Image Source : Internet |
दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या सूक्ष्म , लघु , मध्यम (MSME ) उद्योगांसाठी सरकारने रिझोल्यूशनसाठीची ( Insolvency Resolution Process) प्रक्रिया सुरू केली आहे. हि एक पूर्व निर्धारित हायब्रीड प्रकारची फक्त कर्जदारांना डोळ्यासमोर ठेवून आणलेली प्रक्रिया आहे जी दिवाळखोरी संहितेच्या अंतर्गत काम करेल.
या अध्यादेशात सांगितल्याप्रमाणे इन्सॉल्व्हन्सी रेझोल्यूशन प्रक्रिया लागू केल्यामुळे या उद्योगक्षेत्रातील अनागोंदी कमी होण्यास तसेच उद्योगांच्या व्यवसायात सातत्य राखण्यास मदत होईल आणि परिणामी लोकांनी रोजगार गमाविण्याचे प्रमाण कमी होईल.