अत्यंत चर्चित ठरलेल्या एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीकडे सरकारने महत्वाचं पाऊल उचलले आहे. या निर्गुंतवणूक प्रस्तावात स्वारस्य असलेल्या दोन महत्वाच्या गुंतवणूकदारांच्या बोली यासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आल्या आहेत. अनेक बोलीं मधून टाटा ग्रुप आणि स्पाइसजेट याची नावे शॉर्टलिस्टेड करण्यात आलेली आहेत.हे दोन्ही गुंतवणूकदार एअर इंडिया खरेदी करण्यास तयार आहेत.