPO च्या आधी विकू शकाल अन्यथा शेअर्स विकण्यासाठी त्या शेअर्सची स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टिंग झाल्यानंतर तुम्हाला लागू होणाऱ्या सहा महिन्यांपर्यंतचा लॉक-इन कालावधी संपण्याची पहावी लागेल.

सदर लेख केवळ माहितीकरिता, त्याद्वारे कोणतीही शिफारस नव्हे. माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *