विक्रमी जीएसटी GST संकलन.
कोरोनाच्या दुसर्या लाटेने देशभरात हाहाकार माजवला असताना जीएसटीच्या बाबतीत मात्र सुखावणारी बातमी आहे. एप्रिलमध्ये एकूण जीएसटी संकलन 1,41,384 कोटी रुपये इतकं झालं आहे जे आतापर्यंतचे विक्रमी संकलन आहे. गेल्या महिन्यात म्हणजे मार्च मध्ये जीएसटी संकलन आकडेवारी होती 1,23,902 कोटी रुपये म्हणजे एप्रिलमध्ये मार्चच्या तुलनेत 14 % नि वाढ झाली आहे.
या एकूण जीएसटी संकलनात सीजीएसटी ( CGST ) चा हिस्सा आहे 27,837 कोटी रुपयांचा तर राज्यांचा म्हणजे एसजीएसटी (SGST) चा वाटा आहे 35,621 कोटी रुपयांचा.त्याच प्रमाणे आयजीएसटी ( IGST ) राज्यांतर्गत तसेच आयात निर्यात व्यवहारावरील जीएसटीचा हिस्सा आहे 68,481 कोटी रुपयांचा. देशांतर्गत होणाऱ्या व्यवहारातून मिळणाऱ्या उत्पन्नात जवळपास 21 % ची वाढ पाहायला मिळालंय. महत्वाचं म्हणजे जीएसटी संकलन एक लाख कोटींच्या वर होण्याचा हा सलग सातवा महिना आहे.
- एप्रिलमध्ये 1,41,384 कोटी रुपयांसह आतापर्यंतचा सर्वोच संकलन.
- मार्च महिन्याच्या तुलनेत 14% नी वाढ.
- देशांतर्गत व्यवहारातून होणार्या जीएसटी उत्पन्नात 21% वाढ.
- कोरोना संकटातही देशातील व्यावसायिकांनी वेळेवर रिटर्न्स फाईल करून नियमांचं पालन केलं आहे. अशा शब्दांत वित्त मंत्रालयाने व्यावसायिकांचं कौतुक केलं आहे.
Image Credit : Cover vector created by fatmawatilauda – www.freepik.com