Marathi StockMarathi Stock

तुमचा शेअरब्रोकर पळून गेला तर ???
(what happens if stock broker goes bust in india ?)

तुमचा शेअरब्रोकर पळून गेला तर ? (what happens if stock broker goes bust in india) प्रश्न शेअर मार्केटमध्ये व्यवहार करणाऱ्या बहुतांश व्यक्तींना कधी ना कधी पडला असेलच. काहीजणांनी उत्तरे शोधली असतील तर काहीजण “बघू तेव्हाचं तेव्हा, आपण एकटे थोडेच आहोत” असा सर्वसामान्य मानसिकतेनुसार विचार करून विसरूनही गेले असतील.

 
खरंतर असे घाबरवणारे प्रश्न पडायलाच हवेत, कारण तरच आपण त्यात लक्ष घालतो आणि गरज वाटल्यास उत्तर शोधतो, पर्यायांची चाचपणी करतो. थोडक्यात भीती माणसाला तगून राहायला शिकवते.
 
तर सुरवात करूया ब्रोकरपासून.

शेअर ब्रोकर म्हणजे काय ? ( Who is stock broker )

 
शेअरब्रोकर म्हणजे एक संस्था जिच्या मार्फत आपण शेअर मार्केटमध्ये खरेदी आणि विक्रीचे व्यवहार करतो. म्हणजे असे व्यवहार करताना आपण ब्रोकेरला सूचना करतो कि अमुक कंपनीचे शेअर्स मला एक्स्चेंज मधून अमुक किंमतीला खरेदी करून दे. अशावेळी तुम्हाला आधी तुमच्या ट्रेडिंग खात्यात काही रक्कम ठेवावी लागते. 

पण मग तुमच्या या ट्रेडिंग खात्यामधील रकमेचा दुरुपयोग होऊ शकतो का ?

तर, 
पूर्वी असं घडल्याची अनके उदाहरणे आहेत. पण आजच्या ऑनलाईन युगात नामवंत ब्रोकर असे करण्याची शक्यता कमीच. आणि तसंही सेबीच्या नियमानुसार शेअर ब्रोकर तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या ट्रेडिंग खात्यातील पैसे स्वतः साठी वापरू शकत नाही जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. ( अलीकडचं कार्वी प्रकरण लक्षात असेलच. ) 
 
आज तुम्ही जर एखाद्या ब्रोकरकडे ऑनलाईन पद्धतीने खाते उघडता तेव्हा त्या ऑनलाईन अर्जानंतर तुमचं खातं काही मिनिटांत उघडलं जातं. त्यानंतर ब्रोकर आपल्याला कुलमुखत्यार पत्र म्हणजे सर्वसामान्य भाषेत ज्याला आपण पॉवर ऑफ अटर्नी (POA ) म्हणतो, ते प्रिंट घेऊन पोस्टाद्वारे किंवा कुरियरद्वारे त्यास पाठवण्यास सांगतो. 
 
अर्थात हे POA पाठवणे बंधनकारक नाही कारण तुमचे शेअर मार्केटमधील व्यवहार या POA च्या शिवायही पूर्ण होऊ शकतात पण POA देणे म्हणजे तुमच्या वतीने तुमच्या खात्याचे व्यवहार करण्यास ब्रोकरला दिलेला सर्वांगीण अधिकार. ज्याचा जास्त वापर हा जेव्हा तुम्ही तुमच्या डिमॅट खात्यातून शेअर विकताना होत होता.
 
पण आता CDSL मार्फत तुम्हाला एक टी-पिन ( T PIN ) म्हणजे एक विशिष्ठ आकड्यांचा कोड दिला जातो जो तुम्ही तुमचे डिमॅट मधील शेअर विकताना वापरता. म्हणजेच तुमच्या खात्यातील सदर व्यवहार हे तुम्हीच करत आहात, तुमचा ब्रोकर नाही याची सर्वतोपरी काळजी इथे घेतली आहे. त्यामुळे POA वगैरे प्रकार आता तितके गरजेचे नाहीत.
 
पण तरीही जर तुम्ही तुमच्या खात्यासंदर्भात ब्रोकरकडून काही गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले असेल तर तुम्ही सेबीकडे तशी रीतसर तक्रार करू शकता. सेबीच्या वेबसाईटवर तशी सोय उपलब्ध आहे. ब्रोकरकडून काही गैरप्रकार केल्याचे सिद्ध झाल्यास त्या ब्रोकरवर निलंबनाची किंवा गरज पडल्यास या व्यवसायात आजन्म निर्बंधाची कारवाई केली जाऊ शकते.

ब्रोकर निवडताना काय पाहावे ( How to choose a stock Broker )

सर्वात महत्वाचे म्हणजे ब्रोकरचे सेबी नोंदणी क्रमांक पाहावा. आणि त्या क्रमांकाची सेबीच्या वेबसाईटवर जाऊन पडताळणी करावी त्याच बरोबर एनएससी मेंबर कोड ,बिएससी क्लिअरिंग कोड, एनएसडीएल आणि सीडीएसएल संदर्भातील क्रमांक पाहावे जे त्या ब्रोकरच्या वेबसाईटवर दिलेले असतात.
 
stockbroker sebi registration
 अपस्टॉक्सच्या वेबसाईटवर सेबी नोंदणी माहिती. Image source  : upstox    

खाते उघडताना द्यावी लागणारी फी : Charges for Opening demat account 

 
वार्षिक हाताळणी शुल्क (AMC ) : आपल्या खात्याच्या हाताळणीकरिता दरवर्षी ब्रोकरला द्यावे लागणारे शुल्क जे सध्या साधारणता रु.400 + सरकारी कर इतके आहे
 
मासिक हाताळणी शुल्क (MMC) : काही ब्रोकर वार्षिक हाताळणी शुल्क न घेता ते दर महिन्याला विभागून घेतात म्हणून त्यास मासिक हाताळणी शुल्क (MMC ) असे म्हणतात.
 
ब्रोकरेज : ब्रोकरचे मुख्य उत्पन्न. फुल सर्व्हिस ब्रोकरपेक्षा डिस्काऊंट ब्रोकरचे ब्रोकरेज फारच किफायतशीर असतात. उदाहरणार्थ अपस्टॉक्स, झिरोधासारखे ब्रोकर इंट्राडेच्या प्रत्येक व्यवहारासाठी कमाल रु.20. आणि  डिलेव्हरी म्हणजेच एक दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी शेअर्स घेतले तर त्यासाठी कोणतेही ब्रोकरेज घेतले जात नाही. यामुळे सध्याच्या काळात अनेकांची डिस्काऊंट ब्रोकर्सना पसंती असते.
असं असलं तरी काहीजण फुल सर्व्हिस ब्रोकरकडून मिळणारी विविधांगी सेवा वगैरे लक्षात घेऊन फुल सर्व्हिस ब्रोकरना पसंती देतात. अर्थात हा ज्याचा त्याचा स्वतःचा निर्णय असतो.
 
आता येऊया मूळ प्रश्नाकडे..
जर तुमचा शेअरब्रोकर दिवाळखोरीत गेला तर  ? (what happens if stock broker goes bust in india ?)
याचं उत्तर मिळवण्यासाठी आपण काही प्रसंग घेऊन त्यानुसार स्पष्टीकरणाकडे येऊया.
 
समजा उद्या काही शेअर्स गुंतवणुकीसाठी घेण्याचा विचार करून किंवा ट्रेडिंग करण्यासाठी म्हणा पण तुम्ही आज तुमच्या ट्रेडिंग खात्यात काही पैसे ट्रान्स्फर केलेत आणि उद्या तुमच्या ब्रोकरने दिवाळखोरी जाहीर केली. तर अशाप्रसंगी तो तुमच्या ट्रेडिंग खात्यातील पैसेही घेऊन जाण्याची शक्यता असते.

अशावेळी तुम्ही काय करू शकता ?

तुम्ही वेळ न दवडता सेबीला या प्रकरणाची माहिती देऊन तुमच्या नुकसानाचा दावा करू शकता. यासाठी सेबीकडे ‘इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड’ (IPF ) ची तरतूद असते ज्याद्वारे शेअर ब्रोकरकडील खातेदार / गुंतवणूकदार यास त्याच्या नुकसानापोटी 15 लाखापर्यंतच्या भरपाईची तरतूद असते.

पण समजा हे तक्रार दावा वगैरे करण्यात तुमच्याकडून उशीर झाला..

उशिरात उशीर किती चालू शकतो ? ब्रोकरचे हे कांड घडल्यावर तीन वर्षाच्या आत तुम्ही तक्रार आणि दावा दाखल केल्यासही सेबी तुमचा दावा विचारात घेऊन तुम्हाला किती भरपाई द्यावी किंवा कसे यावर विचार करू शकते.
 
आणि त्यापेक्षाही म्हणजे तीन वर्षानंतर जर तुम्ही तक्रार, दावा वगैरे केलात तर मात्र तुमच्या सारखे तुम्हीच ! 

आणि मग तुम्हाला सेबीकडून फक्त भोपळा मिळू शकतो.

आता दुसरा प्रसंग, 
 
जर ब्रोकर दिवाळखोरीत गेला ( If stock broker shuts down ) आणि तुमच्या डिमॅटमध्ये काही शेअर्स असतील तर तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही. कारण ब्रोकर तुमचं डिमॅट खातं घेऊन पळून जाऊ शकत नाही. तुमचं डिमॅट एकतर CDSL किंवा NSDL या दोन पैकी कोणा एका DP कडे असु शकतं. मग असं काही झालं तर तुम्हाला तुमच्या या DP कडे अर्जकरून तुमचे ट्रेडिंग खाते दुसऱ्या ब्रोकरकडे जोडून घेऊ शकता.
 
अर्थात हे तुम्ही तुमच्या सध्याच्या ब्रोकरच्या सेवेशी समाधानी नसाल तरीही करू शकता.
 
मित्रांनो आपल्यापैकी कुणी शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करण्याच्या विचाराने ट्रेडिंग आणि डिमॅट खाते अजूनही उघडले नसेल, आणि जर उघडण्याची इच्छा असेल तर आपण खालील आमच्या रेफरल लिंकवरून अपस्टॉक्समध्ये 15 मिनिटांत ऑनलाईन पद्धतीने ट्रेडिंग आणि डिमॅट खाते  उघडू शकता.
 

  ट्रेडिंग आणि डिमॅट खाते उघडण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.  

मित्रांनी आशा आहे कि या महत्वाच्या विषयासंदर्भात तुमच्या शंका दूर झाल्या असतील. माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा. 
 
 
धन्यवाद .   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *