शेअर बाजारात गुंतवणूक ? आयकर विभाग विचारणार तपशील.
आता आयकर विभाग शेअर बाजारामध्ये केलेल्या सर्व गुंतवणूकीची माहितीही घेणार आहे. NSE आणि BSE मधून करदात्यांच्या गुंतवणूकीची माहिती मागितली जाईल. (income tax on returns from investment in stock market in marathi)
यासंदर्भातील अधिसूचना गेल्या आठवड्यात प्राप्तिकर विभागाने सादर केली होती.
यामुळे करसंकलन वाढविण्यात मदत होईल. नवीन नियमांनुसार बँक, स्टॉक एक्स्चेंज आणि कंपन्यांना आता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मागणी आणि आदेशानुसार गुंतवणूकदारांची माहिती सामायिक करणे बंधनकारक असेल.तसेच स्टॉक एक्सचेंज आणि कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांच्या आर्थिक व्यवहाराचे वार्षिक विवरण अधिकाधिक प्रमाणात सामायिक करणे आता बंधनकारक झाले आहे. तज्ज्ञांच्या मते आयटीआर दाखल करणार्यांची संख्या वाढली आहे, परंतु कर भरणा करणार्यांची संख्या अद्याप एक कोटींपेक्षा काही प्रमाणातच जास्त राहिलेय.