अकाऊंट ओपनिंग

how to demat account

शेअरमार्केट आणि  क्रिप्टोकरन्सीसाठी खाती कुठे उघडावीत ?

(How to open demat account online in marathi)

पाण्यात उतरल्याशिवाय पोहायला शिकू शकत नाही. स्टॉक मार्केटसारख्या क्षेत्रातही काहीसं असंच आहे. पुस्तके वाचून, व्हिडीओज पाहून बऱ्यापैकी समजू लागल्यानंतर आपण पेपर ट्रेडिंग करू पाहतो आणि ते तसं योग्यच पण शेअर मार्केटमध्ये वेळोवेळी होणाऱ्या चढ-उतारांसोबत त्यांचा शेअर्स, निर्देशांकांवर होणारा परिणाम आपण यातून पाहू शकतो पण त्याचवेळी आपल्या मनाचा संयम, वेळेनुसार निर्णय घेण्याची क्षमता जोखायची असेल तर पेपर ट्रेडिंगच्या पुढची पायरी म्हणजे प्रत्यक्षात शेअर्स खरेदी – विक्री करणे याचा अनुभव येणे गरजेचे आहे.

अर्थात शेअर मार्केटमध्ये प्राधान्य गुंतवणुकीस असावे, ट्रेडिंगला नसावे आणि त्यामुळेच शेअर्सची खरेदी विक्री हि गुंतवणुकीस अनुसरून करावी.

खालील लिंक्सवरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने 15 मिनिटांत डिमॅट व ट्रेडिंग खाते  उघडू शकता. अर्थात डिमॅट व ट्रेडिंग खाते उघडण्यासाठी  खाली दिलेल्या ब्रोकर्स आमच्या अनुभवानुसार आहेत. आपण आपल्या पसंतीनुसार इतर कोणत्याही ब्रोकरकडे खाते उघडू शकता. 

 

क्रिप्टोचलन गुंतवणूक व व्यवहारांसाठी कोठे खाते उघडावे ?

(How to open account for Cryptocurrency in marathi )

क्रिप्टोकरन्सीला भविष्यातील चलन समजलं जात आहे. बिटकॉईन , एथेरम, डॉजकॉईन, शिबा इनू , असे अनेक शब्द अनेकांच्या तोंडून तुम्हाला ऐकायला मिळत असतील. कमी कालावधीत प्रचंड मोठ्या प्रमाणात परतावा आणि तसंच मोठ्या गुंतवणुकीचा प्रवास अगदी फुटकळ रकमेपर्यंत सुद्धा इथे होऊ शकतो.

 

तर मग या क्षेत्रात गुंतवणूक करावी कि नाही ?

अनेक तज्ज्ञांच्या मते ट्रेडिंग नाही पण किरकोळ रक्कम या क्षेत्रात गुंतवणे फायद्याचं ठरू शकतं. म्हणजे अगदी हजार – दोन हजारांइतकी एकदाच केलेली गुंतवणूक सुद्धा भविष्यात चांगला परतावा मिळवून देऊ शकते. पण या क्षेत्रात जोखीमही जास्त आहे त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील गुंतवणूक तज्ज्ञ सल्लागारांचा सल्ला नक्की घ्या.

या क्षेत्राविषयी आणखी थोडं  समजून घ्यायचं असेल तर या विषयावरील आमचे लेख वाचण्यासाठी आपण इथे क्लिक करू शकता.

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायची म्हटलं तर भारतात WazirX आणि जगभरात Binance चा बोलबाला आहे. आणि हे दोन्ही एक्सचेन्जेस एकमेकांशी जोडलेले आहेत ज्यामुळे दोन्ही मध्ये अंतर्गत व्यवहार निधी /क्रिप्टोकरन्सीचे स्थानांतरण आदी प्रक्रिया सहज सोप्या पद्धतीने पारपडता येतात.

उदाहरणार्थ, बायनंसमधून P2P पद्धतीने डॉलर्स खरेदी करून ते वझीरक्स मध्ये ट्रान्स्फर करून वझीरक्स मध्ये त्या रकमेतून क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करता येते.

खालील लिंकवरून आपण दोन्ही मध्ये खाती उघडू शकता. खाते उघडणे सध्या पूर्णता मोफत आहे.

 

  

बायनान्समधील सद्याच्या ऑफरनुसार (सदर ऑफर्स वेळोवेळी बदलत असतात ) वरील लिंकवरून खाते उघडल्यास स्वतः केलेल्या व्यवहारांवरील कमिशनमधील 5 % तुम्हाला प्रत्येकवेळी परत मिळेल.

मित्रांनो, वरील लेखात सांगितल्या प्रमाणे आम्ही ट्रेडिंग नव्हे तर गुंतवणुकीस प्राधान्य देतो. पण तरीही  आपला गुंतवणुकीसंदर्भातील कोणताही निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावा.