शेअर मार्केटमध्ये आज तेजीचा दिवस होताच पण आज सर्वाधिक लक्ष वेधलेल्या शेअर्स पैकी एक आहे येस बँक..
आज हा शेअर तब्बल 16 % नी वाढला. शुक्रवारी रु. 14.05 वर बंद झालेला हा समभाग आज 14.15 ला उघडला आणि बघता बघता 16.85 पर्यंत उच्चांक गाठला अखेरीस 16.30 वर बंद झाला. (yes bank share updates in marathi)
“पण असं काय कारण होतं कि आज हा शेअर इतका वाढला ?”
कारण हि तसंच आहे .
येस बँकचा समावेश “निफ्टी-नेक्स्ट 50” या निर्देशांकात केला जाण्याचे पडघम वाजतायेत.तर मग एका अर्थाने वर्षभरापूर्वी दिवाळखोरीला लागलेल्या या शेअरचा हा “कमबॅक” मोमेंटच म्हणायला हवा कारण जवळपास वर्षभरापूर्वी या शेअरला निफ्टी 50 , बँकनिफ्टी मधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला होता आणि आता पुनश्च “निफ्टी नेक्स्ट 50” या महत्वाच्या निर्देशांकात समावेश म्हणजे हे बँकेचं आर्थिक आरोग्य सुधारण्याचं द्योतक समजायला हरकत नाही.
आणि जाता जाता महत्वाचं, गेल्या आठ महिन्यात हा शेअर जवळपास 38 % नी वाढलाय..