“रिच डॅड, पुअर डॅड ” काय सांगतं ? Rich dad poor dad summary in marathi
आजच्या टेक्नोसॅव्ही आणि सोशल मिडीयावर असलेल्या पिढीत “रिच डॅड, पुअर डॅड ” (Rich dad poor dad summary in marathi) हे पुस्तक माहीत नसेल असा एखादा सापडणे कठीणच.अनेकांनी वाचलं असेल, काहींनी पारायणे केली असतील.. पण कीतीजणांनी पुस्तकात सांगीतलेल्या मंत्राचा आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने वापर केलाय ?
असं काय सांगतं हे पुस्तक ??
दोन महिन्यांपूर्वीच आम्ही आमचे शेअरमार्केटबद्दल प्राथमिक माहीती देणारं आमचं पहीलं पुस्तक अमेझॅान वर प्रकाशित केलं आणि त्यास अनेकांचा उत्तम प्रतिसाद मिळालाय या पुस्तकाची लिकं खाली मध्ये दिलेली आहेच.पुस्तकाचा विषय काढला कारण आजच्या आपल्या लेखाचा विषयसुध्दा एका बेस्टसेलर पुस्तकाचाच आहे. पुस्तक आहे Rich Dad, Poor Dad.पुस्तक प्रकाशित झालं 1997 मध्ये, आणि या पुस्तकाच्या लेखकाची औपचारिक ओळख करून देण्याची गरज नाहीये, तरीही सांगूया , रॉबर्ट कियोसाकी हे या पुस्तकाचे लेखक आहे सुप्रसिद्ध उद्योजक , गुंतवणूकदार. गेले दोन दशकाहूनही जास्त काळ या पुस्तकाने अनेकांच्या मनावर गारुड केलंय. अनेक ख्यातनाम व्यक्तिमत्वेसुद्धा कियोसाकी यांच्या चाहत्या वर्गात येतात.
तर थोडक्यात सांगायचं तर यात लेखकाने म्हणजे कियोसाकी यांनी आर्थिक साक्षरता आणि संपत्ती निर्मितीचे महत्व सांगताना आपल्या आयुष्यातील अशा दोन व्यक्तींचे दाखले दिले आहेत ,एक त्यांचे जैविक पिता ‘राफ कियोसाकी’ ज्यांना ‘पुअर डॅड’ म्हणून संबोधलं गेलं आहे आणि दुसरे आपल्या वर्गमित्राचे वडील जे पुस्तकात ‘रिच डॅड’ म्हणून आपल्या समोर येतात,ज्यांनी रॉबर्टला ‘पैशाची गोष्ट’ उलगडून सांगितली.
कियोसाकी कुटुंब मागील चार पिढ्यांपासून अमेरिकेत आहेत.अमरिकेतील हवाई राज्यातील हिलो नामक शहर वजा बेटावर त्यांचे वास्तव्य. रॉबर्टचे वडील राफ कियोसाकी पेशाने शिक्षक, तल्लख बुद्धिमत्ता असलेल्या राफ यांनी रॉबर्टला उच्च आर्थिक वर्गातील व्यक्तींची मुले जाणार्या उत्तम शाळेत घातलं ज्यामुळे रॉबर्टला श्रीमंत वर्ग मित्र लाभले.
आणि पुढे त्यातूनच एका वर्ग मित्राचे वडील त्याचे मार्गदर्शक बनले ज्यांना इथे ‘रिच डॅड’ असे ओळखतो.लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे रॉबर्टचे वडील राफ कियोसाकी पेशाने शिक्षक असले तरी ते पुढे ते त्या राज्यातील शिक्षण खात्याचे प्रमुक बनले तर मग त्यांना अगदीच ‘पुअर डॅड’ म्हणून पाहताना त्यांचा हा हुद्दा,रॉबर्टला उत्तम अशा शाळेत शिक्षण देणे वगैरे या बाबीसुद्धा लक्षात घ्या.
पण असाही एक समज होता कि पुस्तकात सांगितल्याप्रमाणे ‘रिच डॅड’ हि एक काल्पनिक व्यक्तिमत्व आहे कारण आजपर्यंत कियोसाकी यांनी त्यांची कधी ओळख जाहीर केलेली नव्हती वगैरे किंबहुना मागे एका मुलाखती मध्ये ‘रिच डॅड’ या आपल्या पुस्तकामधील व्यक्तीस तुम्ही ‘Harry Potter’ प्रमाणे का नाही समजत असे सांगितले होते.परंतु २०१६ मध्ये आपल्याच एका शो मध्ये मात्र त्यांनी जाहीर केलं कि रिच डॅड’ दुसरं तिसरं कोणीच नसून आपला वर्गमित्र एलेन किमी ( ज्यास पुस्तकात माईक असे नाव दिले आहे ) याचे वडील रिचर्ड किमी हे आहेत.
एकंदरीत काय तर या व्यक्तीरेखा खऱ्या असोत वा खोट्या पण यामध्ये कियोसाकी यांनी सांगितलेले गुंतवणूक आणि संपत्ती निर्मितीचे मंत्र मात्र आपल्या आयुष्यात फारच उपयोगी आहेत.या पुस्तकाचा सारांश जर दहा महत्वाच्या नियमांमध्ये काढायचा झाला तर आमच्या मते तो खाली दिल्याप्रमाणे असेल.
तर पाहूया आपल्याला नक्की काय सांगतं “रिच डॅड,पुअर डॅड” Rich dad poor dad review in marathi
1
“The rich buy assets, not liabilities”
श्रीमंत लोक मालमत्ता वाढवतात जबाबदाऱ्या नाही
2
“Be A Financial Literate: Financial literacy can only be learned through experience”
अर्थसाक्षर व्हाच पण अर्थसाक्षरता थिअरीपेक्षा अनुभवातून जास्त कळते.
3
“Learn to sell”
विक्री कौशल्य शिका.
पुस्तकात कियोसाकी यांनी एक प्रसंग सांगितला आहे जिथे एक इंग्लिश साहित्यामध्ये पदवीधर असलेली एक स्त्री त्यांना बेस्ट सेलिंग ऑथर (लेखक ) कसं बनावं हे विचारते, त्यावर कियोसाकी तिला विक्री कौशल्य प्रशिक्षण म्हणजेच सेल्स ट्रेनिंग कोर्स घेण्यासाठी सुचवतात त्यावर ती स्त्री आश्चर्य चकित होते आणि कियीसाकी ला विचारते “ आर यु सिरिअस ? म्हणजे एका लेखिकेला चक्क सेल्स वगैरेचे धडे घेण्याची काय गरज ? त्यावर कियोसाकी समोरच्या कॉफी टेबलावरील पुस्तक उचलून म्हणतो कि नक्कीच काहीतरी कारण आहेच म्हणून तर या पुस्तकाबद्दल, याच्या लेखकाबद्दल सांगताना त्याला “बेस्ट सेलिंग ऑथर” म्हटलं जातं “बेस्ट रायटिंग ऑथर” नाही, विक्री कौशल्य हे फक्त कुणा एका विशिष्ट कर्मचार्याचे काम नव्हे तर एक कला आहे आणि तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर तुमचं स्वतःचं क्षेत्र कोणतेही असो त्याच्या जोडीला तुम्ही हि विक्री आणि विपणन कला आत्मसात करायला हवी.
4
“Fear and self-doubt are your greatest barriers to success. “
भीती, भीड आणि आत्मविश्वासाचा अभाव हे सर्वात मोठे अडथळे.
5
“Always think in terms of opportunities. नेहमी संधी बद्दल विचार करा”
संधीची वाट नका पाहू तर संधी शोधा किंबहुना निर्माण करा.
6
“Stay Focused (Mind Your Own Business)”
ध्येय निश्चित करा, धेय्यापासून ढळू नका. स्वतःचा विचार करा, स्वार्थी व्हा.
7
“Invent Money”
पैसे मिळविण्यापेक्षा पैशाचा शोध घ्या , पैसे निर्माण करा.
8
“Control Emotions”
भावनांवर नियंत्रण ठेवा. रागाच्या भरात कोणताही निर्णय नाही आणि आनंदाच्या भरात कोणतेही वचन नाही.
9
“Work to Acquire Life Skills, Not for Money”
मूळ उद्दिष्ट आयुष्य भरभरून , रसरसुन जगणे , नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे असावे , फक्त पैसे कमावणे नाही . आयुष्य कमवा पैसे नाही.
10
“Don’t blame others for your problems”
तुमच्या समस्यांसाठी इतरांना दोषी धरू नका.
तर मित्रांनो हे होते दहा सल्ले जे आपल्याला “रिच डॅड,पुअर डॅड” आपल्या स्वतःच्या आयुष्यात वापरायला सांगतं.
वरील माहिती आपण आमच्या यु ट्यूब व्हिडीओच्या माध्यमातूनही पाहू शकता.