How are the stocks classified by their groups in marathiHow are the stocks classified by their groups in marathi

शेअर्स खरेदी विक्री करताना आपण बरेचदा पाहतो कि अमुक एखादा शेअर एखाद्या विशिष्ट ग्रुप मधला आहे. म्हणजे एखादा ‘A’ ग्रुप मधील तर दुसरा एखादा ‘T’ ग्रुप मधील. खरंतर शेअर मार्केटमध्ये बीएससी आणि एनएससीवर शेअर्सची विविध गटामध्ये विभागणी करण्यात आली आहे (How are the stocks classified by their groups in marathi) आणि त्यामागे विशेष अशी कारणे असतात. चला आज पाहूया नक्की काय सांगतात बीएससीवरील शेअर्सचे हे गट (ग्रुप) शेअर्सबद्दल. (How are the stocks classified by their groups)

‘अ’ गटातील शेअर्स (A Group Shares ) : उच्चतम तरलता असणारे प्रतिष्ठीत कंपन्यांचे समभाग. या कंपन्या स्टॉक एक्स्चेंजच्या नियमांचे वेळोवेळी पालन व व्यवहारात पारदर्शकता राखणाऱ्या असतात तसेच या कंपन्यांच्या व्यवहारासंदर्भात नियमित सेटलमेंट सायकल अनुसरली जात असते.

‘टी’ गटातील शेअर्स (‘T’ Group Shares ) : टी (T) म्हणजे ‘ट्रेड टू ट्रेड’ आधाराने वर्गीकरण केलेले हे शेअर्स. म्हणजे या गटातील शेअर्स मध्ये इंट्रा-डे ट्रेडिंगला परवानगी नसते. जर आज तुम्ही या गटातील कंपनीचे शेअर्स घेतले तर ते तुमच्या डिमॅटमध्ये आल्यानंतरच तुम्ही ते विकू शकता. शेअर्समधील अवास्तव सट्टेबाजी टाळण्यासाठी अशा प्रकारचा हा नियम आहे.

‘झेड’ गटातील शेअर्स (‘Z’ Group Shares ) : जेव्हा एखादी कंपनी स्टॉक एक्स्चेंजच्या नियमांचे पालन करण्यास असमर्थ ठरते अशा वेळी त्या कंपनीच्या शेअर्सचा समावेश या गटामध्ये केला जातो. गुंतवणूकदारांच्या तक्रार, गाऱ्हाणी न सोडवणाऱ्या कंपन्यांचासुद्धा समावेश या गटात होतो. या गटातील शेअर्समध्ये व्यवहार करणे जोखमीचे आहे.

‘एस’ गटातील शेअर्स (‘S’ Group Shares ) : अशा स्मॉल मिडीएम एन्टरप्रायझेस कंपन्यांचे असे शेअर्स ज्यांची वार्षिक उलाढाल 5 कोटींच्या आत असते तसेच स्थावर मालमत्ता मूल्य ३ कोटींपर्यंत असते. अशा कंपन्यांच्या समभाग व्यवहारात व्हॉल्युम आणि तरलता कमी आढळते.

‘एम’ गटातील शेअर्स (‘M’ Group Shares ) : स्मॉल मिडीएम एन्टरप्रायझेस कंपन्यांचे असे शेअर्स ज्यांचे व्यवहार लॉटच्या माध्यमातून म्हणजेच फ्युचर्स ऑप्शन्ससारख्या पद्धतीने होतात. अशा शेअर्सचा समावेश एम गटात होतो.

बी’ गटातील शेअर्स (‘B’ Group Shares ) : ‘अ’ गटा खालोखाल सामान्य व्यवहार व्हॉल्युम असलेले पण वेळोवेळी बदल केली जाणारी सेटलमेंट व्यवस्था या गटातील शेअर्सचे वैशिष्ट्य. वरील कोणत्याही गटात न बसणारे शेअर्स या गटात असतात.

शेअर मार्केट मध्ये जितकं खोलात शिरू तसतसं हे क्षेत्र किती अफाट आहे याची जाणीव आपल्याला होते अशावेळी पडणारे प्रश्न , शंका वेळोवेळी दूर करण्याचा प्रयत्न असावा. हे असं क्षेत्र आहे ज्यामध्ये अगदी वीस वर्षाहून जास्त अनुभव असलेली व्यक्तीची सुद्धा शिकण्याची प्रक्रिया सुरूच असते.

आपण इथे क्लिक करून आमचे इतर लेख वाचू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *