( How to become a sub-broker ? ) स्वतःचा उद्योग धंदा सुरु करायचा विचार करताना सर्वात आधी मनात येणारा प्रश्न म्हणजे भांडवल-गुंतवणूक किती असणार ? आणि अनेकजण हा अडथळा ओलांडू शकत नाहीत. मग अशा वेळी व्यक्ती किमान भांडवल असणाऱ्या उद्योग व्यवसायाची माहिती घेऊ लागते.
खरं तर आजच्या माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल मार्केटिंगच्या युगात असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत ज्यात किमान किंवा अगदी शून्य भांडवलात सुद्धा तुम्ही स्वव्यवसाय सुरु करू शकता. अर्थात भांडवल किमान असलं तरी इतर कष्ट मात्र कमाल असतात.
आज तुम्हाला अशाच एका व्यवसायाची ओळख करू देणार आहोत ज्यात अगदी किरकोळ किंवा शून्य गुंतवणुकीत सुरवात करून सुरवातीच्या काळात मेहनत घेऊन एक चांगला उत्पन्नाचा स्त्रोत उभा करू शकता. हा व्यवसाय आहे भांडवली बाजार म्हणजेच शेअर मार्केटशी संबंधित. पण यात तुम्हाला या क्षेत्राबद्दल बऱ्यापैकी प्राथमिक माहिती असली तरी चालून जातं.
मग इथे महत्वाचं काय ?
तर तुमचं मित्रपरिवार वर्तुळ जितकं मोठं तितका वाव जास्त, आकडेवारीत जर बऱ्यापैकी रस असेल उत्तम. कारण तुमच्याकडून उघडल्या जाणाऱ्या डीमॅट व ट्रेडिंग खात्यावर मिळणाऱ्या प्रोत्साहनपर रकमेसोबतच त्या खात्यावरून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवरील ब्रोकरेजमधील एक मोठा हिस्सा तुम्हाला मिळता राहतो.
‘बिझनेस पार्टनर किंवा सबब्रोकर फ्रेंचायझी’ (How to become sub-broker in Marathi ) आज अनेक ब्रोकरेज हाऊजेस देऊ करतात. त्यामधून ग्राहकांना उत्तम सेवा आणि तुम्हाला उत्पन्नातील चांगला वाटा देऊ करणाऱ्या ब्रोकारची निवड तुम्ही करू शकता.
आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक ब्रोकरेज हाउसचा पर्याय आणला आहे, जिथे तुम्ही उघडलेल्या खात्यावरून झालेल्या व्यवहारातील ब्रोकरेज मधील तब्बल ७५% हिस्सा तुम्हाला मिळणार आहे.
पाहूया या सबब्रोकर फ्रेंचायझीची वैशिष्ट्ये.
- गुंतवणूक रु.1000 किंवा शून्य
- ब्रोकरेजमधील उत्पन्नात 75% वाटा
- कमी ब्रोकरेज दर ( रु.15 प्रती व्यवहार आणि इक्विटी डिलेव्हरी मोफत )
- API चा मोफत वापर ( ज्यासाठी इतर ब्रोकरेज होउस रु. 3000-4000 ) आकारतात.
- अनेक भाषांत ग्राहक सेवा ( मराठीचा समावेश )
- दर महिन्याला पेमेंट
- विपणन ( मार्केटिंग ) सेवा व मार्गदर्शन.
- नियमित मार्गदर्शन
- पारदर्शक व्यवहार
- आकर्षक प्रोत्साहनपर बक्षिसे.
या व्यवसायात काय करावं आणि काय करू नये.
- आपल्या खातेदारांकडून होणाऱ्या व्यवहारांवर आपलं उत्पन्न ठरणार असलं तरी त्यांना ट्रेडिंग करण्यासाठी उद्युक्त करू नये, तसेच त्यांना चुकीची शिफारस करू नये.
- खातेदारांच्या शंकांचं निरसन करण्याचा पूर्ण प्रयत्न करावा, आपल्याला असलेली माहिती त्यांना पुरवावी. पण असे करताना त्यांना कोणतीही चुकीची माहिती जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
- ट्रेडिंगमधील जोखीम आणि जबाबदारी यांची कल्पना खातेदारांना द्यावी.
- तुमचं व्यावसायिक धोरण खातेदारांच्या फायद्यावर अवलंबून असावं.
तुम्हाला जर सबब्रोकर होण्यात स्वारस्य असेल तर सोबतच फॉर्म भरावा. आमच्याकडून तुम्हाला त्वरित संपर्क केला जाईल.