सत्ताधारी, राजकारणी नेते भ्रष्टाचार करतात. अर्थात काही सन्माननिय अपवाद असतीलही. पण आपण सर्वसामान्य अनेकदा यावरून यथेच्छ टीका त्यांच्यावर करतो. आणि लोकशाहीत तेच अभिप्रेत आहे. जनतेचे सेवक म्हणवून घेणारे जेव्हा आपले विशेषाधिकार , सत्ता यांचा वापर स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी करतात तेव्हा आपल्यासारख्या सर्वसामान्यांना राग येणे साहजिकच आहे.
पण भ्रष्टाचार फक्त राजकारणीच करतात का ? आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याकडूनही अनेकदा असं बरेचदा होत असतं. राजकारण्यांच्या पराक्रमाच्या तुलनेत आपल्या कार्याचा आकार, प्रमाण नक्कीच कमी असेल पण हे बऱ्याचदा ‘संधीविना सज्जन’ असंही असतं.
आजच्या या चाचणीत हेच पडताळायचंय कि भ्रष्टाचारावर फक्त राजकारणी , उद्योजक आदींना दुषणे देण्याचा आपल्याला नैतिक अधिकार किती आहे. लक्षात घ्या हि फक्त एक साधी चाचणी आहे. इथे प्रामाणिकपणे खरी माहिती देऊन आपली आपल्यालाच चाचपणी घ्यायचेय. न कुणाला दोषी ठरवण्यात येणार आहे आणि न कुणी पुरस्काराचा मानकरी ठरणार आहे.
तर मग आपणही करून पाहूया, सत्याचे प्रयोग ! ( A Self Test in Marathi )
काय सांगू शकतात तुमचे गुण ?
80 > : प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार आहे तुम्हाला
60 – 80 : दोलायमान
35 – 60 : भ्रष्टांकीत
35 < : भ्रष्टाचार हाच शिष्टाचार
सूचना : चाचणी गुणतालिका व निकाल वर दिलं असली तरी सदर चाचणीचा उद्देश निव्वळ मनोरंजनाचा असून यामधून कोणताही शास्त्रीय असा ठोस निष्कर्ष काढू नये.