होळीला अजून काही दिवसांचा अवकाश असला तरी मार्केटमध्ये ती आधीच सुरु झालेय असं दिसतंय कारण आज सलग दुसर्या दिवशीही घसरणीचा प्रवास ‘मागच्या पानावरून पुढे’ या प्रकारे सुरु राहिला.


प्रतिकूल जागतिक संदर्भ आणि त्यासोबत देशभरात उसळलेली कोरोनाची दुसरी लाट या सर्वांचा व्हायचा तो परिणाम मार्केटवर झाला नसता तरच नवल.निफ्टी मेटल वगळता एनएससीचे  जवळपास सर्व  निर्देशांक आज लाल रंगात न्हावून निघाले.


आज सगळ्या क्षेत्रीय निर्देशांकामध्ये आज सर्वाधिक घसरण निफ्टी मिडिया  (-0.6%) आणि निफ्टी ऑटो (-1.1%) या क्षेत्रात झाली. 


सेन्सेक्स : 48440.12 बंद ( 740.19अकांची म्हणजेच 1.51 % नी वाढ) 4 कंपन्यांचे समभाग वधारले, 26 कंपनीचे घसरले.


निफ्टी : 14814.75(224.50 म्हणजेच 1.54 % नी वाढ) 6 कंपन्यांचे वधारले, 44 कंपनीचे घसरले.


एनएससीवरील 241 कंपन्या हिरव्या रंगात तर 1438 कंपन्या लाल रंगात बंद झाल्या.


देशी – विदेशी गुंतवणूकदार.


विदेशी गुंतवणूकदारांकडून (FII) ₹ 3383.6 कोटींची विक्री 
देशी गुंतवणूकदारांकडून (DII) ₹ 2267.69 कोटींची खरेदी.


आजचे आघाडीचे  


   आजचे वधारणारे               फरक                
टाटा स्टील      ⏫ 2.8 %
डॉ. रेड्डीज    ⏫ 0.7%
आयसीआयसीआय बँक  ⏫ 0.5%


 

आजचे घसरणारे                            फरक             
आयओसी    ⏬ 4.0%
मारुती     ⏬ 3.8%
कोल इंडिया    ⏬ 3.4%


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *