आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्यूअल फंडातर्फे गुंतवणुकीसाठी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फ्लेक्झीकॅप फंडरुपी नवी योजना.
(Press Release)

 
How to invest in mutual fund
Image : Wikipedia


 
(मुदतमुक्त प्रकारातील ही लवचिक समभाग योजना लार्ज,मिड आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये गुंतवणूक करणार )

वैशिष्टे

• नवीन फंड ऑफर ( एनएफओ) येत्या 28 जून 2021 ला खुली होणार तर बंद 12 जुलै 2021 ला होणार

• भांडवल गुंतवणुकीसाठी स्वतः विकसित केलेल्या मॉडेलआधारे शेअरबाजारातील विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये संधी हेरत आयसीआयसीआय फंड गुंतवणूक करणार आहे.

• उच्च किंमतपासून ( टॉप-डाऊन) ते अल्प किंमतवरुन ( बॉटम-अप) योग्य समभागांची या फंडासाठी निवड केली जाणार आहे.

• किमान गुंतवणूक ( पर्याय बदलासह ) पाच हजार रुपये आणि त्यापुढे एक रुपयाच्या पटीत या करता येईल.

मुंबई, ता. 11 जून 2021 : आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्यूअल फंडाने गुंतवणूकदारांसाठी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फ्लेक्झीकॅप फंड ही मुदतमक्त प्रकारातील समभाग गुंतवणूक योजना आणली आहे. ही योजना प्रामुख्याने शेअरबाजारात समभाग आणि तत्सम प्रकारात गुंतवणूक करत भांडवल वृध्दी करणार आहे. गुंतवणूकीसाठी स्वतः विकसित केलेल्या गुंतवणूक मॉडेलचा वापर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल करणार आहे. नवीन फंड गुंतवणुकीसाठी येत्या 28 जून 2021 ला खुला होत असून 12 जुलै 2021 ला बंद होणार आहे.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फ्लेक्झीकॅप फंड हा प्रामुख्याने उच्च किंमतीकडून कमी किंमतीकडे आणि अल्प किंमतीपासून उच्च किंमतीकडे म्हणजेच टॉप-डाऊन आणि बॉटम-अप या मिश्र पध्दतीचा वापर करत लार्ज, मिड आणि स्मॉल प्रकारातील समभागांमध्ये संधी शोधत गुंतवणूक करणार आहे. या समभागांची निवड ही प्रामुख्याने कंपनीची मुलभूत कामगिरी, आर्थिक मुल्यमापन आदी घटकांआधारे केली जाणार आहे.
नवीन फंडाची घोषणा करताना आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निमेष शहा म्हणाले की, फ्लेक्झीकॅप ( सेबीच्या फंड वर्गीकरण नियमानुसार ) ही समभाग गुंतवणूक योजनांपैकी एक योजना असून ती सर्वाधिक लवचिक अशी योजना आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फ्लेक्झीकॅप फंडाकडे लार्ज, मिड आणि स्मॉल अशा प्रकारातील समभागांमध्ये कोणत्याही बंधनाविना गुंतवणूक करण्याची लवचिकता आहे. आम्ही स्वतः विकसित केलेले गुंतवणूकीचे मॉडेल वापरत गुंतवणुकीला दिशा देणार आहे, परंतु त्याचबरोबर विविध बाजारमुल्यांच्या समभागांमध्ये योग्य गुंतवणुकीचे उद्दीष्ट साध्य करणार आहोत. याचबरोबर अर्थव्यवस्थेचे ढोबळ घटक आणि व्यापार चक्र यांचा वेळोवेळी विचार करत फंड व्यवस्थापक आमच्या योजनांनुसार गुंतवणुकीला योजनाबध्द आकार देत जाणार आहेत. पुर्णपणे नियंत्रण आणि लवचिकता यांची योग्य गुंफण करत बाजारातील चढउतारांमध्येही योग्य पध्दतीने वाटचाल करत गुंतवणूकदारांचे आर्थिक उद्दीष्ट पुण करण्यास आम्ही मदत करणार असल्याचा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फ्लेक्झीकॅप फंड हा लार्ज, मिड आणि स्मॉल समभागांसाठीची गुंतवणक ही सातत्याने तपासत त्यात वेळोवेळी समतोल साधणार आहे. त्यासाठी गुंतवणूकीचे स्वतःचे मॉडेल आणि फंड योजनेसाठी असलेल्या गुंतवणूक नियमांचे पालन केले जाणार आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या गुंतवणूक मॉडेलमध्ये समभागाचे मुल्य, गुंतवणूक केलेल्या समभागांचा अन्य समभागांच्या तुलनेत ताकदीतील फरक, एकुण बाजारमुल्याच्या तुलनेत समभागाच्या बाजरमुल्याचे टक्क्यांमध्ये भार आदी निकष वापरले जातात. व्यापार आणि आथिक मुलभूत घटकांआधारे मिळणाऱ्या संकेतांच्या जोडीला सखोल विश्लेषण, सक्षमपणे समभागांची निवड आणि दीर्घ मुदतीच्या दृष्टीकोनातून वृध्दी, चलनवाढ दर, चालू खात्यातील तुट अथवा बचत, वित्तीय तुट यांचा विचार करत सुदृढ असा समभागांचा पोर्टफोलिओ विकसित केला जाणार आहे. या फंड योजनेत दिलेल्या माहितीनुसारच गुंतवणूक नियमांचे पालन केले जाणार आहे.

बाजारातील अस्थिरतेच्या वेळेत लार्ज कॅप समभाग हे बाजाराची घसरण प्रामुख्याने रोखतात आणि पोर्टफोलिओला रोखता प्रदान करतात. सध्याचे लॉकडाऊन हटविल्यानंतर अर्थव्यवस्थेत अपेक्षित धरण्यात आलेल्या उभारीमुळे मिड आणि स्मॉल कॅप समभाग हे या वृध्दीचा फायदा घेण्यात अधिक सक्षम ठरतात, ही या फंडासाठी संकल्पना निश्चित करण्यात आलेली आहे.

नवीन फंडाचे व्यवस्थापन हे वरिष्ठ फंड व्यवस्थापक रजत चांडक तर विदेशी बाजारातील गुंतवणुकीची जबाबदारी प्रियंका खंडेलवाल हे सांभाळणार आहेत. अर्थव्यवस्था आणि त्यातील व्यापार चक्र याचा अचुक अंदाज बांधण्यात माहिर असलेले एस. नरीन यांच्या नेतृत्वाखाली आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फ्लेक्झीकॅप फंडाकडे गुंतवणूक आणि संशोधन टीम असून ती भारतातील सर्वाधिक मोठ्या आणि अनुभवी टिमपैकी एक आहे.

नवीन फंड गुंतवणुकीसाठी येत्या 28 जून 2021 ला खुला होत असून 12 जुलै 2021 ला बंद होणार आहे.

म्युच्यूअल फंडातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते, गुंतवणुक करण्यापूर्वी ऑफर डॉक्युमेंट समजून घेणे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *