did you know thisdid you know this

हे तुम्हाला माहित आहे का ? Did you know this ?

भारतात एके काळी द्यावा लागत होता 98% इन्कमटॅक्स.

Tax in india
1971 सालात भारतातील प्राप्तीकर तब्बल 11 स्लॅब्जमध्ये विभागला गेला होता. ज्यात सर्वोच्च घटकाला तब्बल 85 % कर लागू होत होता आणि त्यावर द्यावा लागणारा 15 % अधिभार पकडून एकूण कर देयकता होती 97.75 %. याकाळातील करचोरीच्या सुरस कथा आपल्या वाचनात आजही येत असतात त्यामागचं कारण हेच असावं. त्यानंतर मागील पन्नास एक वर्षात करदात्यांची हि सारणी आता 3 घटकात विभागली गेलेय आणि ज्यात सर्वोच्च कर घटकास 30 % प्राप्तीकर आकाराला जातो.

वॉरेन बफेट (Warren Buffett ) यांच्या वयाच्या पन्नाशीत त्यांची संपत्ती होती आजच्या एकूण संपत्तीच्या केवळ 0.3%

warren buffett

 

वॉरेन बफेटचे चाहते असाल आणि वयाच्या चाळीशीनंतरही तुम्ही आर्थिकदृष्ट्या तेवढे सक्षम नसाल तर नाराज होऊ नका. कारण वॉरेन बफेट यांनी त्यांच्या आजच्या एकूण संपत्तीपैकी 96.60 % संपत्ती म्हणजे 87.5 बिलियन डॉलर्स हि वयाच्या 52 व्या वर्षानंतर कमावली आहे. आणि त्याही पुढे म्हणजे 72 बिलियन डॉलर्स इतकी संपत्ती त्यांच्याकडे वयाच्या पासष्टीनंतर आलेय. म्हणजे तुम्हाला अजून फार स्कोप आहे, फक्त प्रयत्न करणे सोडू नका.

जेव्हा शेअर्स व्यवहार सेटल व्हायला लागायचा एका महिन्याचा काळ.

stock trading
आज जेव्हा आपण शेअर्स खरेदी करतो तेव्हा दोन दिवसांत तो शेअर आपल्या डिमॅटमध्ये येतो. म्हणजे हि सेटलमेंट प्रोसेस फक्त दोन दिवसांची असते.पण ऐंशीच्या दशकात असं नव्हतं. त्याकाळात या प्रक्रीयेसाठी तब्बल एक महिन्याचा काळ लागत होता. नंतर 1990 मध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीमुळे हा काळ अर्ध्यावर म्हणजे 14 दिवसांवर आला. आणि आता मात्र हे केवळ 2 दिवसांत होतं. कदाचित यापुढे हा कालावधी आणखी कमी केला जाऊ शकतो.
 
 
इन्फोसीसचा IPO चक्क अंडरसबस्क्राइब्ड होता.
इन्फोसीस भारतातील आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांपैकी एक. आज गुंतवणूकदारांच्या सर्वाधिक पसंतीच्या कंपन्यांमध्ये असते. पण बर्याच जणांना माहित नसेल कि जेव्हा 1993 मध्ये इन्फोसीसने आपला आयपीओ आणला तेव्हा तो अंडरसबस्क्राइब्ड म्हणजेच 100 % सबस्क्राईब झालाच नाही. IPO ची इश्यू किंमत होती रु.95 आणि शेअर सूचीबद्ध झाला रु.145 ला. म्हणजे लिस्टिंगलाच कंपनीने 52 % परतावा दिला. आता सांगायचं तर त्यावेळी IPO द्वारे गुंतवलेले रु.9500 चे आजचे मूल्य आहे जवळपास 2 कोटी.
जेव्हा अनिल अंबानी होते मुकेश अंबानींपेक्षा श्रीमंत.
 
Mukesh Ambani


आज मुकेश अंबांनी म्हटलं कि जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक अशी त्यांची ओळख आहे. आणि अनिल अंबानींच्या आजच्या अवस्थेबद्दल तर सांगायला नको.पण आपण काही वर्ष मागे जाऊया.
 
2005 मध्ये अंबांनी बंधूंमध्ये रिलायन्स समूहाची वाटणी झाली आणि त्यानंतर वर्ष 2006 मध्ये अनिल यांची संपत्ती त्यांचे मोठे बंधू मुकेश यांच्या संपत्ती पेक्षा 500 कोटींनी जास्त होती. त्यानंतर वेळ हळू-हळू बदलू लागली. 2007 मध्ये फोर्ब्जने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार मुकेश यांची संपत्ती होती 49 बिलियन डॉलर्स तर अनिल यांची संपत्ती होती 45 बिलियन डॉलर्स. आज मुकेश यांची संपत्ती आहे 72 बिलियन डॉलर्स आणि अनिल अंबांनी स्वताची संपत्ती शून्य आहे असे सांगतात.
 
थोडक्यात सांगायचं तर मागील 12-13 वर्षांच्या काळात मुकेश यांची संपत्ती प्रत्येक सेकंदाला 61 डॉलर्स या वेगाने वाढत गेली तर याच कालावधीत अनिल यांची संपत्ती प्रत्येक सेकंदाला 110 डॉलर्स या वेगाने कमी होत गेली.
बनावट चलन. ( Fake Currency )
Fake Money

 

बनावट नोटांबद्दल आपण नेहमी ऐकतो. जगात असं कुठलंही चलन नसेल ज्यास या समस्येचा सामना करावा लागला नसेल. अगदी महासत्ता अमेरिकेलाही हि डोकेदुखी आहेच त्यांचेही बनावट अमेरिकन डॉलर्स छापले जातात आणि हे बनावट अमेरिकन डॉलर्स जास्त प्रमाणात छापले जातात उत्तर कोरियामध्ये. त्यांची हि नक्कल इतकी अस्सल वाटते कि तिकडे छापल्या जाणार्या या बनावट अमेरिकन डॉलर्सना ‘सुपरडॉलर्स’ असं म्हटलं जातं. कारण तिकडे छापल्या गेलेल्या या डॉलर्सचा नकलीपणा ओळखण्यासाठी फेडलासुद्धा  विशेष अशा उपकरणांची गरज पडते.
फक्त 8 % व्यवहार भौतिक चलनाने.
physical digital transections
भारतात डिजिटल व्यवहार आता कुठे रुळायला लागलेत पण जगात विशेषतः पाश्चात्य देशात ते अगदी अंगवळणी पडलंय. आणि डेबिट-क्रेडीट कार्ड्स वापरण्याचं प्रमाण आता आपल्याकडेही चांगलंच वाढलंय. त्यामुळे एकंदरीत जगाचा विचार करता जगभरात फक्त 8 % व्यवहार हे फिजिकल म्हणजेच भौतिक चलनाने ( कागदी नोटा, नाणी ) होतात. भविष्यात क्रिप्टोचा विचार करता पारंपारिक कागदी नोटा, नाणी फक्त म्युझीअम मध्येच पाहायला मिळणार असं दिसतंय.
सर्वात जास्त मूल्याची नोट ( Highly Valued Currency Note )
Ten Thousand
भारतात आतापर्यंत छापली गेलेली सर्वात जास्त मूल्याची नोटे हि रु. 10,000 आहे. जी प्रथम 1938 मध्ये छापण्यात आली आणि मग 1946 मध्ये रद्द करण्यात आली. त्यानंतर 1954 मध्ये पुन्हा चलनात आणली गेली आणि 1978 च्या नोटबंदीत पुन्हा रद्द झाली. अमेरिकेत सध्या सर्वाधिक चलनाची नोट हि 100 डॉलर्सची आहे. तिकडे एक लाख डॉलर्स मूल्याचे गोल्ड सर्टिफिकेट आणलं गेलं होतं जे सर्व सामान्य लोकांसाठी नसून फक्त बँकांसाठी अंतर्गत व्यवहारांसाठी होतं.
 
 
सर्वाधिक टायर उत्पादन करणारी कंपनी  ?
Lego
वाहनांसाठीच्या टायरचे जगातील सर्वाधिक उत्पादक कंपनी गुडइयर किंवा ब्रिजस्टोननसून ती कंपनी आहे लेगो (Lego) जी इतर कोणत्याही टायर उत्पादक कंपनी पेक्षा 50 % जास्त उत्पादन करते.  आश्चर्य वाटलं ? 
लेगो मुलांसाठी खेळणी बनवणारी कंपनीम्हणून प्रसिद्धआहे आणि त्या खेळण्यांत सर्वाधिक प्रकार गाड्यांचे आहेत म्हणून त्याच न्यायाने गाड्यांची चाके आणि टायर सुद्धा आले. गमतीचा भाग वेगळा पण युनिट्सचा विचार करता इतर पारंपारिक टायर बनवणाऱ्या कंपन्यांपेक्षा जास्त उत्पादन हो कंपनी करते. मग ते खेळण्यातले का असेना. 
साखरेचं माहेर घर. ( Home to Sugar )
Sugar India


जगाला भारताकडून अनेक गोष्टींची भेट मिळालेय, पण आणखी एक गोड भेट भारताने जगाला दिलेय ती म्हणजे साखर. जगात सर्वात प्रथम साखरेच उत्पादन भारतात झालं होतं. जवळपास अडीच हजार वर्षांपूर्वी उत्तर भारतात साखरे संदर्भात नोंद आढळते.

शंभरात फक्त ७ करदाते.

Taxpayers in india


भारतात प्रत्येक 100 मतदात्यांमध्ये फक्त 7 करदाते आहेत. म्हणजे मतदान करू शकणाऱ्या भारतीय नागरिकांत करदात्यांचे हे प्रमाण फक्त 7 % आहे. अर्थात या वास्तवाला अनेक पदर असतीलच पण तरीही यावरून भारतातील प्राधान्यक्रम लक्षात येऊ शकतो. म्हणूनच कदाचित सर्वाधिक आश्वासने मतदारांना दिली जातात आणि सेवा सुविधा पुरविताना करदात्यांचा विचार मात्र अगदी नगण्य असतो.
 
माहिती आवडली असेल तर शेअर करा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *