बँकींग आणि पीएसयू फंडात गुंतवणूकीसाठी योग्य वेळ.
(Right time to invest in banking and PSU Fund)
Image by mohamed Hassan from Pixabay |
वैभव शहा, प्रमुख-उत्पादन, विपणन आणि संपर्क, मिरे ॲसेट इनव्हेस्टमेंट मॅनेजर्स.
बँकिंग आणि पीएसयू फंड हे प्रामुख्याने रोखेविषयक म्युच्यूअल फंडयोजना असून यातील निधी हा प्रामुख्याने बँका, सार्वजनिक क्षेत्रातीलकंपन्या ( पीएसयू ) आणि सार्वजनिक वित्तीय संस्था ( पीएफआय ) यांनी बाजारात आणलेल्या रोखे आणि चलनबाजारातील विविधसाधनांत गुंतविला जातो. सेबीच्या म्युच्यूअल फंड वर्गीकरण नियमानुसार, बँकींग आणि पीएसयू फंडांनी त्यांचा किमान 80 टक्के निधी हा या विविधसंस्थांनी बाजारात आणलेल्या विविध प्रकारच्या रोखेविषयकसाधनांमध्येच गुंतविला पाहिजे.
बँकीग आणि पीएसयू फंड कामकाज कसे करतात?
• बँकीग आणि पीएसयू फंड यांनी आपल्या निधीतील 80 टक्के निधीहा बँका, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि सार्वजनिक वित्तीयसंस्था यांनी बाजारात आणलेल्या रोखे आणि चलनबाजारातीलविविध साधनांतच गुंतविला पाहिजे.
• आकर्षक परताव्याच्या दृष्टीकोनातून योग्य कालावधीच्या साधनांतगुंतवणूक करण्याची लवचिकता फंड व्यवस्थापकाकडे असते.
• व्याजदराच्या भविष्यातील वाटचालीचा विचार करत बँकीग आणिपीएसयू फंडाचे व्यवस्थापक हे योग्य कालावधीसाठी सक्रीयगुंतवणूकीचा निर्णय घेतात. जर व्याजदराची पुढील वाटचाल हीखात्रीशीर आणि लाभदायक वाटत असेल तर हे फंड त्यांच्यागुंतवणुकीचा कालावधी वाढवू शकतात अथवा कमीही करुशकतात. स्थिर उत्पन्न साधनांच्या किंमती या व्याजदरातीलबदलाशी व्यस्त प्रमाणात संबंधित असतात. रोख्यांचा कालावधीजितका दीर्घ तितके ते व्याजदरातील बदलाबाबत अधिकसंवेदनशील असतात.
• पत जोखीम – बँका, पीएसयु आणि पीएफआय यांनी बाजारातआणलेले रोखे आणि चलनबाजारातील विविध साधने ही प्रामुख्यानेउच्च पतदर्जाची असतात. पीएसयू आणि काही पीएफआय याप्रामुख्याने सरकारी मालकीच्या संस्था आहेत. त्यामुळे त्यांच्या रोखेआणि चलन साधनांना सर्वोत्तम सार्वभौम दर्जा लाभलेला असतो. त्यांची पत जोखीम ही अतिशय कमी असते. बँका आणि पीएफआय( सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील) यांना उच्च पतमापन दर्जालाभतो, कारण त्या नियमांनुसार नियंत्रित संस्था असतात आणित्यांच्याकडे पुरेसे भांडवल असते.
बँकीग आणि पीएसयू फंडांसाठी कर आकारणी
जर तुमच्या गुंतवणूकीचा कालावधी हा तीन वर्षापेक्षा कमी असेल, तरतमुच्या उत्पन्नात भांडवली नफा समाविष्ट केला जातो आणि त्या त्यावेळेला असलेल्या कराचा दर लागू होतो. दीर्घ मुदतीसाठीच्या भांडवलीनफ्यावर ( गुंतवणुकीचा कालावधी तीन वर्ष किंवा त्यापेक्षा कमीअसणे ) चलनवाढ दराचा लाभ गृहीत धरुन 20 टक्के कर आकारलाजाईल. बँकीग आणि पीएसयू फंडांनी दिलेला लाभांश ( अर्थात नफावितरण तसेच निधी हस्तांतरण ) हा तुमच्या उत्पन्नात धरला जातो आणिसंबंधित प्राप्तीकरानुसार त्यावर करआकारणी केली जाते.
तुम्ही आत्ताच गुंतवणूक का करावी ?
अमेरिकीच्या मध्यवर्ती बँकेने अद्यापही व्याजदर हे जवळपास शुन्यटक्क्यांनजीक स्थिर ठेवलेले असल्याने अमेरिकी चलनरोख्यांवरीलपरतावा हा अद्यापही अतिशय तळ पातळीवर आहे. त्यांनी रोखे खरेदीचाकार्यक्रम अद्यापही सुरुच ठेवलेला आहे. परंतु अमेरिकी अर्थव्यवस्था हीवाढीच्या दिशेने संकेत देत असल्याने सर्वसमावेषक पतपुरवठा धोरणालात्यांची मध्यवर्ती बँक काही अंशी मुरड घालण्याचे संकेत देत आहेत. परिणामी अमेरिकीतील व्याजदर आणि रोख्यांचे उत्पन्न हे आत्तापासूनमध्यम कालावधीत वाढू शकते.
तेथील या घडामोडींचा भारतातील सरकारी रोखे अर्थात जी-सेकच्याउत्पन्नावर होणार आहे. दहा वर्षाच्या सरकारी कर्जरोख्यांतील उत्पन्न हेगत दहा वर्षातील त्याच्या तळ पातळीवर असून आता कधीतरी ते वरच्यादिशने मार्गक्रमण करेल. जर उत्पन्न वाढले तर रोख्यांच्या किंमती खालीयेतील. दीर्घ मुदतीचे रोखे हे अल्प मुदतीच्या रोख्यांच्या तुलनेतव्याजदरातील बदलाबाबत अधिक संवेदनशील असतात. बँकीग आणिपीएसयू फंडाकडे या विविध मुदतीच्या रोख्यांमध्ये गुंतवणुक करण्याचीलवचिकता असते. व्याजदरातील संभाव्य बदलांचा आगाऊ अंदाज बांधतहे फंड योग्य मुदतीसाठीचा निर्णय घेतात. जर व्याजदर वाढण्याचीशक्यता असेल तर बँकीग आणि पीएसयू फंड हे गुंतवणूक कालावधीकमी करत व्याजदराशी संबंधित जोखीम कमी करतात. जोखीम आणिपरतावा यांच्यातील रस्खीखेच व्यवस्थित सांभाळत कर्जाचा विस्तारआकर्षक जाणवणाऱ्या मुदतीच्या आधारेच हे फंड आपली गुंतवणूककरतात. याशिवाय बँकीग आणि पीएसयू फंड यांची गुंतवणूक जोखीम हीखुपच अल्प असते. कारण त्यांनी गुंतवणूक केलेले रोखे ज्या संस्थांनीआणलेले असतात, त्यांना उच्च पतदर्जा लाभलेला असतो.
कोणी गुंतवणूक केली पाहिजे ?
• व्याजदराच्या लाभदायक वातावरणात प्रामुख्याने नियमित उत्पन्नआणि भांडवलवृध्दी हवे असणारे गुंतवणूकदार.
• मध्यम स्वरुपाची जोखीम स्वीकारु शकणारे गुंतवणूकदार
• किमान तीन वर्ष आपली गुंतवणूक कायम ठेवू शकणारे गुंतवणूकदार
जर बँकिंग आणि पीएसयू फंड हे त्यांच्या गुंतवणूकीच्या गरजा पुर्ण करतअसतील तर गुंतवणूकदारांनी त्यांच्या वित्तीय सल्लागाराकडून याबाबतमार्गदर्शन घेतले पाहिजे.
लेखातील विविध माहितीसाठीचा स्त्रोत : ब्लुमबर्ग ॲण्ड एसीईएमएफ -31 मे 2021 अखेर