Multibagger stock indiaMultibagger stock india

गुंतवणूक करताना सर्वसामान्य माणूस परताव्यासाठी परिमाण काय वापरतं ? त्याचा सर्वात पहिला प्रश्न असतो तो म्हणजे, माझी गुंतवणूक दुप्पट किती वर्षांत होईल ? पण शेअर मार्केट हे एक असं क्षेत्रं आहे जिथे अगदी परतावा न भूतो न भविष्यति असतो. अर्थात इथे नुकसानसुद्धा सगळं काही ओरबाडून नेणारं असतं. हे सगळं आज सांगण्याचं कारण म्हणजे आज असेच काही शेअर्स आपण पाहणार आहोत ज्यांनी मागील महिन्याभरात दुपटीपेक्षा मोठी झेप घेतलेय.अर्थात मागील काही महिन्यांपासून तेजीचा वारू चौखूर उधळला असल्याने असं बरेचदा होताच असतं.

पण असे समोर वाढत असलेले शेअर्स पाहून लगेच त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा लेख आधी पूर्ण वाचा आणि मगच निर्णय घ्या.

तर पाहूया कोण कोणते आहेत हे शेअर्स. ( Multibagger Stock list, Really ?)

1. बीपीएल लिमिटेड (BPL Ltd) इलेक्ट्रिकल क्षेत्रातील या कंपनीचा स्टॉक एका महिन्यात 175.70 टक्क्यांनी वधारला आहे. या स्टॉकची 30 ऑगस्ट रोजी किंमत 39.40 रुपये होती जी 69.2 रुपयांनी वाढून १०८.६५ रुपये झाली आहे. 
 
2. कॉन्टिनेंटल केमिकल्स लिमिटेडमध्ये (Continental Chemicals Ltd) एका महिन्यात 167.50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 30 ऑगस्ट रोजी 141.45 रुपयांना होता. जो महिनाभरात 236.95 रुपयांना वाढून 378.40 रुपयांवर आला आहे. 

3. प्लॅस्टिक उत्पादने क्षेत्रातील गोपाला पॉलीप्लास्ट लिमिटेडचा (Gopala Polyplast Ltd) स्टॉक एका महिन्यात 167 टक्क्यांनी वाढला आहे. या स्टॉकची किंमत 30 ऑगस्ट रोजी 243.45 रुपये होती जी आता 406.85 रुपयांनी वाढून 650.30 रुपयांपर्यंत आली आहे.

4. वित्त क्षेत्रातील सिंधू ट्रेड लिंक्स लिमिटेडनेही (Sindhu Trade Links Ltd) चांगली कामगिरी केली. या स्टॉकमध्ये एका महिन्यात 164.50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 30 ऑगस्ट रोजी या स्टॉकची किंमत 116.60 रुपये होती. जी महिनाभरात 191.90 रुपयांनी वाढून आता 308.50 रुपयांवर आली आहे. 

5. जेआईटीएफ इंफ्रालॉजिस्टिक्स लिमिटेड (JITF Infralogistics Ltd) स्टॉकमध्ये गेल्या एका महिन्यात 164 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. गेल्या महिन्यात 30 ऑगस्ट रोजी या स्टॉकची किंमत 67.80 रुपये होती. जी 111.25 रुपयांनी वाढून आता 179.05 रुपयांवर आली आहे.   

6. फायनान्स क्षेत्रातील TTI Enterprise Ltd मध्ये 164.60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात 30 ऑगस्ट रोजी या स्टॉकची किंमत 11.83 रुपये होती. जी महिनाभरात 19.48 रुपयांनी वाढून आता 31.31 रुपयांवर गेली आहे. 

7. गेल्या एक महिन्यात आदिनाथ टेक्सटाइल्स लि.चा (Adinath Textiles Ltd) शेअर 163.60 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या महिन्यात 27 ऑगस्ट रोजी या शेअरची किंमत 36.75 रुपये होती. जी 60.15 रुपयांनी वाढून आता 96.90 रुपायंवर पोहोचली आहे. 

8. चेन्नई फेरस इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये (Chennai Ferrous Industries Ltd) गेल्या एका महिन्यात 162.70 टक्क्यांनी वाढ झाली आहे . या शेअरची किंमत गेल्या महिन्यात 30 ऑगस्ट रोजी 30.90 रुपये होती. जी महिनाभरात 50.30 रुपयांनी वाढून आता 81.20 रुपयांवर पोहोचली आहे.

9. बॉम्बे वायर रोप्स लिमिटेडमध्ये (Bombay Wire Ropes Ltd) गेल्या एका महिन्यात 162.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या स्टॉकची किंमत गेल्या महिन्यात 30 ऑगस्ट रोजी 25.75 रुपये होती. जी 41.80 रुपयांनी वाढून 67.55 रुपयांवर पोहोचली आहे. 

10. एशियन पेट्रोप्रोडक्ट्स अँड एक्स्पोर्ट्स लिमिटेडचा (Asian Petroproducts & Exports Ltd) शेअर गेल्या एका महिन्यात 162.10 टक्क्यांनी वाढला आहे. या शेअरची किंमत गेल्या महिन्यात 30 ऑगस्ट रोजी 21.95 रुपये होती. जी आता 35.6 रुपयांनी वाढून 57.55 रुपयांवर आली आहे.

बरं काय वाटतं तुम्हाला हे शेअर्स आणि इतक्या कमी कालावधीत दिसणारा हा परतावा पाहून ?

तुम्ही जर हे शेअर्स शोधायचा प्रयत्न कराल तर तुमच्या लक्षात येईल कि यातील जवळपास सर्व शेअर्स फक्त बीएसई म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध आहेत, ते एनएससीवर सूचीबद्ध नाही आहेत. आता शेअर मार्केटमध्ये बऱ्यापैकी अनुभव असलेली कोणतीही सर्वसामान्य व्यक्ती ट्रेडसाठी सर्वात जास्त पसंती एनएससीला देतो. याचे कारण एनएससीची तरलता व पारदर्शकता.

अर्थात याचा अर्थ असा मुळीच नव्हे कि बीएसईवरील शेअर्स ट्रेडिंग संशयास्पद आहे. ब्लूचिप, लार्जकॅप तसेच अशा अनेक विश्वासार्ह कंपन्या ज्या बीएसई आणि एनएसई या दोहोवर सूचीबद्ध आहेत. पण बरेचदा काही पेनी शेअर्स, किंवा काही फारसं ऐकिवात नसलेल्या काही कंपन्या असतात ज्या सहजपणे प्रभावाखाली आणून त्यातील किंमतीत चढ-उतार आणता येतात. ज्यातील अनेक दोन्ही मार्केटवर सूचीबद्ध असण्याचं प्रमाण कमी असतं. अशा अनेक शेअर्सना थेट अप्पर सर्किट लागत राहतो आणि त्यानंतर पुढे त्याच रीतीने लोअर सर्किट सुद्धा सुरु होतो. या अशा सापळ्यात या क्षत्रात आलेले अनेक नवखे सहजपणे फसू शकतात.

तर अशा शेअर्समध्ये ट्रेड करताना पूर्ण अभ्यास करून मगच व्यवहार करावेत हा सल्ला महत्वाचा ठरतो. आमचे इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *