एकापेक्षा जास्त बँक खाती असणे योग्य कि अयोग्य ?
(Is it Ok to have more than one bank account ?)

Is it Ok to have more than one bank account ?
Image by Maria_Domnina from Pixabay 
आजच्या काळात बँकेत खातं नाही अशी व्यक्ती सापडणे तसं कठीणच, अर्थात ग्रामीण भागात बऱ्याचजणांची बँक खाती अजूनही नसतील पण शाहरी, निमशहरी भागात सरासरी प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळ्या बँकेत 2 -3 तरी खाती असतील अशी परिस्थिती सध्या आहे. (Is it Ok to have more than one bank account ?)
मग बरेच वेळेला वाटतं कि इतकी बँक खाती असणे योग्य कि फक्त एकच बँक खातं ठेवावे ? याचं उत्तर शोधण्याआधी अनेक बँक खाती असण्याचे फायदे तोटे आपण समजून घेऊया.

एकापेक्षा जास्त बँक खाती असण्याचे फायदे. Benifits of having more than one bank accounts.

  • एकापेक्षा जास्त बँकेत खाती असतील तर एका बँकेवरचे अवलंबित्व कमी होते. अशावेळी पेमेंट करण्यासाठी किंवा घेण्यासाठी आपल्याकडे अतिरिक्त पर्याय उपलब्ध असतो. म्हणजे आपल्या एखाद्या बँकेच्या कामकाजात काही तांत्रिक समस्या उद्भवली असेल तर आपण दुसरे खाते वापरून आपलं काम पूपूर्णत्वास नेऊ शकतो.
  • मोफत एटीएम वापराच्या अतिरिक्त पर्याय  : प्रत्येक बँक महिन्यातून काही कमाल मोफत एटीएम व्यवहार करण्यास मुभा आपल्या खातेदारास देत असते. आणि त्यापलीकडे पुढील प्रत्येक व्यवहारास अतिरिक्त शुल्क आकारते. पण जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असतील तर तुम्हाला त्याप्रमाणात प्रत्येक बँकेच्या नियमानुसार मोफत एटीएम व्यवहार करण्यास वाढीव मर्यादा उपलब्ध होते.
  • व्यक्ती एक असली तरी तिच्या आर्थिक व्यवहारांची ओळख वेगवेगळी असू शकते. आणि बऱ्याच वेळेला त्यात वर्गवारी ठेवणे तसेच त्यांचा आढावा घेणे सोपे जाते. म्हणजे तुमच्या वेतनाचे, कर्जांच्या हफ्त्यांसाठीचे, विविध सरकारी अनुदान, प्राप्तीकर संदर्भातील व्यवहारासाठी एक खाते आणि दुसरे वैयक्तिक खर्च, गुंतवणूक इत्यादींसाठी असू शकते.
  • युपीआय (UPI) : हा प्रकार तर एव्हाना सर्वांच्या अंगवळणी पडू लागलाय. आणि सोयीचा असल्याने त्याचा वापरही वाढू लागलाय. पण त्याचबरोबर बरेचदा एखाद्या बँकेच्या तांत्रिक त्रुटींमुळे त्या बँकेच्या खात्यातून युपीआय व्यवहार करता येत नाही आणि अशावेळी मग दुसरं खातं असेल तरमग पटकन व्यवहार पूर्ण करता येतो.

बरं हे झाले अनेक बँक खाती असण्याचे काही फायदे.

आता याचे काही तोटे पाहूया, Disadvangaes of too many bank accounts.

  • प्रत्येक बँकेसाठी खात्यामध्ये किमान शिल्लक रकमेची मर्यादा असते आणि जर बँक खाती अनेक असतील तर त्या प्रत्येक बँकेत तशी रक्कम राखावी लागते जे कधीकधी काहीसं आर्थिक ओढाताणीचं ठरू शकतं.
  • बँक खाते वापरात नसेल तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ते डॉरमेंट म्हणजेच निष्क्रिय म्हणून जाहीर केले जाते म्हणजेच त्यावर असलेल्या सर्व सेवा बंद केल्या जातात आणि कदाचित त्यावर दंड सुद्धा आकारला जाऊ शकतो.
  • अनेक खाती असतील तर तुम्हाला ती वेळोवेळी नियमितपणे हाताळता यायला हवीत तसेच त्यांचे योग्य व्यवस्थापन करता यायला हवे. वेळेअभावी बरेचदा यात खंड पडण्याची शक्यता असते अशावेळी किमान रक्कम राखणे वगैरे बाबींकडे दुर्लक्ष होऊ शकते.
तर मित्रांनो,
 
अनेक बँक खाती असण्याचे वर सांगितलेले फायदे-तोटे लक्षात घेता आमच्यामते जर तुम्ही योग्य व्यवस्थापन कराल तर 2 – 3 बँक खाती असणे तोट्यापेक्षा फायद्याचं जास्त आहे. कारण ऐनवेळी होणाऱ्या गैरसोयीपेक्षा सोयीचा विचार यात जास्त आहे. अर्थात उगाचच 4 – 5 किंवा त्यापेक्षा जास्त बँक खाती बाळगण्यात काही हशील नाही. 
राहता राहिला प्रश्न खात्यात किमान शिल्लक रकम राखण्याचा तर अनेक बँका कोणतीही किमान रक्कम न राखण्याची अट असलेली बँक खाती देऊ करत आहेत. अर्थात नेहमीच्या बँक खात्यांप्रमाणे त्यावर सोयी सुविधांवर मर्यादा असल्यातरी हा एक वेळेस उपयोगी पडणारा चांगला पर्याय आहे.

तर मित्रांनो इथे आम्ही आमचं मत सांगितलं आहे, आपली स्वतःची किती बँक खाती असावीत हा निर्णय तुमच्या गरजे आणि सोयीप्रमाणे तुम्हीच घ्यायचा आहे.

माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *