Image Source : Internet |
आज दिवसभर बाजाराची स्थिती झोपाळ्याप्रमाणे होती. जणू या टोकापासून त्या टोकापर्यंत.कोणतीही एकच दिशा पकडून चालणारं मार्केटआज नव्हतं.पण अखेर नकारात्मकरित्या बंद होणे टळलं.
आज निफ्टी फार्मा (+1 .70 ) आणि मेटल (+1 .40%) मधील सर्वाधिक वाढ दिसली तर बँकिंग (-0.5 %) व मिडिया (-0.3 %) हे निर्देशांक सर्वाधिक घटीचे होते.
सेन्सेक्स : 49,201.39 वर बंद ( 42.07 अकांची म्हणजेच 0.09 % नी वाढ) 15 कंपन्यांचे समभाग वधारले, 14 कंपनीचे घसरले तर 1 स्थिर.
निफ्टी : 14,683.50 वर बंद (45.70 म्हणजेच 0.31 % नी वाढ) 30 कंपन्यांचे वधारले, 20 कंपनीचे घसरले.
एनएससीवरील 987 कंपन्या आज हिरव्या रंगात तर 666 कंपन्या लाल रंगात बंद झाल्या.
देशी – विदेशी गुंतवणूकदार.
विदेशी गुंतवणूकदारांकडून आज (FII / FPI ) ₹ 416.59 कोटींची खरेदी.
देशी गुंतवणूकदारांकडून आज (DII) ₹1,092.75 कोटींची विक्री.
आजचे आघाडीचे.
आजचे वधारणारे | फरक |
अदानी पोर्ट | ⏫ 14.5 % |
टाटा कन्स्युमर | ⏫ 4.6% |
एशियन पेंट्स | ⏫ 3.9% |
आजचे घसरणारे | फरक |
पॉवर ग्रीड | ⏬ 2.0 % |
ग्रासिम | ⏬ 1.3% |
आयशर मोटर्स | ⏬ 1.0% |