रेपोदर वाढल्यावर गृहकर्ज व्याजदर त्वरित वाढतात पण मुदतठेव दर का नाही.
रेपोदर कमी झाल्यावर गृहकर्ज व्याजदर त्वरित कमी का होत नाहीत ?
असे प्रश्न अनेकांना पडत असतील. आज जाणून घेऊया या मागचं स्पष्टीकरण.(Repo rate home loan and FD rates info in marathi )
रेपोरेट लिंक्ड होमलोन. Repo Linked Lending Rate (RLLR)
अर्थात ‘रेपोदराशी जोडलेलं गृहकर्ज’ म्हणजे जेव्हा रेपोदर वाढतो त्यानुसार गृहकर्जाचे दर वाढतात आणि रेपो दर कमी होतो तेव्हा त्यानुसार गृहकर्ज व्याजदर कमी होतो.
हे सुद्धा वाचा 👉 तुम्ही तुमचं गृहकर्ज रेपो रेटशी जोडलं आहे का ?
पण रेपो दरा नुसार गृहकर्जाचे दर त्वरित वाढतात पण पटकन कमी का होत नाही ?
तर कसं आहे, रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार रेपो दर जाहीर झाल्यानंतर त्याच्याशी संबंधित असा बदल आपल्या व्याजदरांत करण्यास बँकांना तीन महिन्यापर्यंतचा कालावधी असतो. पण बँका हा नियम आपल्या सोयीने वापरतात.
म्हणजे जर रेपो दर वाढला तर बँका गृहकर्ज दर त्वरित वाढवतात पण जर रेपो दर कमी झाला तर मात्र तीन महिन्यांच्या कालावधीचा त्यांच्याकडून वापर होतो.
हे झालं नवीन गृह कर्जाबाबत पण त्यांचं काय ज्यांनी आधीच गृहकर्ज घेतलं असेल.. ( MCLR and RLLR in marathi)
तर त्यात दोन प्रकार आहेत एक MCLR आधारित ज्यामध्ये तुमच्या गृह कर्जाचे व्याजदर पुनर्रचना (Reset) करण्याचा कालावधी ठरलेला असतो. सर्वसाधारणपणे जो आता सहा महिन्यांचा असतो. म्हणजे दर सहा महिन्यांनी गृहकर्ज व्याजदराची पुनर्रचना होते. अर्थात रेपोदरातील बदलामुळे बँकेने आपल्या गृहकर्जात बदल केल्यासच या पुनर्रचनेतून आपल्या व्याजदरांत बदल होतो.
आणि दुसरा प्रकार म्हणजे ‘रेपोदराशी जोडलेलं गृहकर्ज’ ज्याबद्दल या लेखाच्या सुरवातीलाच सांगितलं आहे.
बरं मग एफडी व्याजदरांनी काय घोडं मारलंय ?
तर यामध्ये कसं आहे कि एफडी म्हणजे मुदत ठेवींचे दर, बँकांच्या तरलतेच्या आवश्यकतेशी जोडलेला असतो.पैशांबाबत बँकेकडे पुरेशी तरलता असेल (सध्याची स्थिती काहीशी अशीच) तर त्यांना एफडी दर वाढवण्याची गरज नसते. म्हणजे ठेव म्हणून अधिक पैशांची बँकांना आवश्यकता नाही.
म्हणूनच दोन वेळा रेपो दरांत वाढ होऊनही आजही “आपल्याला कर्ज हवंय का ?” असं विचारणारे फोन कॉल्स येतात. हो पण यापुढेही रेपो दरांत वाढच अपेक्षित आहे आणि त्यानंतर पुढे बँका मुदत ठेवींचे दर वाढवतील. अर्थात हा निर्णय सुद्धा प्रत्येक बँकेचा स्वतःचा असतो, त्यामुळे आता काही बँका मुदत ठेव दर वाढवताना दिसतील तर काहींचे दर अजूनही मे महिन्यातील पूर्वाधाप्रमाणे असतील.
माहिती आवडली असेल तर तर इतरांना शेअर करा आणि आमचे इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.