फोर्ब्ज इंडिया नुसार भारतातील दहा सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती (Top Ten Richest in India ) जाहीर झाल्या आहेत. खालून वर अशा क्रमात पाहूया कोण कोण आहे या यादीमध्ये.
10 ) सुनील मित्तल आणि परिवार (Sunil Mittal ) :
टेलिकॉम क्षेत्रातील उद्योगात आपलं नाव कमावून आणि राखून असलेले दिल्लीस्थित सुनील मित्तल हे आपल्या सर्वांनाच माहित आहेत.
एअरटेल हे त्याचं मुख्य ब्रान्ड. सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत (Top Ten Richest in India ) ते आहेत दहाव्या क्रमांकावर.
संपत्ती : 10 .5 बिलिअन डॉलर्स.
9 ) दिलीप संघवी (Dilip Sanghavi) :
फार्मा म्हणजे औषधे निर्मिती क्षेत्रातील सन फार्मास्युटीकल कोणाला माहित माही ? औषध निर्मिती आणि संशोधन क्षेत्रातील जगभरात नावाजलेलं भारतातील अग्रगण्य नाव.
संपत्ती : 10 .9 बिलिअन डॉलर्स.
8 ) सायरस पूनावाला (Cyrus poonawalla ) :
भारतात निर्मिती झालेल्या कोरोनाच्या दोन लशींपैकी ऑक्सफोर्डच्या लशीचं उत्पादन करणारी आपल्या पुण्यामधील सिरम या संस्थेचे संस्थापक अर्थात त्यांची ओळख एवढ्या पुरती मर्यादित नाही.
संपत्ती : 12 .7 बिलिअन डॉलर्स.
7 ) कुमार बिर्ला ( Kumar Mangalam Birla ) :
चौथ्या पिढीतील उद्योगजक असले तरी अत्यंत सक्षमपणे ते हा डोलारा सांभाळत आहेत. बिर्ला उद्योगाचा टेलीकॉम क्षेत्रात प्रवेश पुढे वोडाफोन – आयडिया आणि आता Vi (वुई ) म्हणून ओळख बनवत आहे.
संपत्ती : 12 .8 बिलिअन डॉलर्स.
6 ) लक्ष्मी मित्तल ( Lakshmi Mittal ):
लंडनस्थित भारतीय उद्योगपती. फेब्रुवारीमध्ये अर्सेलर मित्तल या आपल्या उद्योगसमुहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावरून बाजूला होऊनही कार्यकारी चेअरमन म्हणून कार्यरत आहेत.
संपत्ती : 14 .9 बिलिअन डॉलर्स.
5 ) उदय कोटक (Uday Kotak) :
भारतातील सर्वात श्रीमंत बँकर अशी ओळख. आघाडीच्या कोटक महिंद्र बँकेचे सर्वेसर्वा.
संपत्ती : 15 .9 बिलिअन डॉलर्स.
4 ) राधाकृष्ण दमाणी (Radhakrishna Damani ) :
डीमार्ट कुणाचं आहे हा पूर्वी हमखास विचारला जाणारा प्रश्न आता प्रश्न राहिला नाहीये, डीमार्ट कुणाचं हे माहित नसलेली व्यक्ती सापडणे कठीण. दमाणी तसे प्रसिद्धीच्या झोतापासून तसे दूरच राहणे पसंत करणारे.
संपत्ती : 16.5 बिलिअन डॉलर्स.
3 ) शीव नाडार (Shiv Nadar) :
सोफ्टवेअर क्षेत्रातील महत्वाचं नाव. एचसीएल टेक्नोलॉजीज या आपल्या उद्योग समूहाच्या चेअरमन पदावरून गेल्या जुलैमध्ये दूर होऊन त्या पदी आपल्या मुलीची ( रोशनी नाडार) नेमणूक केली.
संपत्ती : 23.5 बिलिअन डॉलर्स.
2 ) गौतम अदानी (Gautam Adani ) :
गेल्या काही वर्षांत अत्यंत वेगात आपल्या उद्योगाची वाढ केलेले, मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळामध्ये 74% हिस्सेदारी असलेले अदानी उद्योग समूहाचे मुख्य गौतम अदानी..
संपत्ती : 50.5 बिलिअन डॉलर्स.
1 ) मुकेश अंबानी (Mukesh Ambani) :
औपचारिकरित्या ओळख सांगायची गरज आहे ? कोविड काळातही आपल्या उद्योग समूहाच्या प्रगतीचा वेग कमी होऊ देणे तर दूरच पण तो नेहमीपेक्षा जास्त राखून अनेक मोठे व्यवहार अंबानी यांनी या काळात केले. सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत (Top Ten Richest in India ) ते आहेत दहाव्या क्रमांकावर.
संपत्ती : 84.5 बिलिअन डॉलर्स.
बरं या आहेत भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती (Top Ten Richest in India ), ज्यांचा डंका अगदी जगभरातही वाजतोय , पण जाता जाता आणखी एक वास्तव सांगतो कि गेल्या वर्षी जागतिक भूक निर्देशांकात ( Global Hunger Index ) जगातील 107 देशांमध्ये भारताचा क्रमांक होता 94.
लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा, तसेच आमचे इतर लेख आपण या लिंकवर वाचू शकता. धन्यवाद !