Image Source : Internet |
जन स्मॉल फायनान्स बँक आपला आयपीओ आणण्याच्या विचारात आहे.(jan small finance bank ipo in marathi) यासंदर्भात या स्मॉल फायनान्स बँकेने आयपीओ सादर करण्यासाठी बाजार नियामक सेबीकडे याचिका दाखल केली आहे. जन स्मॉल फायनान्स बँक जुलै 2006 मध्ये सुरू झाली होती.
समभागांच्या माध्यमातून बँक 700 कोटी रुपयांची भांडवल उभारू शकते, तर ऑफरच्या माध्यमातून 92,53,659 शेअर्सची विक्री केली जाईल.बँकेच्या देशभरातील शाखांच्या आकडेवारीकडे पाहिल्यास बँकने देशभरात बऱ्यापैकी जम बसवला आहे असं दिसून येतंय.
फेब्रुवारी 2021 पर्यंत देशातील एकोणीस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 222 जिल्ह्यांमध्ये बँकेच्या 611 शाखा आणि 134 एटीएम होते तर ग्रामीण भागात बँकेच्या 166 शाखा आहेत.