Image Source : Internet |
आज मार्केटची सुरवात तशी अडखळतच झाली, पण नंतर मात्र खरेदीचा उत्साह दिसून आला जो अखेर पर्यंत टिकून राहिला. सर्व क्षेत्रीय निर्देशांक सकारात्मक रित्या बंद झाले.काही सकारात्मक पतमानांकन वार्ता त्याच बरोबर रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरांत वाढ न करण्याचा अपेक्षित निर्णय आज बाजाराच्या पथ्यावर पडला असला तरी अजूनही “भय इथले संपत नाही” हे लक्षात ठेवूनच पुढील वाटचाल करावी लागणार आहे. कारण दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना केसेस आणि त्यामुळे उद्योग क्षेत्रापासून सर्वसामान्यांमध्ये अस्थिरतेची टांगती तलवार कायम आहे.
आज निफ्टी बँक (+1 .80 ) आणि ऑटो (+1 .60%) मधील सर्वाधिक वाढ दिसली.
सेन्सेक्स : 49,661.76 वर बंद ( 460.37 अकांची म्हणजेच 0.94 % नी वाढ) 27 कंपन्यांचे समभाग वधारले, 3 कंपनीचे घसरले.
निफ्टी : 14,819.05 वर बंद (135.55 म्हणजेच 0.92 % नी वाढ) 45 कंपन्यांचे वधारले, 5 कंपनीचे घसरले.
आजचे आघाडीचे.
आजचे वधारणारे | फरक |
जेएसडब्लू स्टील | ⏫ 5.3 % |
विप्रो | ⏫ 2.3% |
एसबीआय | ⏫ 2.1% |
आजचे घसरणारे | फरक |
अदानी पोर्ट | ⏬ 2.7 % |
टाटा कन्स्युमार | ⏬ 1.4% |
युपीएल | ⏬ 1.2% |