how to know epf balance without internet in marathihow to know epf balance without internet in marathi

इंटरनेटशिवाय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफमधील शिल्लक कशी तपासता येईल. (how to know epf balance without internet in marathi) आणि याच ईपीएफवर असणाऱ्या मोफत विम्याच्या सुविधेसंदर्भात आपण आज जाणून घेऊ.

एसएमएसद्वारे ईपीएफ शिल्लक माहिती करून घेऊ शकता (how to know epf balance through sms in marathi )

या करिता तुमच्या ईपीएफशी नोंदणीकृत असलेल्या मोबाइल क्रमांकावरून ईपीएफओला 7738299899 या क्रमांकावर ‘EPFO ​​UAN LAN‘ या नमुन्यात लघु संदेश (SMS) पाठवायचा आहे. इथे ‘LAN’ म्हणजे तुमची भाषा अभिप्रेत आहे. म्हणजे तुम्हाला माहिती इंग्रजीत हवी असल्यास LAN च्या ठिकाणी ENG लिहावे लागेल. त्याचप्रमाणे हिंदीसाठी ‘HIN’ आणि मराठीसाठी ‘MAR’ म्हणजे EPFOHO UAN MAR असं टाईप करून मेसेज पाठवावा लागेल. मेसेज पाठवल्यानंतर काही वेळातच तुमच्या मोबाईल फोनवर पीएफ बॅलन्स बाबतचा मेसेज येईल.

मिस्ड कॉलद्वारे सुद्धा शिल्लक जाणून घेता येईल. (how to know epf balance through missed call in marathi )

फक्त एसएमएस नाही तर तुम्ही मिस्ड कॉलद्वारेही तुमची ईपीएफ शिल्लक जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळाने तुमच्या फोनवर बॅलन्स बाबतचा मेसेज येईल.

तुम्हाला माहित आहे का? ईपीएफ धारकाला असतो विमा. (EPF Insurance in marathi)

अनेकांना माहिती नसेल पण प्रत्येक सक्रीय भविष्य निर्वाह निधी खातेधारक ‘एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स’ म्हणजेच EDLI स्कीम, 1976 अंतर्गत, कोणतेही प्रीमियम न भरता रु. 7 लाखांपर्यंतच्या आश्वस्त जीवन विमा लाभांसाठी पात्र असतो.

या योजनेत भविष्य निर्वाह निधी खाते उघडण्यासोबत खातेधाराकाचा मोफत विमा उतरवला जात असतो.या विम्यासाठी ईपीएफधारकाकडून कोणतेही प्रीमिअम आकारले जात नाही.कारण सदर विम्याच्या प्रीमिअमचा हिस्सा ईपीएफधारकाची कंपनी आणि केंद्र सरकारकडून विभागून भरला जात असतो.

सदर विमा सुविधेच्या लाभास पात्र ठरण्यासाठी ईपीएफधारकाने मागील १२ महिन्यात म्हणजेच वर्षभरात आपले वेतन घेतलेले असले पाहिजे. विमा रक्कम हि मागील १२ महिन्यातील सरासरी मासिक वेतनाच्या तीसपट जी कमाल सात लाखांपर्यंत विचारात घेतली जाते.

ईपीएफधारकाचा मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम खातेदाराच्या नॉमिनीला प्राप्त होते. (epf insurance death claim in marathi )

यंदा ईपीएफवर किती व्याज मिळेल. (epf interest rate 2021-22)

EPFO ने 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी 8.1% व्याजदर निश्चित केला आहे. व्याज निश्चित झाले असल्याने, बहुतेक नोकरदारांना पीएफचे व्याज शक्य तितक्या लवकर त्यांच्या खात्यात येईल अशी अपेक्षा आहे. विविध माहिती स्त्रोत व रिपोर्ट्सनुसार, जूनपर्यंत तुमच्या पीएफ खात्यात व्याजाचे पैसे येण्याची शक्यता आहे.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *