बरोबर एक वर्षापूर्वी कोरोनाची भीती भारतात जनमानसात चांगलीच पसरू लागली होती, त्याच दरम्यान पंतप्रधानांनी देशभरात जनता कर्फ्यूची हाक दिली आणि पुढे लॉक डाऊनच्या शक्यतेने दिसणारी आर्थिक कोंडी जाणवू लागली अशातच आधीच फुगलेलं आणि त्यामुळे असं कोणतंही निमित्त शोधणाऱ्या शेअरमार्केटने या दोन दिवसांत जबरदस्त घसरण अनुभवली, 23 मार्च 2020 रोजी बीएसईचा सेन्सेक्स 3,935 अंकांनी घसरला आणि 25,981 वर आला.दुसर्या दिवशी 24 मार्च रोजीही शेअर बाजारात हा घसरण अध्याय सुरूच राहिला, त्यामुळे सेन्सेक्स 25,639 अंकापर्यंत खाली आला तर निफ्टी 7,511 पर्यंत खाली घसरला.
त्यानंतर वर्षभरात 95% ची झेप..
पण तुम्हाला माहित आहे का कि त्यानंतर आतापर्यंत शेअर मार्केट 95% नी वधारलाय ? म्हणजे अगदी दुप्पट परतावा फक्त या निर्देशांकांनीच दिलाय. तेव्हापासून देशांतर्गत शेअर बाजाराचा भरपाईची वेग प्रचंड राहिलाय. या काळात सेन्सेक्स व निफ्टी जवळपास दुप्पट झाले आहेत.काळ मंगळवारी सेन्सेक्स 50,051 वर बंद झाला.गेल्या वर्षी 24 मार्चच्या पासून कालपर्यंत ही 95 टक्क्यांची उडी आहे.आणि या कालावधीत गुंतवणूकदारांची संपत्तीही दुपटीने 208 लाख कोटी रुपयांवर गेली आहे.