आज शेअर मार्केट तसा दिवसभरात अस्थिर राहिला पण त्यातही आपली वाढ मात्र टिकवून ठेवली.सर्वोच्च न्यायालयाच्या अधीस्थगन (MORATORIAM ) संदर्भातील निकाल आज बँकांना अनुकूल ठरणारा आल्याने बँकिंग क्षेत्रात तेजी दिसून आली. 

आज सगळ्या क्षेत्रीय निर्देशांकामध्ये सरकारी बँका  (+2.9%) आणि बँक निफ्टी  (1.7%) यांची वाढ सर्वाधिक ठरली आणि निफ्टी मेटल  (-0.6%) आणि एफएमसीजी  (-1.1%) क्षेत्रे सर्वाधिक घटीचे राहिले.

सेन्सेक्स : 50051.44 बंद ( 280.15 अकांची म्हणजेच 0.56 % नी वाढ) 18 कंपन्यांचे समभाग वधारले, 12 कंपनीचे घसरले. निफ्टी : 14814.75(78.35 म्हणजेच 0.53% नी वाढ) 28 कंपन्यांचे वधारले, 22 कंपनीचे घसरले.

   आजचे वधारणारे               फरक                
श्री सिमेंट      ⏫ 5.3%
अल्ट्राटेक सिमेंट   ⏫ 2.5%
डीवीज लॅब  ⏫ 2.5%

 

आजचे घसरणारे                            फरक             
हिंदाल्को    ⏬ 2.3%
ओएनजीसी    ⏬ 2.0%
पॉवरग्रीड   ⏬ 2.0%

  

डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट उघडा फक्त पंधरा मिनिटांत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *