जगातील सर्वात मोठी तेल रिफायनरी आणि तेल निर्यातदार कंपनी सौदी अरामको आणि भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) यांच्यातील प्रस्तावित करार ऑगस्ट 2019 पासून खोळंबला आहे.
दोन्ही कंपन्यांमधील हा करार खरंतर मार्च 2020 पर्यंत पूर्ण व्हायचा होता परंतु तेलाच्या घसरत्या किंमती आणि सौदी अरामकोचं वार्षिक 7500 कोटी डॉलर्स (सुमारे 5.44 लाख कोटी रुपये) लाभांशाचे उत्तरदायित्व यामुळे हा करार रखडलेल्या अवस्थेत होता पण आता तज्ञांचा अंदाज असा आहे की जर कच्च्या तेलाची किंमत 65 डॉलर प्रति बॅरलवर स्थिर राहिल्या तर सौदी अरामको – रिलायन्स इंडस्ट्रीजच्या “तेल ते रसायन” व्यवसायात ( Oil to Chemical ) 20% हिस्सा खरेदी करेल.