मोबिक्विक वापरकर्त्यांचा डेटा डार्कवेबवर लिक ? 

डिजिटल पेमेंट एप मोबिकविक ( MobiKwik) च्या वापरकर्त्यांचा तपशील डार्कवेबवर उपलब्ध झाल्याचे वृत्त आहे ( MobiKwik data leaks on dark web ?) जवळपास 35 लाख वापरकर्त्यांची खाजगी माहिती म्हणजे पत्ते, फोन नंबर आणि आधार कार्ड इत्यादी यामध्ये समावेश असल्याचं म्हटलं जातंय. इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीत हा आकडा सुमारे 10 कोटीं इतका असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. 

डार्कवेबवर म्हणे एक लिंक सामाईक करण्यात आली आहे ज्याद्वारे जवळपास 8.2 टेरा बाईट्स इतक्या मोठ्या प्रमाणातील आकारात हा तपशील असल्याचं समजतंय. सर्वप्रथम फेब्रुवारीमध्ये एका सुरक्षा संशोधन संस्थेकडून या संदर्भात याची माहिती देण्यात आली होती परंतु त्यावेळी कंपनीकडून हे वृत्त फेटाळले गेले होते. 

डार्कवेबवर या संपूर्ण तपशिलाची विक्री किंमत 86 हजार डॉलर्स (सुमारे 63 लाख रुपये)  इतकी लावण्यात आली आहे. आमचे इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *