how to avoid tds on fd in marathi for senior citizenhow to avoid tds on fd in marathi for senior citizen

तुम्हाला माहित आहे का , 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांचे एका आर्थिक वर्षातील व्याजाद्वारे येणारे उत्पन्न 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर बँक त्यावर 10% TDS कापून घेते. (how to avoid tds on fd in marathi for senior citizen)

पण हे टाळता येऊ शकतं. म्हणजे इथे होणारी १० % टीडीएस कपात टाळता येऊ शकते. कसे ?

चला पाहूया.

सरकार वृद्धांना म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना काही कर सवलती देते, ज्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेव म्हणजे FD वर मिळणाऱ्या व्याजावर आकारल्या जाणाऱ्या TDS भरण्यापासून सूट मिळू शकते. तुमच्या नात्यातील, मित्रपरिवारातील ज्येष्ठांना आपल्या ठेवींच्या व्याजावरील 10% TDS भरणे टाळायचे असेल, तर त्यांना आधी काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतील.

यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आपलं स्व-घोषणापत्र त्यांच्या बँकेत जमा करावे. ज्यामध्ये फॉर्म 15G आणि फॉर्म 15H यांचा समावेश आहे.(forms for tds relief)

करपात्र उत्पन्न कर-सवलत मर्यादेपेक्षा कमी असल्यास, करदाता बँकेला व्याजावरील कर वजा न करण्याची विनंती करू शकतो. तसेच या वर्षापासून, वय वर्ष 75 आणि त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक ज्यांना आयकर रिटर्न भरण्याची इच्छा नाही ते त्यांच्या बँकेत फॉर्म 12BBA सबमिट करू शकतात.

कोणाला व कशी मिळणार सवलत ? (how a tax relief is granted)

आयकर रिटर्न भरण्यापासून सूट फक्त अशा ज्येष्ठ नागरिकांनाच उपलब्ध आहे ज्यांचे उत्पन्न केवळ पेन्शन आणि मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजातून आहे. आणि यातील दुसरी आणि महत्वाची अट म्हणजे पेन्शन व मुदत ठेव एकाच बँकेमध्ये असावी. 

फॉर्म 12BBA मध्ये अनेक गोष्टी भरायच्या आहेत. ज्यामध्ये कलम 80C ते कलम 80U अंतर्गत वजावट, कलम 87A अंतर्गत कर सवलत आणि मुदत ठेवी आणि FD मधून मिळणाऱ्या एकूण उत्पन्न यांचा समावेश आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्यानुसार, फॉर्म सबमिट केल्यानंतर बँक करदात्याच्या एकूण उत्पन्नाची गणना करते. यासाठी, कलम 87A अंतर्गत कर वजावट आणि सूट विचारात घेतली जाते आणि स्लॅब दरानुसार अंतिम उत्पन्नातून कर वजा केला जातो.

हा फॉर्म भरताना ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये याची सर्वोतोपरी काळजी सीबीडीटीने घेतली आहे. आणि त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांना फॉर्म भरण्यास मदत आणि मार्गदर्शन करावी असे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत.

हे म्हणजे एक प्रकारे, बँकच ज्येष्ठ नागरिक करदात्यांच्या वतीने आयकर रिटर्न (ITR) दाखल करेल. सीबीडीटीचे हे धोरण स्वागतार्ह आहे. कारण खरंतर आयुष्याच्या या टप्प्यावर, ज्येष्ठ नागरिकांना आयटीआर भरणे तसे काहीसे किचकट काम, कारण आयकराचे नियम वरचेवर बदलत असतात.

फॉर्म 12BBA चे सबमिशन का महत्वाचे ? (what is form 12BBA ?)

फॉर्म 12BBA सबमिट करण्यामागे आणखी एक फायदा आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर कापल्या गेलेल्या कराच्या परताव्याची काळजी करण्याची गरज नाही.कारण आयकर नियमांनुसार, 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकाचे एका आर्थिक वर्षात 50,000 रुपयांपेक्षा जास्त व्याज उत्पन्न असेल, तर बँक त्यावर 10% टीडीएस कापते.

जे करदाते 5% आणि 10% प्राप्तीकराच्या स्लॅबमध्ये येतात, त्यांच्या पैशाचा बऱ्यापैकी हिस्सा TDS मध्ये जाणार. उदाहरणार्थ, समजा एखाद्या व्यक्तीचे व्याजद्वारे येणारे उत्पन्न 7 लाख रुपये असेल, तर 10 टक्के TDS नुसार, 70,000 रुपयांचे नुकसान त्याला होईल.  पण जर करदात्याने फॉर्म 12BBA सबमिट केला तर त्याला इथे 52,500 रुपये कर भरावा लागेल. आणि जे करदाते फॉर्म 12BBA भरणार नाहीत त्यांना 17,500 रुपयांचा परतावा मिळेल (tds return in marathi).

Info Sources: CNBC, Mint

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *